Maharashtra Police Bharti 2019-20 Information

This article is about : Maharashtra Police Bharti 2019 Information, Educational Qualification, Vacancy Details, Age limit, Physical Test, Online Application Fees, Last date, Written Exam, Physical Test,

महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रिया विधानसभा निवडणुकी पूर्वी होण्याची शक्यता आता मावळत चालली आहे. कारण त्या दिशेने प्रयत्न होत असल्याचे लक्षात येत नाही.

मात्र भरती प्रक्रिया जेव्हा सुरु होईल त्या वेळी उमेदवारांनी तयार असायला हवे. नव्याने तयारी करणाऱ्या मित्रांचे पोलीस भरती बद्दल बरेच प्रश्न असतात आणि त्यांचे उत्तरे त्यांना शोधणे कठीण जाते म्हणून या लेखा मध्ये ते सर्व मुद्दे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.

ह्या व्यतिरिक्त तुमचे पोलीस भरती बद्दल अजून काही प्रश्न असतील तर खालील comment बॉक्स मध्ये नक्की विचारा. तुम्ही विचारलेल्या बऱ्याच प्रश्नांना उत्तरे खालील page वर दिली जातात. इथे क्लिक करून तुम्ही त्या page ला भेट देऊ शकता.


Maharashtra Police Bharti 2019 Complete Information

Maharashtra Police Bharti 2019 लवकरच सुरु होईल. त्यात ह्या वर्षी पोलीस भरती सेवा प्रवेश 2019 मध्ये बदल झाला आहे. ह्या नवीन सुधारित सेवा प्रवेशानुसार भरती साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला संपूर्ण माहिती हवी ही माहिती इथे देण्याचा प्रयत्न करत आहोत.

बाकी निकषांमध्ये जास्त बदल झालेला नाही मात्र ह्या वर्षी लेखी परीक्षा आधी होणार आहे हे नक्की. बघूया पोलीस भरती प्रक्रियेत काय बदलेले काय आहे तेच आहे.

Maharashtra Police Bharti 2019 : सामान्य माहिती

विभागाचे नांव :Police Department
भरती प्रक्रियेचे वर्ष :2019-2020
पदाचे नांव :1) Police Shipayi
2) Karagruh Shipayi
जागांची संख्या :अद्याप जाहीर नाही
अर्ज करण्याची पद्धत :Online mode
पे स्केल :5200-20200
(GP 2000+other)
अधिक माहिती साठी mahapolice.gov.in

Maharashtra Police Bharti 2019 -Total Vacancy एकूण जागा

भरती प्रक्रिया अजून जाहीत झालेली नसल्यामुळे ह्या वर्षी किती जागा आहेत हे अजून स्पष्ट नाही , मात्र प्राथमिक अंदाजानुसार सात ते दहा हजाराच्या आसपास जागा भरल्या जाण्याची शक्यता आहे.

 • पोलीस शिपाई जागा : अद्याप जाहीर नाही
 • कारागृह शिपाई जागा : अद्याप जाहीर नाही

Maharashtra Police Bharti 2019 – Age Limit : वयोमर्यादा

सेवाप्रवेश अधिनियमानुसार पोलीस भरती परीक्षेसाठी वयोमर्यादा ठरवण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी राज्य सरकार द्वारा ह्यात बदल करून वयोमर्यादा वाढवण्याबाबत बातमी प्रकाशित झाली होती पण तूर्तास तरी ह्या मध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाही.

वयोमर्यादा वाढली असता त्याबद्दल लवकरच माहिती अधिकृत संकेत स्थळावर देण्यात येईल. उमेदवारांनी पोलीस विभागाचे संकेतस्थळाला भेट देऊन त्याबद्दल अधिकृत माहिती घ्यावी.

वयोमर्यादा वाढीबद्दल काही नवीन बदल असेल तर तो आमच्या वाचकांसाठी लवकरच उपलब्ध करून देऊ. ह्या साठी पोलीस भरतीच्या टेलिग्राम ग्रुप मध्ये सदस्य बनून तुम्ही latest updates मिळवू शकता.

