[ New Updates ] Maharashtra Police Bharti 2021 Full Information

Table of Contents

This article is about : Maharashtra Police Bharti 2021 Information, Educational Qualification, Vacancy Details, Age limit, Physical Test, Online Application Fees, Last date, Written Exam, Physical Test, Police Bharti Information

Maharashtra Police Bharti 2021 नेमकी कधी होणार आहे ?

2019 या वर्षी तर फॉर्म भरून घेण्यात आले होते पण मग 2019 या वर्षात भरती झालीच नाही . त्यानंतर 2020 या वर्षी भरती मध्ये 12000 पेक्षा जास्त जागा भरण्याचे गृहमंत्र्यांनी एक बैठकीत सांगितले होते मात्र कोरोना काळात भरती प्रक्रिया प्रत्यक्ष राबवणे शक्य झाले नाही मग आता प्रश्न हा आहे की ही भरती नेमकी कशी आणि कधी होणार आहे ?

Maharashtra Police Bharti बद्दल नेहमी विचारले जाणारे प्रश्न

2019 या वर्षी जाहीर झालेली भरती रद्द झाली आहे का ? [ Is Maharashtra Police Bharti 2019 Canceled? ]

Maharashtra Police Bharti सध्या देशात आलेल्या आरोग्यविषयक संकटामुळे लांबली आहे. देशात सध्या असणाऱ्या कोरोना च्या समस्येमुळे सर्व प्रशासन त्रस्त झाले आहे .
अश्यावेळी अभ्यास करणाऱ्या मित्रांमध्ये फक्त एकच प्रश्न सारखा विचारला जातो –

“Maharashtra Police Bharti कधी होणार आहे ? “

” महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा कॅन्सल झाली आहे का ?”

या महत्वाच्या प्रश्नांचे उत्तर फक्त एकच आहे –

Maharashtra Police Bharti 2019 ही Cancel झालेली नसून फक्त लांबली गेली आहे. यामध्ये अजून नव्या जागा वाढल्या असून आता नवीन जागांची संख्या 12000 पेक्षा जास्त असणार आहे .आणि आता 2021 यावर्षात 2019 आणि 2020 या दोन वर्षांच्या जागांसाठी एकत्रित भरती होणार आहे .

Maharashtra Police Bharti 2021 बद्दल ताज्या बातम्या वाचण्यासाठी समोरील लिंक वर क्लिक करा : पोलीस भरती नवीन बातमी [ Police Bharti Latest Update ]

अजून ह्या एकत्रित होणाऱ्या भरती प्रक्रियेबद्दल तारीख आलेली नाही मात्र जेव्हा भरती प्रक्रिया जेव्हा सुरु होईल त्या वेळी उमेदवारांनी तयार असायला हवे.

पोलीस भरती होण्यासाठी काय करावे लागते ?

पोलीस भरती होण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला दोन चाळणी प्रक्रियेतून पास होऊन पुढे जावे लागते.

  1. लेखी परीक्षा
  2. मैदानी चाचणी

या दोन्ही चाळणी प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती तुम्हाला या पानावर वाचायला मिळेल.

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या प्रत्येक मित्राला मैदानी चाचणी बद्दल थोडीफार तरी माहिती असते परंतु लेखी परीक्षेबाबत त्यांना बरेचसे ज्ञान नसते.

परंतु लक्षात घ्या मित्रांनो ,

पोलीस भरती म्हणजे मैदानी चाचणी नाही.

किंवा फक्त लेखी परीक्षा नाही.

या दोन्ही चाळणी प्रक्रियेतून पास होणारा उमेदवार वर्दी मिळवत असतो.

तुम्हाला या सर्व प्रक्रियेची माहिती व्हावी या दृष्टीने इथे आम्ही सर्व माहिती देत आहोत.

ही माहिती खालील चार भागात विभागलेली आहे.

