Table of Contents
Maha Pariksha Portal Exam च्या परीक्षेत यश मिळवायचे असेल तर अभ्यासाचे नियोजन अशा प्रकारे करा.अभ्यास करताना ह्या गोष्टी करा म्हणजे नक्की यश मिळेल. ( How to Study for Maha Pariksha Portal Exam )
फक्त अभ्यास करणे आणि योग्य पद्धतीने अभ्यास करणे यातील फरक तुम्हाला माहित आहे का ?
अभ्यास फक्त करायचा नसतो त्याला एक विशिष्ट दिशा असायला हवी. तुमच्या अभ्यासाला आहे का ही दिशा ?
यावर्षी लेखी परीक्षा महा परीक्षा पोर्टल च्या माध्यमातून online घेतली जात आहे आणि खूप मित्र सरकारी नौकरी मिळवण्यासाठी ह्या परीक्षांच्या अभ्यास करत आहे.
मात्र तरीही मला असा प्रश्न विचारावा वाटतो की तुम्ही परीक्षेचा अभ्यास करत आहात तो योग्य पद्धतीने करत आहात का?
‘सर अभ्यास करतो आहे पण योग्य पद्धतीने म्हणजे नेमके कसे?’ हा प्रश्न तुम्ही मला विचारायला हवा.
महा ( स्पर्धा ) परीक्षा
मित्रांनो शाळेचा अभ्यास आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास यामध्ये भरपूर फरक आहे. शाळेत सर्वच अभ्यास करतात अभ्यास करणारे सर्वच पास होतात परंतु स्पर्धा परीक्षेमध्ये अभ्यास करूनही पोस्ट मिळणारे खूप थोडे असतात.
इथे फक्त अभ्यास करणे हे महत्त्वाचे नसून इथे महत्त्वाचे असते तुम्ही योग्य पद्धतीने अभ्यास करत आहात का?
अभ्यास करणारे माझे बरेचसे मित्र खालील गोष्टी नेहमी करताना आढळतात.
मराठी व्याकरणातील समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द वाक्यप्रचार म्हणी शब्दांचे एक वचन अनेक वचन लिंग यासारख्या गोष्टी आपण रोज बाळासाहेब शिंदे सरांच्या पुस्तकातून किंवा मो रा वाळंबे यांच्या पुस्तकातून वाचत असतो
गणिताचा अभ्यास करत असताना लसावी मसावी सरळव्याज शेकडेवारी नफा-तोटा घातांक वयवारी गुणोत्तर प्रमाण यासारख्या प्रकरणांचे उदाहरणे सोडवत असतो.
बुद्धीमत्ता चा अभ्यास करताना नातेसंबंध क्रमवार मांडणी मालिका पूर्ण करा कूटप्रश्न आकृतीचे प्रतिबिंब यासारख्या प्रश्नांची तयारी करतो
,
तर सामान्य ज्ञान यासारख्या विस्तृत विषयांमध्ये आपण इतिहासातील सनावळी कायदे गव्हर्नर ,पंचायत राज व्यवस्था मध्ये महत्वाची कलम तर भूगोल विषयांमध्ये देशातील सर्वात उंच सर्वात मोठे सर्वात जास्त अशा गोष्टींचा अभ्यास करत असतो.
अभ्यास करताना वरती दिलेले सर्व मुद्दे अतिशय महत्वाचे आहे किंबहुना असेही म्हणता येईल की वरती दिलेल्या सर्व गोष्टी आल्याशिवाय अभ्यासाला सुरुवात झाली असे म्हणता येणार नाही
मात्र तुमचा अभ्यास जर वरती दिलेल्या गोष्टी करण्यापुरताच मर्यादित असेल तर लक्षात घ्या मित्रांनो तुम्ही खूप मोठी चूक करत आहात.
तुम्ही भरपूर तयारी करूनही तुम्हाला परीक्षेत यश मिळत नाही असे तुमच्यासोबत होते का ? तुम्ही परीक्षा देऊन येता आणि मग जेव्हा निकाल लागतो
आणि आपले सिलेक्शन होत नाही तेव्हा आपण म्हणतो : ‘ असे कसे काय होउ शकते ? मी तर सर्व अभ्यास केला होता .’
