Police Bharti New GR 2019 नुसार होणारी पोलीस भरती [ Maharashtra Police Bharti 2021 ]एक नवीन आवाहन ठरणार आहे. बदललेल्या स्वरूपानुसार आता पोलीस होण्याचे स्वप्न आता आणखी कठीण झाल्याची प्रतिक्रिया उमेदवारांमध्ये दिसत आहे.
नुकताच गृह विभागाने एक शासन आदेश प्रकाशित केला आहे त्यानुसार पोलीस भरती सेवा प्रवेश 2011 मध्ये सुधारणा करून भरती प्रक्रियेत काही बदल करण्यात आले आहे. आजच्या ह्या लेखामध्ये Police Bharti 2019 New GR नुसार पोलीस भरती मध्ये काय काय बदल झाले हे बघू.
Police Bharti 2021 ची तयारी करणाऱ्या मित्रांसाठी आनंदाची बातमी:
महाराष्ट्र पोलीस सेवाप्रवेश नियम 2011 मध्ये बदल करून लेखी परीक्षा आधी घेण्याचे ठरले होते. त्याच प्रमाणे फिजिकल टेस्ट लेखी परीक्षेनंतर घेण्यात येणार होती.
ह्यामुळे Police Bharti 2021 ची तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये नाराजीचा सूर उमटला होता. कारण लेखी परीक्षा आधी असणे या मध्ये मोठी कसरत होती आणि त्याच प्रमाणे लेखी परीक्षेतून एका जागेसाठी फक्त पाचच उमेदवार पात्र केले जाणार होते.
परंतु आजच म्हणजे 22 जुलै ला महाराष्ट्र पोलीस विभागाच्या website वर याबद्दल नवीन सुधारणा प्रसारित करण्यात आली आहे ह्या नुसार लेखी परीक्षा जरी आधी होणार असेल तरीही एका जागेसाठी फिजीकल टेस्ट ला पाच ऐवजी दहा उमेदवार पात्र करण्यात येणार आहे.
म्हणजे जुन्या नियमानुसार जिथे पाच उमेदवारांना फिजिकल टेस्ट देता येणार होती आता तिथे दहा उमेदवारांना संधी मिळेल.
महाराष्ट्र पोलीस विभागाचा नवा GR इथे download करा.
बाकी सुधारणा आहे तशाच ठेवण्यात आल्या आहे . त्या खालील प्रमाणे आहे.
पोलीस भरती प्रक्रियेतून उमेदवाराची निवड करण्यासाठी कोणत्या पात्रता विचारात घेण्यात यावा यासाठी वेळोवेळी निवडीचे निकष ठरवले जात असतात.
ह्या पूर्वी पोलीस भरती पात्रता ही महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती सेवा प्रवेश नियम 2011 नुसार निश्चित करण्यात आली होती.
शासकीय नोकरी मध्ये सेवा प्रवेशाच्या नियमात बदल करण्याचा अधिकार संबधित खात्याला असतो
ह्या अधिकाराचा वापर करत महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने पोलीस शिपाई भरती प्रक्रियेच्या पात्रता निकषामध्ये बदल केला आहे.
या साठी शासनाने अस्तिवात असणा-या नियमामध्ये बदल करून नवीन नियम लागू केला आहे हा नियम महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश (सुधारित) नियम 2019 म्हणून ओळखला जातो
महाराष्ट्र शासन : गृह विभाग द्वारा प्रसिद्ध करण्यात आलेला नवीन GR इथे क्लिक करून download करू शकता:
ह्या सेवा प्रवेश नियमामध्ये महत्वाचे दोन बदल झालेले दिसून येतात त्यानुसार आता लेखी परीक्षा आधी होणार आहे. लेखी परीक्षेनंतर होणारी फिजिकल टेस्ट ही आता केवळ 50 मार्कांची असणार आहे.
पूर्वीच्या नियमांमध्ये अगोदर फिजिकल टेस्ट ( 100 मार्कांची) आणि मग लेखी परीक्षा घेतली जात असे.
पोलीस भरती प्रक्रीये कडे पूर्वी शारीरिक क्षमता प्रभावित भरती प्रक्रिया म्हणून बघितले जात असे, परंतु नव्या Police Bharti New GR नुसार शारीरिक क्षमते इतकेच बौद्धिक क्षमतेलाही महत्व दिल्या चे लक्षात येते.
ह्या बद्दलचे स्पष्टीकरण पोलीस आयुक्त कार्यालय औरंगाबाद शहर द्वारा प्रसारित करण्यात आलेल्या प्रेस नोट मध्ये बघायला मिळते.
“महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस कर्मचारी यांच्या कामात झालेला बदल लक्षात घेता त्यासाठीआवश्यक बुद्धिमान उमेदवाराची निवड होण्याची आवश्यकता आणि शारीरिक चाचणी दरम्यान होणा-या दुर्घटना टाळण्यासाठी.. भरती प्रक्रियेत बदल करण्यात आलेला आहे.”
