latest update of Pavitra portal

Pavitra Portal Merit List for with and without Interview post

(Last Updated On: June 1, 2021)
3,065 Views

Latest notice is updated on Pavitra Portal for Merit List of With and Without Interview post of the teacher recruitment process. Now candidates are having something solid to rely upon.

Latest Notice for Pavitra Portal Merit List

पवित्र पोर्टल वर प्रसिद्ध झालेल्या सर्व नवीन सूचना दिनांकानुसार या पेजवर अपडेट केलेल्या आहेत

Pavitra Portal Latest Notice : 14.05.2021

तांत्रिक कारणास्तव शिफारस /निवड न झालेल्या उमेदवारांसाठी तसेच इयत्ता ९ वी ते इयत्ता १२ वी या गटातील नियुक्तीसाठी अपात्र ,गैरहजर व रुजू न झालेल्या उमेदवारांच्या रिक्त जागांसाठी राउंड.

 1. श्रीमती सोनम जोगदंड यांनी याचिका क्र ११२८५/२०१९ ,श्री यादव ठोंबरे यांनी याचिका क्र १११०८ /२०१९ मध्ये त्यांच्या अर्हतेचे विषय व आरक्षण विचारात घेऊन त्यांच्यापेक्षा कमी गुण असलेल्या उमेदवाराची शिफारस/निवड झाल्यामुळे मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे याचिका दाखल केलेल्या आहेत. तसेच श्रीमती श्रुतिका सव्वालाखे यांनी त्यांची शिफारस/निवड न झाल्याने मा. उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे याचिका ७०५१/२०१९ दाखल केलेली आहे. उक्त दाखल याचिका तसेच अन्य याचिका प्रकरणी पुढील आवश्यक कार्यवाही करावयाची आहे. त्याचप्रमाणे विविध उमेदवारांची प्राप्त निवेदने विचारात घेऊन पवित्र पोर्टल मार्फत शिफारस/निवडीसाठी पात्र उमेदवारांच्या नियुक्तीसाठी शिफारस करण्याची कार्यवाही खालील प्रमाणे करण्यात येत आहे.
 2. यापूर्वी पवित्र पोर्टल मार्फत शिफारस/निवडीसाठी प्रसिद्ध केलेल्या पात्र उमेदवारांच्या यादीच्या वेळी संबंधित प्रवर्गाचे आरक्षण व उपलब्ध विषय यानुसार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमता चाचणी (TAIT) परीक्षेत गुण असताना देखील काही उमेदवारांच्या डेटा मधील तांत्रिक अडचणीमुळे त्यांची नियुक्तीसाठी पोर्टल मार्फत शिफारस/निवड झालेली नाही. अशा उमेदवारांसाठी सदर राउंड घेण्यात आलेला आहे. या राउंड मध्ये गुणवत्तेनुसार उमेदवार त्या त्या वेळी शिफारस/निवडीसाठी पात्र ठरले असते, म्हणजेच विषय व आरक्षण विचारात घेता cutoff गुणांपेक्षा टेट परीक्षेत अधिक गुण असल्याने शिफारस/निवड होणे आवश्यक होते, अशा उमेदवारांचा विचार करण्यात आलेला आहे. यादीतील उमेदवारांनी कोविड-१९ च्या मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांचेकडे पुढील कार्यवाहीसाठी संपर्क साधावा.
 3. पवित्र पोर्टल मार्फत मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या संस्थांतील इयत्ता ९ वी ते इयत्ता १२ वी या गटातील नियुक्तीसाठी शिफारस पात्र उमेदवारांची दिनांक ७/२/२०२० रोजी यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर यादीतील उमेदवारांच्या नियुक्तीसाठी संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांनी उमेदवारांची पात्रता पडताळणी करून पात्र असणाऱ्या उमेदवारांना नियुक्ती आदेश दिलेले आहेत. विहित मुदतीनंतर कागदपत्र पडताळणी मध्ये अपात्र ठरलेले,कागदपत्र पडताळणी साठी गैरहजर राहिलेले, नियुक्ती आदेश देऊनही विहित मुदतीत रुजू न झालेले उमेदवार अशा एकूण १९६ रिक्त जागांवर पवित्र पोर्टलमधील यादीतील गुणवत्तेनुसार उर्वरित पात्र उमेदवार संबंधित व्यवस्थापनाच्या मागणीनुसार उपलब्ध करून देण्यासाठी सदर राउंड घेण्यात आलेला आहे.
 4. दिनांक ७/२/२०२० रोजी पवित्र पोर्टल मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीतील अपात्र,गैरहजर,रुजू न झालेले उमेदवार यामुळे यादीतील गुणवत्तेनुसार उर्वरित पात्र उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस/निवड करण्यासाठी शिल्लक आरक्षण, अपात्र,गैरहजर उमेदवार यांच्यामुळे उपलब्ध झालेले आरक्षण व उपलब्ध विषय विचारात घेण्यात आलेले आहेत .
 5. इयत्ता ९ वी ते इयत्ता १२ वी या गटातील नियुक्तीसाठी अपात्र,गैरहजर,रुजू न झालेले उमेदवार यांच्यासाठीचा राउंड घेतल्यानंतरही काही समांतर आरक्षण व विषय शिल्लक राहत असल्याने शिल्लक समांतर आरक्षण (माजी सैनिक व भूकंपग्रस्त वगळून) व उपलब्ध विषय विचारात घेऊन Converted Round घेण्यात आलेला आहे.
 6. सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय दि २३/१२/२०२० नुसार एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारानी ईडब्लूएस प्रवर्गात केलेला ऐच्छिक बदल विचारात घेऊन शिफारस पात्र उमेदवारांची शिफारस/निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
 7. मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल याचिका क्रमांक २७१८/२०२० व अन्य दाखल याचिकांतील निर्णयाच्या अधीन राहून नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांची शिफारस/निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
 8. मुलाखतीसह पदभरती बाबतच्या सूचना स्वतंत्रपणे देण्यात येतील.