  1. पोलीस भरती सर्व सामान्य माहिती 
  2. पोलीस भरती लेखी परीक्षेची माहिती
  3. पोलीस भरती मैदानी चाचणीची माहिती.
  4. पोलीस भरती FREE अभ्यास उपक्रम

Maharashtra Police Bharti 2021 Complete Information

Maharashtra Police Bharti 2021 लवकरच सुरु होईल. [ Read all police bharti information in marathi ]

त्यात ह्या वर्षी पोलीस भरती सेवा प्रवेश 2019 मध्ये बदल झाला आहे.

ह्या नवीन सुधारित सेवा प्रवेशानुसार भरती साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला संपूर्ण माहिती हवी ही माहिती इथे देण्याचा प्रयत्न करत आहोत.

बाकी निकषांमध्ये जास्त बदल झालेला नाही मात्र ह्या वर्षी लेखी परीक्षा आधी होणार आहे हे नक्की. बघूया पोलीस भरती प्रक्रियेत काय बदलेले काय आहे तेच आहे.

महाराष्ट्र पोलीस भरती बद्दल राज्यशासनाचा नवीन जी आर तुम्ही वाचला का ? ह्या जी आर मध्ये असणाऱ्या महत्वाच्या गोष्टी तुम्ही इथे वाचू शकता.

Maharashtra Police Bharti 2021 : सामान्य माहिती [ Police Bharti information in Marathi ]

विभागाचे नांव :Police Department
भरती प्रक्रियेचे वर्ष :2021 ( 2019 आणि 2020 या वर्षाची एकत्रित भरती )
पदाचे नांव :1) Police Shipayi
2) Karagruh Shipayi
जागांची संख्या :अंदाजे 12000 पेक्षा अधिक
अर्ज करण्याची पद्धत :Online mode
पे स्केल :5200-20200
(GP 2000+other)
अधिक माहिती साठी mahapolice.gov.in

Maharashtra Police Bharti 2021 -Total Vacancy एकूण जागा


पोलीस भरती 2020 जागा : मागील वर्षी साधारण पणे 3500 पेक्षा अधिक जागा होत्या यामध्ये आणखी जागा वाढून 12000 पेक्षा जास्त जागांसाठी ही भरती होईल.

  • पोलीस शिपाई जागा : अद्याप जाहीर नाही (बदल होण्याची शक्यता )
  • कारागृह शिपाई जागा : अद्याप जाहीर नाही (बदल होण्याची शक्यता )

Maharashtra Police Bharti 2021 – Age Limit : वयोमर्यादा

सेवाप्रवेश अधिनियमानुसार पोलीस भरती परीक्षेसाठी वयोमर्यादा [ police bharti age limit ] ठरवण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी राज्य सरकार द्वारा ह्यात बदल करून वयोमर्यादा वाढवण्याबाबत बातमी प्रकाशित झाली होती पण तूर्तास तरी ह्या मध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाही.

वयोमर्यादा वाढली असता त्याबद्दल लवकरच माहिती अधिकृत संकेत स्थळावर देण्यात येईल.

उमेदवारांनी पोलीस विभागाचे संकेतस्थळाला भेट देऊन त्याबद्दल अधिकृत माहिती घ्यावी.

वयोमर्यादा वाढीबद्दल काही नवीन बदल असेल तर तो आमच्या वाचकांसाठी लवकरच उपलब्ध करून देऊ.

ह्या साठी पोलीस भरतीच्या टेलिग्राम ग्रुप मध्ये सदस्य बनून तुम्ही latest updates मिळवू शकता.