सध्या असणारी वयोमर्यादा :

General Category: 18-28 years Reserve Category: 18-28 years

Police Bharti 2019 – Education Qualification : शैक्षणिक पात्रता

पोलीस भरती प्रकिये साठी निर्धारित करण्यात आलेली शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे आहे

 • पोलीस शिपाई : बारावी पास किंवा समकक्ष
 • कारागृह शिपाई : बारावी पास किंवा समकक्ष

Maharashtra Police Bharti 2019 – Physical Ability : शारीरिक पात्रता

पात्रता निकषउंचीछाती
महिला155 cm
पुरुष165 cmन फुगवता 79 cm , फुगवून 79 + 5 = 84 cm किंवा अधिक

Maharashtra Police Bharti 2019 – Important Dates: महत्वाच्या तारखा

 • Starting date of online Application: अद्याप जाहीर नाही
 • Last date of online Application: अद्याप जाहीर नाही

पोलीस भरती परीक्षेची तारीख अजून जाहीर झालेली नाही मात्र भरती केव्हा होऊ शकते याचे एक विश्लेषण तुम्ही इथे क्लिक करून वाचू शकता : पोलीस भरती परीक्षा : संभावित तारखा


Maharashtra Police Bharti 2019 – Written Exam : लेखी परीक्षा

पोलीस भरती परीक्षा सुधारित सेवा प्रवेश नियमामध्ये बदल करण्यात आलेला असला तरीही लेखी परीक्षेच्या स्वरुपात कोणताही बदल बघण्यास मिळत नाही. मात्र लेखी परीक्षा आधी होत असल्या कारणाने ह्याचा परिणाम Police Bharti Merit वरती नक्की होणार हे सत्य आहे

विषयगुण
मराठी25
गणित 25
बुद्धिमत्ता 25
सामान्य ज्ञान 25
एकूण100

नवीन नियमानुसार उमेदवाराला लेखी परीक्षेत खुला प्रवर्गाला 35 % आणि आरक्षित प्रवर्गाला 33 % गुण घेणे आवश्यक असेल. लेखी परीक्षेची ही पात्रता पूर्ण करणारा उमेदवारच फिजिकल टेस्ट साठी पात्र असेल.

लेखी परीक्षा गुण 100 आणि वेळ 90 मिनिटे

पोलीस भरती परीक्षेची तयारी चांगली व्हावी आणि त्यासाठी एक चांगला अभ्यास गट असावा ह्या हेतूने प्रेरित आमचा एक फ्री अभ्यास उपक्रम आहे . तयारी साठी तुम्ही त्यात सहभागी होऊ शकता. लिंक पुढे दिली आहे


Maharashtra Police Bharti 2019 – Physical test : फिजिकल टेस्ट

पोलीस सेवा प्रवेश सुधारित नियम 2019 नुसार सर्वात जास्त बदल ह्या भागात झालेला पाहायला मिळतो. ह्यापूर्वीचे फिजिकल टेस्ट चे पात्रता निकष आणि EVENT कठीण होते आता मात्र उमेदवारांसाठी हा नवा बदल सोयीस्कर ठरणार आहे.

फिजिकल टेस्ट मध्ये खालील प्रमाणे बदल झालेले आहे:

 1. फिजिकल टेस्ट आता फक्त 50 मार्कांची असणार आहे
 2. लेखी परीक्षेत पास होणा-या ( खुला प्रवर्ग 35% आणि आरक्षित प्रवर्ग 33% ) असणा-या उमेदवारालाच फिजिकल टेस्ट देता येईल.
 3. एका जागेसाठी पाच असे गुणोत्तर ठरवून फिजिकल टेस्ट साठी उमेदवारांची यादी लावण्यात येईल.

50 गुणांमध्ये खालील event असतील :

Male
1600 meter running30 marks
100 meter running 10 marks
Shot Put 10 marks
Total 50 marks
Female
800 meter running30 marks
100 meter running 10 marks
Shot Put 10 marks
Total 50 marks

ह्या लेखा मध्ये सर्व नवीनतम माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. अपेक्षा आहे तुमच्या सर्व समस्यांचे समाधान इथे होईल आणि तरीही तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा. तुमच्या शंका सोडवण्याच्या परिपूर्ण प्रयत्न केला जाईल.

Share

Comments वाचा

  • 22 July च्या GR नुसार प्रमाण आता 1:10 करण्यात आले आहे.

 • Police Bharti madhe Lekhi ch cut off sebc category plus bhukampgrast andaje kiti lagel.

  • जो पर्यंत जागा जाहीर होत नाही तोपर्यंत कट ऑफ बद्दल सांगता येणार नाही. परंतु बदलेल्या स्वरूपानुसार स्पर्धा खूप असेल हे नक्की आहे.

 • Sir 12vi samkaksha mhanje Kay?
  Maza diploma zalele asen tar mi form bharu shakto ka