मी तर सर्व अभ्यास केला होता !

माझे सिलेक्शन का झाले नाही मी तर सर्व अभ्यास करून गेलो होतो ? मला तर सर्व येते मग तरीही निकाल का आला नाही ?
तुम्ही अभ्यास केला होता मात्र तरीही तुमचा निकाल अपेक्षित आला नाही किंवा तरीही परीक्षा कठीण का वाटली याचा विचार केला तर हे तुमच्या लक्षात यायला हवे.
महापरीक्षा पोर्टल किंवा नुकताच झालेल्या काही प्रश्नपत्रिका मध्ये आलेले प्रश्न जर बघितले तर असं लक्षात येईल की आपण करतो आहे त्यापेक्षा थोडेसे वेगळे आणि वेगळ्या दृष्टिकोनातून प्रश्न सध्या विचारले जात आहे.
उदाहरण सांगायचे म्हणजे गणितामध्ये आपण तयारी करताना सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज काढण्यापर्यंत अभ्यास करतो
परंतु परीक्षेत येणारा प्रश्न बघितला असता आपण थोडेसे गोंधळून जातो कारण हा प्रश्न सरळव्याज आणि चक्रवाढव्याज याच प्रकरणावर असतो मात्र तरीही प्रश्न विचारण्याची पद्धत वेगळी असते.
सध्याच झालेल्या एका परीक्षेतील एक प्रश्न आपण येथे संदर्भ म्हणून घेऊ.
आपण शेकडेवारी प्रकरणाचा भरपूर चांगला अभ्यास केलेला असतो आणि कुठल्याही संख्येचे कितीही टक्के आपल्याला काढायला सांगितले तर आपण सहजपणे काढू शकतो
मात्र तरीही परीक्षेत शेकडेवारी प्रकरणावर जो प्रश्न येतो तो प्रश्न आपल्याला गोंधळात टाकतो.

आत्ताच झालेल्या एका परीक्षेतील हा प्रश्न पूर्णपणे शेकडेवारी प्रकरणावर आधारित आहे मात्र तरीही ह्या प्रश्नाचे बरोबर उत्तर शोधणे खूप मित्रांना कठीण जाते
किंवा ज्यांना हा प्रश्न सोडवता ही येतो असे मित्र या प्रश्नाचे उत्तर शोधताना दोन-तीन मिनिटांपेक्षा जास्त वेळ देतात जे स्पर्धा परीक्षेत बिलकुल अपेक्षित नाही.
या प्रश्नांमध्ये वेगळे असे काहीच नाही.
मात्र तरीही यासारखे मोठे पर्याय आणि प्रश्नाचे बदललेले स्वरूप बघून आपण परीक्षेत खूप गोंधळून जातो किंवा हा प्रश्न कसा सोडवायचा याचा विचार करण्यातच आपला बराचसा वेळ निघून जातो.
आणि मग इथे प्रश्न निर्माण होतो मी अभ्यास केला आहे तरीही मला या प्रश्नाचे उत्तर का आले नाही?
मी सर्व तयारी करून सुद्धा हा प्रश्न का सोडवू शकलो नाही?
आणि हे प्रश्न जर तुम्ही मला विचाराल तर मात्र माझे उत्तर असेल
अभ्यास करूनही तुम्ही हे प्रश्न सोडवू शकले नाही कारण तुम्ही अभ्यास करता आहात मात्र योग्य पद्धतीने करत नाही.
योग्य पद्धतीने अभ्यास करणे म्हणजे काय?
वर्षातून अनेक परीक्षा होतात. खूप मित्र वर्षात होणारी प्रत्येक परीक्षा देतात आणि म्हणून वर्षभर अभ्यास केल्याने पुस्तका मध्ये दिलेल्या संकल्पना त्यांना परिपूर्ण रित्या समजलेले असतात.
महापरीक्षा पोर्टल पूर्वी होणाऱ्या सर्व परीक्षांमध्ये असे मित्र की ज्यांचा भरपूर अभ्यास झाला आहे ते चांगले मार्क्स घेऊ शकत होते.