सध्या असणारी वयोमर्यादा :
General Category: 18-28 years Reserve Category: 18-33 years

Police Bharti 2021 – Education Qualification : शैक्षणिक पात्रता

पोलीस भरती प्रकिये साठी निर्धारित करण्यात आलेली शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे आहे

  • पोलीस शिपाई : बारावी पास किंवा समकक्ष
  • कारागृह शिपाई : बारावी पास किंवा समकक्ष

Maharashtra Police Bharti 2021 – Important Dates: महत्वाच्या तारखा

  • Starting date of online Application: अद्याप जाहीर नाही
  • Last date of online Application : परीक्षा फॉर्म याआधीच भरून घेण्यात आले आहे

पोलीस भरती परीक्षेची तारीख अजून जाहीर झालेली नाही मात्र भरती केव्हा होऊ शकते याचे एक विश्लेषण तुम्ही इथे क्लिक करून वाचू शकता : पोलीस भरती परीक्षा : संभावित तारखा

Maharashtra Police Bharti 2021 – Written Exam : लेखी परीक्षा

पोलीस भरती परीक्षा सुधारित सेवा प्रवेश नियमामध्ये बदल करण्यात आलेला असला तरीही लेखी परीक्षेच्या स्वरुपात कोणताही बदल बघण्यास मिळत नाही.

मात्र लेखी परीक्षा आधी होत असल्या कारणाने ह्याचा परिणाम Police Bharti Merit वरती नक्की होणार हे सत्य आहे

नव्याने तयारी करणाऱ्या मित्रांचे पोलीस भरती बद्दल बरेच प्रश्न असतात

  1. लेखी परीक्षा कशी असते ?
  2. कोणकोणत्या विषयावर प्रश्न विचारले जातात ?
  3. प्रश्न किती अवघड असतात?

खाली दिलेली माहिती वाचून तुमच्या

सर्व शंका दूर होतील. मात्र त्यासाठी खालील क्रमाने ही माहिती वाचा आणि तिचा वापर करा.

  1. सर्व प्रथम लेखी परीक्षेचा पॅटर्न बघा
  2. त्यानंतर त्याबद्दल काही महत्वाच्या सूचना दिल्या आहेत त्या वाचा
  3. आणि सर्वात शेवटी काही प्रश्नपत्रिकेचे नमुने दिले आहेत. त्यांचा अभ्यास करा.

Written Exam : लेखी परीक्षा Pattern

विषयगुण
मराठी25
गणित 25
बुद्धिमत्ता 25
सामान्य ज्ञान 25
एकूण100

Written Exam : लेखी परीक्षा [ काही सूचना ]

  1. मैदानी चाचणीसाठी सर्वात आधी लेखी परीक्षा होईल.
  2. नवीन नियमानुसार उमेदवाराला लेखी परीक्षेत खुला प्रवर्गाला 35 % आणि आरक्षित प्रवर्गाला 33 % गुण घेणे आवश्यक असेल.
  3. लेखी परीक्षेची ही पात्रता पूर्ण करणारा उमेदवारच फिजिकल टेस्ट साठी पात्र असेल.
  4. लेखी परीक्षा गुण 100 आणि वेळ 90 मिनिटे इतका असेल
  5. एका जागेसाठी 15 मुले लेखी परीक्षेतून पास करून त्यांची मैदानी चाचणी घेतली जाईल.

Written Exam : लेखी परीक्षा – नमुना प्रश्न पत्रिका

  1. प्रश्न किती अवघड असतील?
  2. मराठी विषयात नेमके काय विचारले जाईल?
  3. गणित विषयात कोणकोणते उदाहरणे सोडवावे लागतील?
  4. बुद्धिमत्ता विषय अवघड असेल की सोपा?
  5. सामान्य ज्ञान विषयात नेमके कोणकोणते प्रश्न विचारले जातील?

ह्या सर्व प्रश्नांचे उत्तरे शोधण्यासाठी खालील पोलीस भरती प्रश्नपत्रिका बघा – म्हणजे तुम्हाला Maharashtra Police Bharti Question Paper चा अंदाज येईल.

free-police-bharti-test-exam
Free Maharashtra Police Bharti 2021 Test दिली का ?

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या भावी पोलिसांसाठी रोज एक फ्री पोलीस भरती टेस्ट घेतली जाते हे तुम्हाला माहिती आहे का ?