Pavitra Portal Latest Notice : 15.02.2021

याचिका क्रमांक ११०८१/२०१९ प्रकरणी समांतर आरक्षण राऊंड

 1. मा.उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथील याचिका क्र.11081/2019 च्या दि.03/02/2020 व दि.02/03/2020 चे अंतरिम आदेशानुसार सदर निकाल प्रसिद्ध करण्यात येत आहे. तसेच सदर निकाल मा.उच्च न्यायालयातील विविध याचिकांच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात येत आहे.
 2. पवित्र प्रणालीमार्फत पदभरती करताना ऑनलाइन पद्धतीने पोर्टलअंतर्गत इंटरनल राऊंड घेऊन अंतिम निवड यादी दि.09/08/2019 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. असे करताना इंटरनल राऊंड मध्ये (विषयानुसार समांतर आरक्षणातील उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळे कन्व्हर्ट केलेला राऊंड) ज्या उमेदवारांची निवड त्यांच्या खालच्या पसंतीक्रमावर झालेली होती त्यांना त्यांच्या वरच्या पसंतीक्रमावर जागा मिळाल्यामुळे (बेटरमेंट) काही विषयाच्या जागा पुन्हा रिक्त झाल्या. या रिक्त जागा त्या त्या प्रवर्गातील समांतर आरक्षणाशिवाय खुल्यामध्ये कन्व्हर्ट झाल्या. असे करतेवेळी समांतर आरक्षणातील काही उमेदवार वगळले गेल्याचे निदर्शनास आले होते. मा.उच्च न्यायालयामध्ये यासंदर्भात याचिका दाखल केली गेली आहे.
 3. उपलब्ध रोस्टर,उमेदवारांनी दिलेले प्राधान्यक्रम व विषयानुसार उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळे समांतर आरक्षणातील जागा त्या त्या प्रवर्गातील खुल्यामध्ये कन्व्हर्ट केल्या नसत्या तर ज्या उमेदवारांची निवडीसाठी शिफारस झाली असती त्यांच्यासाठी हा निकाल आहे.
 4. विषयानुसार उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळे त्या त्या समांतर आरक्षणातील खुल्या मध्ये कन्व्हर्ट केलेल्या जागा त्या त्या समांतर आरक्षणामध्ये दर्शवून उमेदवारांची शिफारस पात्र यादी जाहीर करण्यात येत आहे.
 5. उपरोक्त मुद्दा क्र.2 मध्ये नमूद केल्यानुसार समांतर आरक्षणातील जागा त्या त्या प्रवर्गातील खुल्यामध्ये कन्व्हर्ट केल्यामुळे उपलब्ध रोस्टर स्थितिनुसार आता शिफारसपात्र उमेदवारांच्या नियुक्तीसाठी पद उपलब्ध असेलच असे नाही. जेथे पद उपलब्ध होत नाही त्या उमेदवारांसाठी त्यांचा प्रवर्ग, विषय व इतर प्राधान्यक्रम विचारात घेऊन ज्या व्यवस्थापनाकडे जागा रिक्त आहे तेथे नियुक्ती देण्याबाबत शासन मान्यतेने कार्यवाही करण्यात येईल. त्यामुळे शिफारस झालेल्या सर्वच 35 उमेदवारांना सध्या नेमणूक देता येणार नाही. ज्या संस्थेमध्ये उपलब्ध रोस्टरनूसार पद आहे त्या ठिकाणी मात्र निवड झालेल्या पात्र उमेदवारांना त्या त्या व्यवस्थापनाकडून नेमणूक मिळेल. यातील 3 उमेदवारांबाबत मा. उच्च न्यायालय व मा. सर्वोच्च न्यायालयाचे आदेशानुसार कार्यवाही करण्यात येईल. सद्यस्थितीत 32 उमेदवारांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे .
 6. सदर निकाल हा दि.09/08/2019 च्या निकालाच्या स्थितीवर तयार करण्यात आलेला आहे. त्यामुळे या निकालात दि.07/02/2020 च्या राऊंड मध्ये निवडीसाठी शिफारस झालेल्या काही उमेदवारांचा समावेश आहे . तथापि या उमेदवारांना नव्याने शिफारस झालेल्या पदावर रुजू होण्याचा विकल्प राहील
 7. मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथील याचिका क्र. 196/2020, 222/2020 व 446/2020 मधील दि.18/2/2020 रोजीच्या मा.न्यायालयाच्या आदेशानुसार याचिकाकर्त्यांना स्वतंत्रपणे कळविण्यात येत आहे.