मात्र महापरीक्षा पोर्टल मध्ये कित्येक वर्षांपासून अभ्यास करून परीक्षेत पैकीच्या पैकी मार्क घेणाऱ्या पद्धतीवर लगाम घालण्यात आला.
वरती उदाहरणा दाखल दिलेला प्रश्न हा अगदी हेच सांगतो.
आता परीक्षेत येणारे प्रश्न असे असतात की ज्यासाठी तुम्हाला वेगळा विचार करावा लागतो.
हे प्रश्नच याप्रकारे बनवलेले असतात की घोकंपट्टी पाठांतर किंवा सारखे सारखे वाचून लक्षात राहणे यामुळे पैकीच्या पैकी मार्क घेणारे उमेदवार कमी करून ज्यांच्या संकल्पना स्पष्ट आहे त्यांनाच याचे उत्तर देता यावे.
मित्रांनो वरील प्रश्नांमध्ये ज्या उमेदवाराची शेकडेवारी ची संकल्पना अगदी स्पष्ट आहे त्याच उमेदवाराला ह्या प्रश्नाचे अतिशय कमी वेळेत उत्तर देता येईल.
आणि ज्या उमेदवाराने टक्के काढण्याचे सूत्र पाठ केले असेल अशा मित्राला हा प्रश्न एकतर सोडवता येणार नाही
किंवा सोडवण्यासाठी जास्त वेळ लागेल.
परीक्षांचे हे बदललेले स्वरूप लक्षात घेऊन तुम्ही अभ्यास करायला हवा.
हा एकमेव पर्याय असा आहे की ज्याचा वापर करून तुम्ही नवीन बदललेल्या परीक्षा पॅटर्न मध्येही जास्तीत जास्त मार्क्स मिळवू शकता.
सूत्र पाठ करणे, शॉर्टकट लक्षात ठेवणे , काही गोष्टी लक्षात ठेवणे. यासारख्या अभ्यास करणाऱ्या पद्धती आता मागे पडणार आहे सिलेक्शन अशाच उमेदवाराचे होईल ज्याच्या संकल्पना क्लियर आहे.
Maha Pariksha Portal Exam साठी नवीन रणनीती तयार करा

या संकल्पना तुम्ही कशा क्लीअर कराल?
हे अतिशय सोपे काम आहे.
यासाठी तुम्हाला तुम्ही सध्या वाचत असणाऱ्या पुस्तकां सोबतच अजून एक गोष्ट करायची आहे.
आणि ती म्हणजे महापरीक्षा पोर्टल वर आतापर्यंत झालेल्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास.
हा प्रश्नपत्रिकांचा अभ्यास तुमच्या साठी खूप मोठे वरदान ठरणार आहे कारण या प्रश्नपत्रिका मध्येच तुम्हाला एखाद्या प्रकरणावर नवीन पॅटर्ननुसार कसा प्रश्न येऊ शकतो हे समजेल.
या प्रश्नपत्रिकांच्या अभ्यासातूनच नेमका कशाचा आणि कसा अभ्यास करायचा हे तुमच्या लक्षात येईल.
महापरीक्षा पोर्टल च्या प्रश्नपत्रिका बाजारात उपलब्ध आहेत आणि तुम्ही त्या प्रश्नपत्रिका इंटरनेट वरती सर्च करून सुद्धा मिळवू शकता.
तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तरीही आत्ता पाठीमागे झालेल्या महा परीक्षा पोर्टल परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांचा थोडासा अभ्यास जरी तुम्ही केला तरी तो तुमच्या साठी खूप फायद्याचे ठरेल.
महापरीक्षा पोर्टल च्या प्रश्नपत्रिका संच ऑनलाइन उपलब्ध आहेत ते तुम्ही ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्ट या वेबसाइटवरून देखील ऑनलाईन ऑर्डर करू शकता.
खाली काही महत्त्वाचे वाटणारे पुस्तके दिली आहेत तुम्हाला हवं असेल तर खाली लिंक वर ती क्लिक करून तुम्ही हे पुस्तके विकत घेऊ शकता.
Maha Pariksha Portal Exam : प्रश्नांसाठी पुस्तके
आणि त्याच प्रमाणे,
पोलीस भरती परीक्षेसाठी लेखी परीक्षेचा सराव तुम्ही खाली वेबसाईटवर जाऊन अतिशय चांगल्या प्रकारे करू शकता.