Maharashtra Police Bharti 2021 – मैदानी चाचणीची माहिती

पूर्वी पोलीस भरती म्हणजे ग्राउंड किंवा फिजीकल असे गणित होते. म्हणजे जो उमेदवार मैदानी चाचणीत चांगले गुण घेत असे तो उमेदवार लगेच भरती होत असे.

परंतु या वर्षी हे समीकरण बदलणार आहे.

याच्या मागे कारण असे आहे की या वर्षी लेखी परीक्षेवर जास्त भर देण्यात येत आहे.

फक्त लेखी परीक्षेत जास्त गुण घेऊन तुम्ही पोस्ट मिळवण्याचे पक्के करू शकतात.

50 गुणांची मैदानी चाचणी – हे नवे स्वरूप या वर्षी बघायला मिळेल.

पोलीस सेवा प्रवेश सुधारित नियम 2019 नुसार सर्वात जास्त बदल ह्या भागात झालेला पाहायला मिळतो.

ह्यापूर्वीचे फिजिकल टेस्ट चे पात्रता निकष आणि EVENT कठीण होते आता मात्र उमेदवारांसाठी हा नवा बदल सोयीस्कर ठरणार आहे.

फिजिकल टेस्ट मध्ये खालील प्रमाणे बदल झालेले आहे:

  1. फिजिकल टेस्ट आता फक्त 50 मार्कांची असणार आहे
  2. लेखी परीक्षेत पास होणा-या ( खुला प्रवर्ग 35% आणि आरक्षित प्रवर्ग 33% ) असणा-या उमेदवारालाच फिजिकल टेस्ट देता येईल.
  3. लेखी परीक्षेतून एका जागेसाठी 15 असे गुणोत्तर ठरवून फिजिकल टेस्ट साठी उमेदवारांची यादी लावण्यात येईल.

Maharashtra Police Bharti 2021 – Physical Ability : शारीरिक पात्रता

पात्रता निकषउंचीछाती
महिला 155 cm
पुरुष165 cmन फुगवता 79 cm , फुगवून 79 + 5 = 84 cm किंवा अधिक

Maharashtra Police Bharti 2021 – Physical TEST EVENTs – मैदानी चाचणीचे Events

50 गुणांमध्ये खालील event असतील :

Male
1600 meter running30 marks
100 meter running 10 marks
Shot Put 10 marks
Total 50 marks
Female
800 meter running30 marks
100 meter running 10 marks
Shot Put 10 marks
Total 50 marks

या ह्यावर्षी नक्की भरती होऊया ..

पोलीस भरतीची साठी काय करावे लागते? ही प्रक्रिया कशी पार पडते? ही सर्व माहिती तर तुम्ही घेतली.

पण त्यासोबत अभ्यास कसा करावा याबद्दल थोडीशी माहिती मिळाली की तुमचे काम सोयीस्कर होईल.

यासाठी खालील पायऱ्यांचा वापर करा –

  1. सर्वात आधी अभ्यास कसा करायचा हे समजून घ्या.
  2. त्यानंतर अभ्यास करणाऱ्या मित्रांच्या गटात सहभागी व्हा आणि नव्या पद्धतीने अभ्यास करा
  3. आणि सर्वात शेवटी पोलीस भरती बद्दल सर्वात नवीन अपडेट्स मिळविण्यासाठी महाराष्ट्रातील क्रमांक एकचे टेलिग्राम चॅनल जॉईन करा म्हणजे भरतीबाबत काही जरी घडले तरी माहिती तुमच्या पर्यंत लवकरात लवकर येईल.

पोलीस भरती साठी अभ्यास कसा करायचा?

अभ्यास करण्याची एक खास पद्धत असते. याला आपण स्मार्ट पद्धतीने अभ्यास करणे असे म्हणतो.