Pavitra Portal Latest Notice : 08.02.2021

बृहन्मुंबई महानगरपालिका पदभरती

 1. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जाहिरातीनुसार दि. ०९/०८/२०१९ रोजी शिफारस पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली होती. मुंबई पब्लिक स्कुल (MPS) व प्राथमिक शिक्षण विभाग (UPS) या दोन प्रकारात उपलब्ध करून देण्याची मागणी विचारात घेता सदर उमेदवारांची दि. ०३/१२/२०१९ रोजी सुधारित शिफारस पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे . सदर यादीमध्ये तांत्रिक कारणास्तव मुंबई पब्लिक स्कुल (MPS) गटातील पदासाठी काही उमेदवारांचा समावेश झालेला नाही, असे निदर्शनास आल्यानंतर सदर मुंबई पब्लिक स्कुल (MPS) यादीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांची शिफारसपात्र यादी मा. उच्च न्यायालयातील विविध याचिकांच्या अधिन राहून पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येत आहे .
 2. यादीतील उमेदवारांनी शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका यांचेकडे नियुक्तीसाठी आवश्यक कागदपत्र पडताळणी व पुढील कार्यवाहीसाठी दि. १५/०२/२०२१ पर्यंत संपर्क साधावा.

( New Notice ) पवित्र पोर्टल वरील नवीन सूचना :

दिनांक :- ०७/०२/२०२०

सूचना

इ ९ वी ते इ १२ वी या गटातील खाजगी संस्थातील रिक्त पदासाठी शिफारस पात्र उमेदवाराची यादी

१). मा.उच्च न्यायालय,खंडपिठ नागपूर येथील याचिका क्र ४०७९/२०१९ मध्ये दि २८/०८/२०१९ रोजी दिलेल्या निर्णयानुसार खाजगी संस्थेतील इ. ९ वी ते इ १२ वी या गटातील पदासाठी महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी (सेवेच्या शर्ती ) नियमावली १९८१ नुसार खाजगी माध्यमिक शाळेतील ( इ ९ वी ते इ १० वी) पदासाठी उत्तीर्ण आणि उच्च माध्यमिक शाळेतील ( इ ११ वी ते इ १२ वी) पदासाठी किमान व्दितीय श्रेणी असणा-या उमेदवारांना विचारांत घेऊन नव्याने प्रक्रिया करण्यात आलेली आहे.

