नेमके काय बदलयं?

(Last Updated On: March 12, 2018)
2,195 Views

दिवसेंदिवस जसे जसे आधुनिकीकरण होत आहे तसे तसे माणूस म्हणायला जवळ येतोय पण वास्तवीक पाहता तो एकमेंकापासून दूर चाललायं 😖
पुर्वी दिवसभर बाहेर असणारे लोक घरी आल्यावर दिवसभराच्या गमतीजमती ,ताणतणाव सर्व सांगायचे. मजेत गप्पा व्हायच्या पण आता तसं राहिलं नाही.११वीत जाणारं कालपर्यंत लहान असणारं मुलं आता बिझी व्हायला लागलेयं
समोरासमोर असणारे दोघं भाऊ/ मित्र  आता बोलतं नाही🤫 ते दुसरा कुणीतरी उपस्थित नसलेल्या व्यक्ति शी बोलत असतात.
आईबाबापासून  शिक्षणासाठी  दूर असणारी मुलं सुट्टीसाठी येताना बसमध्ये बसताना पहिलं status बदलतातं .”miss you guys….😔
मान्य आहे असू शकतो जिव्हाळा पण तो दाखवायलाच  हवा असं नाही नं….
अन् समजा ही संदेशवहनाची साधनं नसतीच तर……🖥📱📞
कुणी म्हणेल आहे तर का वापरु नये? हो पण काही मर्यादा नको का?
आम्ही देवदर्शनाला जातो पण सर्व लक्ष बाहेर आल्यावर बाहेरचा परिसर आपल्याबरोबर फोटोत घ्यायचा असतो
ठीक आहे म्हणा ठेवावा आठवण म्हणून पण किती…? चार पाच की चारशे पाचशे😇😇
अन आता तर काय कुणाची गरजचं नसते म्हणा selfi च्या नावाखाली😜😜
मान्य आहे नवीन शोध लागल्याने माणसाला अनेक गोष्टी सोयीच्या झाल्यात पण माणुस एकलकोंडा झालायं हे नक्की….😏..
तासनंतासं मित्रांशी whats’up वर टाइमपास करणारी काहीजणं घरुन फोन आल्यावर रोज तेच काय बोलायचं (जेवला का? बरी आहेस नं?) असं बोलून थोडक्यात अपमानचं करतो नाही का?
आजी आजोबांच्या आठवणी ऐकायला आता आम्हाला सवड नाही🙅🏼‍♀
पूर्वी सारखी सणाची मजा नाही आता आम्ही मोबाइल मधून रंगमंचमी साजरी करतो फटाके सुद्धा फोडतो….
वाढदिवसाला आपल्याला फोनवरून विश केलं तरी आम्ही जाम खूश😉 केक च्या इमेजेस 🎂ने आमचं पोट भरतं
राष्ट्रीय सणाला आपला dp बदलून ध्वज ठेवला तर ते आमचं देशप्रेम असतं☝🏻
असं एकंदरीत माझं अन् माझ्या सारख्या अनेकांचं आयुष्य या आधुनिकीकरणाने तोकडं केलयं😟
अन आता हेच 😶वास्तव आहे

आमचे  facebook page लाइक करा... Sbfied

वरिल माहिती परवानगी शिवाय वापरने COPYRIGHT ACT नुसार गुन्हा आहे. आपण www.kavachkundale.wordpress.com हे नमुद करून ही माहिती वापरू शकता.

5 thoughts on “नेमके काय बदलयं?”

Leave a Comment

Your email address will not be published.

Don`t copy text!