‘पवित्र’ पोर्टल प्रणालीची वेब साईट

(Last Updated On: March 8, 2018)
5,100 Views

dp

‘पवित्र’ पोर्टल प्रणालीची वेब साईट काय आहे?

परीक्षेनंतर कित्येक उमेदवारांनी विचारलेला प्रश्न म्हणजे ‘पवित्र’ पोर्टलची वेबसाइट काय आहे?

म्हणून आमच्या वाचकांसाठी आम्ही ‘पवित्र’ पोर्टलबद्दलची माहिती संकलित  केली आहे.  तरी आपण हा लेख वाचून आणि त्याबद्दल आपले मत comment box मध्ये नोंदवा.

काय आहे हे ‘पवित्र’ पोर्टल ?

हे महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभागाशी संबंधित ऑनलाइन पोर्टल आहे. महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण विभागाद्वारा हा एक मैलाचा दगड असेल. येथे PAVITRA म्हणजे Portal For Visible to All Teachers Recruitment

या पोर्टलला इतके महत्त्व का दिले जात आहे?

गेल्या काही वर्षांपासून येणा-या बातम्यांनुसार असे आढळून आले आहे की शिक्षक भरती प्रक्रिया पारदर्शकपणे होत नाही. म्हणूनच या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी हे पोर्टल उपयुक्त ठरेल.

हे पोर्टल गेल्या काही दिवसांपासून चर्चेत का आहे?

TAIT परीक्षा 21 DEC. 2017 रोजी संपल्याने, अनेक उमेदवार शिक्षक भरतीच्या प्रत्यक्ष  अंमलबजावणीची वाट पाहत आहेत. ही ती कार्यप्रणाली असेल जिथे परीक्षा नंतरच्या प्रक्रियेची सुरुवात होईल. म्हणुन प्रत्येक पात्र उमेदवार  ह्या बद्द्ल चर्चा करत आहे.

ह्या पोर्टल मागे काय हेतू असला पाहिजे?

दिनांक 12 जून 2017 रोजीचा शासन निर्णय व इतर बातम्या पहाता ह्या portal च्या बाबतीतील  काही हेतू स्पष्ट होतात‌-

  • संस्थेतील शिक्षक भरती प्रक्रियेत सर्व उमेदवारांना समान संधी देणे

(संस्थेची व्याख्या काय आहे? ह्या बद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर येथे क्लिक करुन आमच्या मागील लेखातील मुद्दा क्रमांक 2 वाचू शकता …)

  • शिक्षक भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणणे.

 

वरिल माहिती परवानगी शिवाय वापरने COPYRIGHT ACT नुसार गुन्हा आहे. आपण www.kavachkundale.wordpress.com हे नमुद करून ही माहिती वापरू शकता.

 

हे पोर्टल कसे कार्य करेल?

हा एक महत्वपूर्ण मुद्दा आहे. ह्यात खालील बाबी नमूद करायला हव्यात-

  • ही एक अशी प्रणाली असेल जिथे सर्व शिक्षकांची माहिती संकलित केली जाईल जसे त्यांचे आधार कार्ड क्रमांक, कर्मचारी क्रमांक
  • सर्व संस्थाना भरलेले शिक्षक पदे आणि रिकाम्या पदांची माहिती इथे द्यावी लागेल
  • यामुळे जिल्हा पातळीवर तसेच संस्था पातळीवर रिक्त पदांची संख्या याबद्दल परिपूर्ण माहिती मिळेल
  • सर्व पदे या पोर्टलवर आधारित प्रक्रिये द्वारा भरायचे असल्याने बोगस भरतीस वाव मिळणार नाही
  • सर्व पात्र उमेदवारांना या पोर्टलच्या माध्यमातुन पदासाठी अर्ज करावा लागेल

आणि शेवटचा प्रश्न:  या पोर्टलची वेबसाइट काय आहे?

पावित्रा पोर्टलसाठी वेबसाइटची अधिकृत घोषणा नाही. हे  काम NIC (NIC काय आहे? येथे क्लिक करा)  ला दिले आहे आणि हे काम प्रगतीपथावर असले पाहिजे. ही वेब साईट अधिकृतपणे जाहीर झाल्यानंतर पवीत्र पोर्टलची वेबसाईट आम्ही लवकरच कळवू.

म्हणुन आमच्या ब्लॉग ला भेट देत रहा आणि आमच्या नविन लेखाच्या माहिती साठी उजव्या कोप-यातिल follow वर क्लिक करुन आमच्या ब्लॉगचे  मोफत सदस्यत्व घ्या

 

 

 

 

अधिक माहिती साठी facebook page लाइक करा... Sbfied

वरिल माहिती परवानगी शिवाय वापरने COPYRIGHT ACT नुसार गुन्हा आहे. आपण www.kavachkundale.wordpress.com हे नमुद करून ही माहिती वापरू शकता.

You can ask your question in our comment box just providing your name.

We are happy to help you. Your opinion/ question can be asked to us by sending email on sbtsurfing@gmail.com (You can ask your question in English, Hindi or Marathi)

आपण फक्त आपले नाव नमुद करुन आपला प्रश्न comment box मध्ये विचारू शकता.आम्हाला आपणास मदत करण्यास आनंद वाटेल. (आपण आपला प्रश्न इंग्रजी, हिंदी किंवा मराठीत विचारू शकता)

Heart touching post इथे वाचा

आमच्या इतर post इथे वाचा

रिक्त पदांसाठी सर्व उमेदवार पात्र

मेरिट लिस्ट असणार नाही तर भरती प्रक्रिया पूर्ण कशी केली जाईल?

नेमके काय बदलयं?

10 thoughts on “‘पवित्र’ पोर्टल प्रणालीची वेब साईट”

  1. पोर्टल केंव्हा चालू होणार आहे . भरती प्रक्रिया काय आसेल ?

Leave a Comment

Your email address will not be published.

Don`t copy text!