२). मा. उच्च न्यायालय , खंडपिठ औरंगाबाद येथील याचिका क्र. ७९३८/२०१९ With C.A. ९९८/२०२० , याचिका क्र. ८००१/२०१९ With C.A. ८३०/२०२० व याचिका क्र. १२६०३/२०१९ मध्ये दिनांक ३१/०१/२०२० रोजी दिलेल्या निर्णयानुसार OBC या संवर्गासाठीची एक जागा वगळून इयत्ता ९ वी ते १२ वी या गटातील पदासाठी शिफारस पात्र ८३८ उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे.

३). मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या १० खाजगी शैक्षणिक संस्थातील आरक्षण आणि रिक्त पदे यानुसार शिफारस पात्र उमेदवारांच्या संस्थानिहाय शिफारस पात्र उमेदवारांची यादी ((Graduate Teacher (9 to 12) Round-8)) आणि शासन परवानगी प्राप्त झाल्याने माजी सैनिक व अन्य शिल्लक समांतर आरक्षणातील (भूकंपग्रस्त) वगळता योग्य उमेदवार उपलब्ध झाले नाहीत अशी पदे त्या त्या प्रवर्गातील ‘Pure’ मध्ये रूपांतरित करून गुणवतेनुसार दुसरी शिफारस पात्र उमेदवारांची यादी ((Graduate Teacher (9 to 12) Converted Round-9)) प्रसिद्ध करण्यात येत आहे.

४). रयत शिक्षण संस्था सातारा, श्री स्वामी शिक्षण संस्था कोल्हापूर, महात्मा फुले शिक्षण संस्था इस्लामपूर ता. वाळवा जिल्हा सांगली या संस्थांच्या दोन याद्या ((Graduate Teacher (9 to 12) Round-8 And Graduate Teacher (9 to 12) Converted Round-9)) तर उर्वरित ७ संस्थाची शिफारस पात्र उमेदवारांची यादी ((Graduate Teacher (9 to 12) Round-8)) प्रसिद्ध करण्यात येत आहेत.

५). शिफारस पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. उमेदवारांच्या लॉगिनवर निवडीचा तपशील उपलब्ध करण्यात आलेला नाही. त्यामुळे उमेदवारांनी पवित्र पोर्टल वरील Applicant वर क्लिक केल्यानंतर होम पेज वर उपलब्ध असलेली शिफारस पात्र उमेदवारांची यादी पहावी.

६).यादीतील उमेदवारांनी पुढील कार्यवाहीसाठी आपल्याशी संबंधित संस्थेच्या नियुक्ती प्राधिकारी यांचेशी दि. १५/०२/२०२० पर्यंत संपर्क साधावा.

मुलाखती सह होणाऱ्या शिक्षक भरती साठी बातमी :

मुलाखती सह होणाऱ्या पदभरती साठी अजूनही तारीख ठरलेली नाही. कारण बऱ्याच बदलेल्या प्रक्रियेनुसार भरती प्रक्रिया लांबत जात आहे. पवित्र पोर्टल वर आलेल्या सुचनेनुसार भरती प्रक्रियेतील सर्व पदे ( बदलेल्या नियमानुसार ) भरल्यानंतर मुलाखती सह भरल्या जाणाऱ्या पदांची यादी जाहीर करण्यात येणार आहे.

( Old Notice ) पवित्र पोर्टल वरील नवीन सूचना :

पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरतीच्या दुस-या टप्प्यामध्ये उमेदवारांच्या नियुक्तीसाठी शिफारस करण्याची निवड यादी प्रसिद्ध करण्याचा क्रम खालीलप्रमाणे असेल.

१.बृहन्मुंबई मनपा शाळा (सुधारित यादी)
२. उर्दू माध्यमाच्या शाळांतील रिक्त राहिलेली पदे
३. मा. उच्चन्यायालय, नागपुर यांचे आदेशानुसार इ. ९ वी ते इ. १ २ वी खाजगी संस्थांमधील पदांची निवड यादी
४. वरील सर्व निवड यादी व्यतिरिक्त रिक्त राहिलेल्या माजी सैनिक प्रवर्गातील रिक्त पदांची निवड यादी
५. मुलाखतीसह खाजगी संस्थामधील पदांसाठीची निवड यादी
वरील क्रमाने प्रसिद्ध होणा-या निवड यादीत उमेदवारांची एकदा शिफारस झाल्यास पुढील कुठल्याही यादीत त्यांचा निवड प्रक्रियेसाठी विचार होणार नाही, याची उमेदवाराने नोंद घ्यावी.