पोलीस आयुक्त कार्यालय औरंगाबाद शहर द्वारा प्रसारित करण्यात आलेल्या प्रेस नोट इथे Download करा.
1.फिजिकल च्या आधी लेखी परीक्षा घेतली जाईल.
2. लेखी परीक्षा ही 100 गुणांची असेल.
3. लेखी परीक्षेसाठी 90 मिनिटांचा वेळ दिलेला असेल.
4. सर्व प्रश्न बहुपर्यायी असतील.
5. सर्व प्रश्न मराठी भाषेत असतील.
6. लेखी परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवाराला 35% तर आरक्षित प्रवर्गातील उमेदवाराला 33% गुण घेणे आवश्यक असेल.
7. लेखी परीक्षेतून एका जागेसाठी 10 याप्रमाणे उमेदवारांची फिजिकल टेस्ट साठी निवड करण्यात येईल. 8. मुद्दा क्रमांक 7 हा संबधित प्रवर्गाच्या उपलब्ध पदसंख्येनुसार विचारात घेतला जाईल.
8. लेखी परीक्षेची गुण विभागणी अशी असेल :
विषय | गुण |
मराठी | 25 |
गणित | 25 |
बुद्धिमत्ता | 25 |
सामान्य ज्ञान | 25 |
एकूण | 100 |
पोलीस भरती सेवा प्रवेश नियम 2019 नुसार फिजिकल टेस्ट च्या स्वरूपामध्ये खूप मोठा बदल करण्यात आलेला आहे. ह्या पूर्वीच्या नियमानुसार फिजिकल टेस्ट वर खूप जास्त भर होता मात्र आता लेखी परीक्षेवर जास्त भर दिल्याचे लक्षात येते. फिजिकल टेस्ट मध्ये खालील प्रमाणे बदल करण्यात आले आहे
1. फिजिकल टेस्ट ही आता 50 मार्कांसाठी होईल.
2. लेखी परीक्षा उत्तीर्ण उमेदवाराच फिजिकल टेस्ट ला पात्र होऊ शकतो.
3. एका जागेसाठी दहा असे गुणोत्तर प्रत्येक प्रवर्गासाठी असेल (एका जागेसाठी पाच असे गुणोत्तर प्रत्येक प्रवर्गासाठी असेल. जुना GR 2019)
4. फिजिकल टेस्ट च्या गुणांची विभागणी अशी असेल:
Female | |
800 meter running | 30 marks |
100 meter running | 10 marks |
Shot Put | 10 marks |
Total | 50 marks |
Male | |
1600 meter running | 30 marks |
100 meter running | 10 marks |
Shot Put | 10 marks |
Total | 50 marks |
पोलीस भरती ची अंतिम निवड यादी ही लेखी परीक्षा आणि फिजिकल टेस्ट च्या एकत्रित गुणांना गृहीत धरून लावली जाणार आहे. ह्या मध्ये मात्र लेखी परीक्षेच्या गुणांवर मेरीट लिस्ट ठरणार आहे.
पोलीस भरती सेवा प्रवेश नियमात बदल झाल्यामुळे पोलीस भरती आता अजून कठीण झाल्याचे दिसून येते. फिजिकल टेस्ट चे स्वरूप बदलून सोपे झाले असले तरी मागच्या चार पाच वर्षापासून तयारी करणाऱ्या मित्रांसाठी हे एक नवीन आवाहन असणार आहे.
लेखी परीक्षा आधी घेतल्यामुळे फिजिकल टेस्ट ची भरपूर तयारी करून 94-98 मार्क्स ची तयारी असणा-या मित्रांचे ह्या Police Bharti New GR 2019 मुळे नुकसानच होणार आहे. लेखी परीक्षा आधी घेण्यामुळे पोलीस भरतीच्या स्पर्धेत अजून इतर स्पर्धकांची भर पडणार आहे, ह्याचा परिणाम म्हणून लेखी परीक्षेचे मेरीट खूप जास्त लागण्याची शक्यता आहे.
म्हणून पोलीस होण्याचे स्वप्न आता स्पर्धा वाढल्यामुळे अजून कठीण होत आहे असे वाटते.
पण ज्याला ही खाकी मिळवायचीच आहे त्या उमेदवाराला ह्या सर्वांचा काही फरक पडायला नको.
लेखी परीक्षेच्या तयारी वर अधिक भर देऊन हे कठीण स्वप्न ही पूर्ण करता येईल.
लेखी परीक्षेवर भर देण्यासाठी तुम्ही आमच्या फ्री अभ्यास उपक्रमात सहभागी होऊ शकतात. दिलेल्या बटनावर क्लिक करून आमच्या फ्री अभ्यास उपक्रमात सहभागी व्हा.