या वेबसाईटवर ती असणारे सर्व ऑनलाईन टेस्ट हे सर्व मित्रांसाठी फ्री आहेत आणि त्यासाठी कुठलीही नोंदणी करणे गरजेचे नाही.
म्हणजे तुम्ही खालील लिंक वर ती करून तुम्हाला हव्या तितक्या ऑनलाइन टेस्ट देऊ शकता.
आजपर्यंत या वेबसाईटवर 50 पेक्षा अधिक ऑनलाईन टेस्ट उपलब्ध आहे.
आणि या सर्व टेस्ट चे एक खास वैशिष्ट्य आहे .
ते म्हणजे या टेस्टमध्ये असणारे सर्व प्रश्न अतिशय काळजीपूर्वक ( Maha Pariksha Portal Exam Pattern च्या धर्तीवर ) तयार करण्यात आलेले आहे.
प्रश्नांची काठिण्यपातळी पोलीस भरतीला येऊ शकेल अशीच ठेवण्यात आली आहे.
खूप अवघड किंवा खूप सोप्या अशा प्रश्नांचा अभ्यास करून तुम्हाला खूप फायदा होणार नाही
मात्र खास परीक्षेला येऊ शकणाऱ्या प्रश्नांचा सराव केला तर नक्कीच तुमचा खूप मोठा फायदा होईल.
मग वाट कसली बघताय खालील लिंक वर क्लिक करून तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे असणारे प्रश्न सोडवा.
लेखी परीक्षेच्या तयारीसाठी तुम्ही कोणते पुस्तक वापरत आहात ? तुम्ही वापरत असणाऱ्या पुस्तकाचे नाव कमेंट मध्ये लिहा.
तुम्हाला खालील आर्टिकल वाचायला नक्की आवडेल
1) लेखी परीक्षेच्या तयारी साठी क्लास लावणे गरजेचे आहे कि घरी पण योग्य नियोजन करून अभ्यास होऊ शकतो ?

About Mr.Sagar B. Tupe Patil:
राष्ट्रीयकृत बँकेत कार्यरत असणारे Mr. Sagar हे आज SBfied च्या माध्यामतून 40,000 पेक्षा अधिक स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मित्रांच्या संपर्कात आहेत. ग्रामीण भागातून विविध स्पर्धा परीक्षांची तयारी कुठलेही क्लासेस न लावता स्वतः करणाऱ्या असंख्य उमेदवारांना प्रेरित करण्याचे काम ते मागील दोन वर्षांपासून करत आहे.
अश्या जिद्दी आणि मेहनती उमेदवारांना संघटीत करण्याचा आणि ह्या संघटनच्या माध्यमातून अभ्यास आणि अभ्यास साठी आवश्यक प्रेरणा देण्याचे काम आज 24 पेक्षा अधिक WhatsApp ग्रुप, Telegram Channel च्या माध्यमातून होत आहे.
ह्या उपक्रमांमध्ये तुमचीही मदत नक्कीच अपेक्षित आहे. SBFIED Study Initiative च्या माध्यमातून खालील उपक्रम सध्या चालू आहे.
ह्या उपक्रमांमध्ये तुमचीही मदत नक्कीच अपेक्षित आहे.
Thank you sir
सर खूप छान माहिती दिली आहे तुमी पुढील परिषयासाठी कशी तयारी करावी आणि काय करावं हे तुमि छान पद्धतीने सांगितलात खुप छान सर त्याचा खूप फायदा होणार सर ,,,,,,,,,tq sir
Lot of thanks for motivated to all students sir
@ Warkad D.
धन्यवाद. स्पर्धा परीक्षेच्या तयारी बद्दल माहिती सांगणारे अजून काही आर्टिकल तुम्हाला वाचायला आवडेल. तुम्ही खालील लिंक वर क्लिक करून आर्टिकल वाचू शकता :
हे आर्टिकल पोलीस भरती साठी लिहिलेले आहे मात्र त्यातील गोष्टी सर्व स्पर्धा परीक्षांना उपयोगो पडतात
आपण यश मिळवण्यासाठी कोणते सूत्र वापरायला हवे ?