ब) उर्दू माध्यम रिक्त पदे

१. पवित्र प्रणाली अंतर्गत दि०९/०८/२०१९रोजी नियुक्तीस शिफारस पात्र उमेदवारांची निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर उर्दू माध्यमाच्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व अन्य प्रवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी उमेदवार उपलब्ध नसल्याने सदर रिक्त पदे खुल्या प्रवर्गातून भरण्यासाठी शासनाने परवानगी दिलेली आहे.
२. शिल्लक राहिलेली समांतर आरक्षणासह आरक्षित पदे खुल्या प्रवर्गामध्ये समांतर आरक्षणा सह दर्शविण्यात आलेली आहेत त्यामुळे खुला प्रवर्ग विचारात घेऊन पात्र उमेदवारांना प्राधान्यक्रम देण्यात येणार आहेत.
3.ज्या उमेदवारांची यापूर्वीच्या दि.०९/०८/२०१९ च्या निवडयादी मध्ये शिफारस झालेली नाही. अशा सर्व पात्र उमेदवारांना पुन्हा प्राधान्यक्रम भरणे आवश्यक आहे. त्याशिवाय उमेदवाराचा शिल्लक ‍रिक्त पदावरील पद भरतीसाठी विचारात घेतले जाणार नाही.
४.यापूर्वी दिलेले प्राधान्यक्रम प्रथम निवड यादीसाठी विचारात घेण्यात आलेले आहेत.त्यामुळे यापूर्वीचे प्राधान्यक्रम विचारात घेऊन कार्यवाही पूर्ण झालेली आहे. उर्वरीत रिक्त पदे खुल्या प्रवर्गातून नव्याने भरण्यात येणार असल्यामूळे पात्र सर्व उमेदवारांकडून नव्याने प्राधान्यक्रम मागविण्यात येत आहेत. त्यामुळे पात्र सर्व उमेदवारांनी रिक्त पदांसाठी नव्याने प्राधान्यक्रम देणे आवश्यक आहे.
५.सदर उर्दू माध्यमातील रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारा कडून प्राधान्यक्रम मागविण्यात येणार आहेत. ज्या उमेदवारांचे शिक्षण उर्दू माध्यमातून झालेले आहे त्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार प्राधान्यक्रम उपलब्ध होतील. प्राधान्यक्रम मागविण्याचा कालावधी पोर्टलवर कळविण्यात येईल .
६. दि.०९/०८/२०१९ रोजी प्रसिद्ध केलेल्या यादी नंतर प्रवर्ग निहाय रिक्त राहिलेल्या समांतर आरक्षणातील जागा खुल्या प्रवर्गातील समांतर आरक्षणा मध्ये नमूद करण्यात आलेल्या आहेत. समांतर आरक्षण व PURE प्रवर्गातील पदे विचारात घेऊन शिफारस पात्र उमेदवारांची पहिली निवड यादी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर समांतर आरक्षणातील उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळे समांतर आरक्षणातील रिक्त राहणारी पदे PURE प्रवर्गा मध्ये रूपांतरित करून उर्वरित सर्वच उमेदवारांना विचारात घेऊन स्वतंत्रपणे शिफारसपात्र उमेदवारांची दुसरी निवडयादी प्रसिद्ध करण्यात येईल. पहिल्या यादी मध्ये शिफारस केलेल्या उमेदवारांना दुस-या यादीमध्ये Betterment चा पर्याय राहणार नाही याची नोंद घ्यावी. वरील बाब विचारात घेवूनच प्राध्यान्यक्रम द्यावेत .
७.पद भरतीसाठी उपलब्ध होणारी खुला प्रवर्गातील समांतर आरक्षणनिहाय ,गट, विषयनिहाय शिल्लक रिक्त पदे उमेदवारांना पवित्र पोर्टल च्या होम पेजवर Management-wise urdu medium vacant Post या Menu अंतर्गत Zilla Parishad, Mahanagarpalika,NagarPalika यावरClick करून त्या त्या व्यवस्थापनाच्या शिल्लक रिक्त पदाची स्थिती पाहता येईल.
८. बृहन्मुंबई महानगरपालिका व खाजगी संस्थातील (मुलाखती शिवाय पर्याय निवडलेल्या) इ. ९ ते इ. १२ साठीची या पूर्वीची निवड यादी सुधारित होणार असल्याने या संस्थांमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना उर्दू माध्यमासाठी पात्र असल्यास त्यांना प्राध्यान्यक्रम देण्यात येणार आहेत.
९. उर्दू माध्यमातील माजी सैनिकांची सर्व रिक्त पदे खुल्या प्रवर्गातील PURE प्रवर्गामध्ये रुपांतरीत करण्यात आलेली आहेत.
१0.उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केल्यांनतर (मोबाईल क्रमांकावर OTP प्राप्त झाल्यानंतर लॉग आऊट करण्यापूर्वी) Report Menu मध्ये जाऊन लॉक केलेल्या प्राधान्यक्रमाची स्वतःच्या माहितीसाठी प्रिंट कॉपी स्वतःकडे ठेवावी.