सध्या वाढलेली स्पर्धा बघता स्मार्ट पद्धतीने अभ्यास करणे गरजेचे आहे अन्यथा भरपूर मेहनत घेऊनही आपल्याला यश मिळेलच याची खात्री देता येत नाही.

खाली काही अभ्यासाला मदत करणारे आर्टिकल दिले आहेत. ते वाचा.

त्यामध्ये अभ्यासाचे नियोजन कसे करायचे? कोणत्या विषयाचा किती अभ्यास करायचा याबद्दल माहिती दिली आहे.

अभ्यासाला मदत करणारे आर्टिकल – क्लिक करून वाचा

पोलीस भरती साठी फ्री स्टडी ग्रुप्स कोणते आहे ?

Free Study Groups for Maharashtra Police Bharti 2021

पोलीस भरती परीक्षेची तयारी चांगली व्हावी आणि त्यासाठी एक चांगला अभ्यास गट असावा ह्या हेतूने प्रेरित आमचा एक फ्री अभ्यास उपक्रम आहे . तयारी साठी तुम्ही त्यात सहभागी होऊ शकता. लिंक पुढे दिली आहे

पोलीस भरती चे नवीन Updates कसे मिळतील ?

Police Bharti Telegram Channel (2021)

पोलीस भरतीच्या सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी खालील टेलिग्राम चॅनल जॉईन करा.

MahaRashtra Police Bharti Telegram Group
1,00,000 भावी Maharashtra Police असणाऱ्या टेलिग्राम चॅनल मध्ये तुम्ही आहात का ?

पोलीस भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या एका महत्वाच्या चॅनल चे तुम्ही सदस्य नसाल तर खालील लिंक वर क्लिक करून लगेच सदस्य व्हा … !
[ तुमच्या मोबाईल मध्ये टेलिग्राम असणे आवश्यक ].

ह्या लेखा मध्ये सर्व नवीनतम माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. अपेक्षा आहे तुमच्या सर्व समस्यांचे समाधान इथे होईल आणि तरीही तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा. तुमच्या शंका सोडवण्याच्या परिपूर्ण प्रयत्न केला जाईल.

29 thoughts on “[ New Updates ] Maharashtra Police Bharti 2021 Full Information”

  1. सतीश थोरात

    सर माझं गणित खूप खराब आहे थोडं पण नाही येत … पण बाकीच्या विषयात जास्त मार्क पडले तर होईल का ? जमेल का ?

  2. Sir mi 12 passed aahe majha domicile certificate pan aahe majha jamstan mumbai aahe pan majha caste certificate other state cha aahe tar mi police bharti cha form bharu sakto ki nay sir

  3. Priyanka Deepak Vatattwad

    सर माझी १२ वी झाली आहे तर मी हे फोम भरू शकते का?

    1. Sir mazi mulgi chi 12th zali ahe tr mi online form ata bharu shakte ka ki ajun online form chi date aali nhi ajun

      1. नाही, भरतीसाठी किमान 12 वी असली पाहिजे. काही डिप्लोमा कोर्स बारावी समकक्ष मानले जातात ते असले तरी फॉर्म भरता येईल.

        1. Sir Mazi 12th zali ahe mg mi police barthi ch form baro sakte ka ?? Mi NT(B) cast madun ahe mg mla kon kintu pashlaliti ahet he sang

    1. प्रेम

      22 July च्या GR नुसार प्रमाण आता 1:10 करण्यात आले आहे.

    1. जो पर्यंत जागा जाहीर होत नाही तोपर्यंत कट ऑफ बद्दल सांगता येणार नाही. परंतु बदलेल्या स्वरूपानुसार स्पर्धा खूप असेल हे नक्की आहे.

      1. सर मी मुंबई हिन्दी विद्यापीठ मधुन दाहावी आणि बारावी पास आहे पण ते पोलिस भरती ला चालत नाही तर मी ycmमुक्त विद्यापीठ मधुन fybaपास आहे पोलिस भरती ला चालते का

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!