मित्रांनो Police Bharti New GR 2019 नुसार तयारी करायला तुम्ही सुरुवात तर केलीच असेल पण एका जागेसाठी पाच उमेदवार निवडणे तुम्हाला अन्यायकारक वाटत नाही का? ठीक आहे लेखी परीक्षा आधी घेण्यात यावी मात्र जर जागा 3000-4000 असतील तर तयारी करणा-या ब-याच मित्रांना संधीच मिळणार नसेल तर हा नवीन GR नुकसान करतोय असे वाटत नाही का?
1:5 ऐवजी नवीन गुणोत्तर 1:10 किंवा 1:15 असे असावे असे आम्हाला वाटते, तुम्हाला एका जागेसाठी किती उमेदवार असावे असे वाटते? सर्वात खाली दिलेल्या कमेंट बॉक्स मध्ये तुमचे मत नक्की लिहा.
Good News: दिनांक 22 जुलै 2019 ला आलेल्या माहिती पत्रकानुसार हे प्रमाण 1:10 ठेवण्यात आले आहे.
अधिक वाचा खालील लिंक वर क्लिक करून…
About Mr.Sagar B. Tupe Patil:
राष्ट्रीयकृत बँकेत कार्यरत असणारे Mr. Sagar हे आज SBfied च्या माध्यामतून 40,000 पेक्षा अधिक स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मित्रांच्या संपर्कात आहेत. ग्रामीण भागातून विविध स्पर्धा परीक्षांची तयारी कुठलेही क्लासेस न लावता स्वतः करणाऱ्या असंख्य उमेदवारांना प्रेरित करण्याचे काम ते मागील दोन वर्षांपासून करत आहे.
अश्या जिद्दी आणि मेहनती उमेदवारांना संघटीत करण्याचा आणि ह्या संघटनच्या माध्यमातून अभ्यास आणि अभ्यास साठी आवश्यक प्रेरणा देण्याचे काम आज 24 पेक्षा अधिक WhatsApp ग्रुप, Telegram Channel च्या माध्यमातून होत आहे.
ह्या उपक्रमांमध्ये तुमचीही मदत नक्कीच अपेक्षित आहे. SBFIED Study Initiative च्या माध्यमातून खालील उपक्रम सध्या चालू आहे.
ह्या उपक्रमांमध्ये तुमचीही मदत नक्कीच अपेक्षित आहे.
पोलीस भरतीसाठी WhatsApp Group जॉईन करा पोलीस भरतीसाठी WhatsApp Group पोलीस भरतीसाठी इतर अभ्यास ग्रुप… Read More
Police Bharti चे Ground आधी व्हायला हवे की Written Exam आधी व्हायला हवी? हा प्रश्न… Read More
Maha Pariksha Portal Exam च्या परीक्षेत यश मिळवायचे असेल तर अभ्यासाचे नियोजन अशा प्रकारे करा.अभ्यास… Read More
आरोग्य विभागाच्या परीक्षेतील तांत्रिक घटकाची तयारी करून घेणारे एक परिपूर्ण पुस्तक तुम्हाला माहित आहे का?… Read More
खूप वर्षापासून पोलीस भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या मात्र सतत अपयशी ठरणाऱ्या मित्रांशी चर्चा केली तर… Read More
पोलीस भरतीच्या मेरिट लिस्ट मध्ये सौरभ फक्त 3 गुणांनी मागे राहिला आणि 2011 मध्ये पोलीस… Read More
Comments वाचा
Gadchiroli police bharti paper set rahnar ki jilha bddal paper rahnar
Mahapariksha portal नुसार भरती झाली तर सर्वांसाठी एकाच पेपर असणार ही शक्यता आहे.
त्यामुळे पेपर मध्ये स्थानिक प्रश्न समाविष्ट केले जाणार नाही
Gadchiroli police bharti paper set rahnar ki jilha bddal paper rahnar
1:15 Hawa
Lekhi pariksha hi online hoil ki offline hoil. Ya baddal sanga plz.
लेखी परीक्षा ऑनलाईन होण्याची शक्यता जास्त आहे. राज्य सरकार द्वारा सर्व शासकीय नोकरी साठीच्या परीक्षा महा परीक्षा पोर्टल द्वारे घेण्याचे नियोजन आहे.
Maha portal lekh nahi jhali pahije ha nusta bogas khel ahe police lekh paper jilhadhikaryane kadhala pahije
1:5 havi
नवीन GR नुसार फिजिकल टेस्ट साठी 1:10 उमेदवार पात्र करण्यात आले आहे.
General category chi age vadhvayla pahije...
General category chi age vadhvayla pahije...
वयोमर्यादा वाढी बद्दल राज्य सरकारने याआधीच घोषणा केली आहे पण प्रत्यक्षात अजुन शासन आदेश किंवा संबंधित परिपत्रक आलेले नाही.
पण लवकरच येण्याची शक्यता आहे.
पोलीस भरती ही 1-10 अशी पाहिजे. लेखी आधी असेल तर
1:5
1:10 thik ahe as mla ani mazay laybri mdhle mulana wate...