क) खाजगी शाळातील इ ९ वी ते इ १२ वी नियुक्ती बाबत

१. मा.उच्चन्यायालय,खंडपीठ नागपूर येथील याचिका क्र ४०७९/२०१९ मध्ये दिलेल्या निर्णयानुसार ज्या उमेदवारांना ५० टक्केपेक्षा कमी गुण असल्यामुळे प्राधान्यक्रम आलेले नाहीत त्यांना महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी (सेवेच्याशर्ती ) नियमावली१९८१ नुसार खाजगी माध्यमिक शाळेसाठी उत्तीर्ण आणि उच्च माध्यमिक शाळेसाठी किमान व्दितीय श्रेणी असणा-या उमेदवारांना प्राधान्यक्रम देऊन या उमेदवारांसह यापूर्वी प्राधान्यक्रम दिलेले उमेदवार यांची जाहिराती नुसार आरक्षण,विषय, प्राधान्यक्रम विचारात घेऊन गुणवतेनुसार इ. ९ वी ते इ १२वी या गटासाठी सुधारित शिफारस पात्र यादी तयार करण्यात येणार आहे.
२. यापूर्वी मुलाखतीशिवाय निवडीसाठी खाजगी व्यवस्थापनाच्या इ ९ वी ते इ १२ वी ची दि ०९/०८/२०१९ रोजी प्रसिद्ध केलेली शिफारस पात्र यादी रद्द करण्यात येत आहे.
३. ज्या उमेदवारांना या पूर्वी इ. ११ वी ते इ. १२ वी या गटासाठी ५० टक्केपेक्षा कमी गुण असल्यामुळे प्राधान्यक्रम आलेले नाहीत त्यांच्या पदव्युत्तर पदवीच्या श्रेणीची माहिती यापूर्वी पोर्टलवर घेण्यात आलेली नसल्यामुळे केवळ अशा उमेदवारांकडून किमान व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण असल्याची माहिती घेण्यात येणारआहे.
४. त्यानंतर या माहितीच्या आधारे उमेदवारांच्या शैक्षणीक अर्हतेमध्ये इ.९वीतेइ. १०वी या गटातील पदांसाठी पदवीमध्ये उत्तीर्ण परंतु, ५० टक्केपेक्षा कमी गुण असणा-या उमेदवारांकडुन मुलाखतीसह/मुलाखतीशिवाय पदांसाठीचे प्राधान्यक्रम घेण्यात येतील.
५. त्याचप्रमाणे इ. ११वी ते इ १२वी या गटातील पदांसाठी पदव्युत्तर पदवीमध्ये व्दितीय श्रेणी असणा-या परंतु, ५० टक्के पेक्षा कमी गुण असणा-या उमेदवारांकडुन मुलाखतीसह/ मुलाखतीशिवाय पदांसाठीचे प्राधान्यक्रम घेण्यात येतील.
६. ज्या उमेदवारांनी यापूर्वी प्राधान्यक्रम लॉक केलेले आहेत. त्यांनी पुन्हा नव्याने प्राधान्यक्रम देण्याची आवश्यकता नाही.
७. खासगी संस्थांकडून मुलाखतीशिवाय निवड करण्यासाठी संस्थांची यापूर्वी पोर्टलवर नोंद केलेल्या बिंदु नामावलीतून इ. १ ली ते ८ वी गटातील निवड केलेली पदे वगळून इ ९वी ते १२ वी साठी पदे पोर्टलवर सुधारित करणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे करण्यात येईल .
८. वरील प्रक्रीयेसाठी पवित्र पोर्टलवर आवश्यक सुविधा झाल्यानंतर श्रेणीची माहिती भरण्याचे/ प्राध्यान्यक्रम देण्याचे वेळापत्रक स्वतंत्रपणे देण्यात येईल.

ड ) माजी सैनिक या समांतर आरक्षणातील रिक्त पदे भरण्याबाबत

१. माजी सैनिक या समांतर आरक्षणातील उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळे या रिक्त जागा त्या त्या सामाजिक प्रवर्गातील PURE मधून भरण्यासाठी शासनाची परवानगी मिळाल्यानंतरच प्रत्यक्ष निवड यादी प्रसिद्ध करण्यात येईल. तोपर्यंत खालील प्रमाणे कार्यवाही करण्यात येईल.( उर्दू माध्यमासाठी स्वतंत्र सूचना दिलेल्या आहेत. )
२. त्या त्या सामाजिक आरक्षणातील माजी सैनिक या समांतर आरक्षणाचे उमेदवार उपलब्ध नसल्याने सदर रिक्त पदे त्यात्या सामाजिक आरक्षणातील PURE मधून गुणवत्तेनुसार भरण्यात येणार आहेत.
३. दि ०९/०८/२०१९ रोजी प्रसिद्ध झालेल्या यादीमध्ये समांतर आरक्षणातील काही पदांसाठी शिफारस न झालेल्या काही उमदेवारांकडुन निवेदने प्राप्त झाली होती. सदर निवेदने तपासण्यात आलेली आहेत. त्यावर योग्य कार्यवाही करण्यात येत आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांची निवडीसाठी शिफारस करण्यात येईल.

इ) मुलाखतीसह पदभरती
१. वर नमूद केलेली कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर उर्वरीत उमेदवारांमधून खाजगी संस्थातील मुलाखतीसह पदभरती पर्याय निवडलेल्या संस्थांसाठी एका पदासाठी उपलब्धतेनुसार १० उमेदवार या प्रमाणात व एका उमेदवारास गुणवतेनुसार जास्तीत जास्त १० पदासाठी मुलाखतीद्वारे निवडीसाठी शिफारस करण्यात येईल.

On 2nd August 2019, Official website of Pavitra Portal has been updated with lastest notice. This notice is displayed after the few days of the preferences given by the candidates for interview and non-interview post.

Though this notice is nothing but a short paragraph, it served its purpose. Near about two lakhs of candidates are waiting for the next steps of the ongoing teacher recruitment process through Pavitra portal

Pavitra Portal Merit List for the non-interview post :

As per the latest update regarding Pavitra Portal, merit list of the teacher recruitment process will be published on the official website after 5.00 PM on 9th of August 2019

Candidates can check their selection status by logging in to the Pavitra Portal.

Pavitra Portal Merit List for the interview post:

As we know that this ongoing teacher recruitment process will recruit candidates for ZP Schools, Government aided schools and privates schools.

For Zilla Parishad schools and Government aided schools, the selection process is purely merit-based. And for privates schools candidates will be recruited upon merit and interview criteria.

Merit list of candidates for the interview process will be published on 16th of August 2019.

Notice Published on 2nd August 2019:

Here is the notice from Pavitra Portal Website. Candidates are advised to visit and check for further progress in the teacher recruitment process.

pavitra portal latst news

What will be the next about MAHA TAIT Exam?

To make teacher recruitment process more transparent Maharashtra government Introduced Maha Tait Exam. We expect that no more extension will be given that affect this process.

This should be the second last step in prolonged teacher recruitment.

Read More:

12 thoughts on “Pavitra Portal Merit List for with and without Interview post”

 1. Respected
  Sir / madam
  I have cleared TAIT exam with 110 marks but due to severe personal reason I have not registered to pavitra portal ,can I register now .
  Pls help to needful.

  1. As per the recent communication with edu. Department, They have given number of chances to candidate to update their profile.
   Hence After completion of the half procedure of this recruitment. There is less possibility of getting this chance

 2. SUTAR KULDIP GOKUL

  HI SIR/ MADAM
  I HAVE 116 SCORE IN TAIT EXAM
  CATEOGRY :OBC
  TET EXAM : PASS
  NOT SELECTED IN WITHOUT INTERVIEW
  THEN
  WHATS NEXT?
  WHEN WITH INTERVIEW ROUND STARTED

   1. Harshakala kamdi_jibhkate

    Hi mala tait madhe 78marks aahet. Pan maze post graduate 4 subject madhe aahe mala college nivdnyacha paryay milala list laglyache nnatar kalale mulaghatisah list kevha lagnar aahe.pls. Kalwa dare.

Leave a Comment

Your email address will not be published.

Don`t copy text!