Police-bharti-written-exam-or-physical-test

Police Bharti 2021 साठी लेखी परीक्षा आधी पाहिजे की मैदानी चाचणी ?

(Last Updated On: May 31, 2021)
3,385 Views

Police Bharti चे Ground आधी व्हायला हवे की Written Exam आधी व्हायला हवी? हा प्रश्न भरतीची तयारी करणाऱ्या अनेक मित्रांना विचारला.

आणि एक एक करत सर्वजण या चर्चेत सहभागी झाले.

ग्राउंड आधी घेतल्याने होणारे फायदे काही जणांनी खूप पटवून सांगितले तर लेखी परीक्षा आधी का घ्यावी याचे समर्थनही खूप मित्रांनी केले.

चर्चा सुरू होती. ग्राउंड की लेखी हा प्रश्न शासनाच्या हातात न ठेवता बऱ्याच मित्रांनी त्यात हवे तसे बदल सुचवले.

आणि बघता बघता चर्चेला वादाचा स्वरूप आलं.

अभ्यासात हुशार असणारे मित्र लेखी परीक्षेची बाजू खाली पडू द्यायला तयार नव्हते तर Out Of Ground ची तयारी असणारे मित्र भर उन्हात पण Ground आधी घ्या या भूमिकेत होते.

खरंतर काय आधी व्हायला पाहिजे ? यावर माझे मत व्यक्त करण्यापेक्षा एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला आजच्या आर्टिकल द्वारे सांगू इच्छितो.

जो बदल स्वीकारतो तोच स्वप्न साकारतो

मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, जो बदल स्वीकारतो तोच स्वप्न साकारतो. हे खूप महत्वाचे वाक्य आहे.

Police Bharti परीक्षेत Ground आधी होऊ अथवा Written Exam या दोन्हीसाठी तुम्ही तयार असायला हवं.


लेखी आधी व्हावी की ग्राउंड आधी व्हावे. या मुद्द्यावर भांडत बसण्यापेक्षा सध्या भरती प्रक्रियेत जो बदल होतो आहे तो स्वीकारायला तुम्ही तयार आहात का ? हे खूप महत्त्वाचे आहे.

आजपर्यंतचा इतिहास बघा. या सर्वांमध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे ज्याने बदलाला स्वीकारले त्यानेच प्रगती केली.

Test, One Day Interanational ते T-20

क्रिकेट हा आपल्या सर्वांचा आवडीचा विषय – क्रिकेट विश्वात सुरुवातीचे दिवस टेस्ट वन डे इंटरनॅशनल फॉरमॅट ने गाजवले.

मात्र हळूहळू लोकांना अधिक वेळेपेक्षा कमी वेळाची आणि लवकर निर्णय देणारी क्रिकेट मॅच आवडू लागली आणि यातून जन्म झाला टी ट्वेन्टी क्रिकेट सामन्यांचा !

आणि जे खेळाडू या नवीन फॉरमॅटमध्ये स्वतःला ऍडजेस्ट करू शकले तेच आज आपल्याला यशाच्या शिखरावर दिसतात.
बऱ्याच खेळाडूंनी T20 फॉरमॅट वरती टीका केली.

तर बऱ्याच खेळाडूंनी स्वतःला नवीन फॉरमॅट साठी ऍडजेस्ट करून घेतलं. ज्यांनी टीका केली आणि स्वतःला नवीन बदलानुसार बदलून घेतलं नाही असे अनेक खेळाडू आज आपल्याला मैदानाबाहेर दिसतात.

याउलट ज्यांनी लवकर बदल स्वीकारला ते खेळाडू खूप कमी वेळात यशाच्या शिखरावर बघायला मिळत आहे.

Action Hero पासून ते Comedy Hero

दुसरे उदाहरण म्हणजे बॉलिवूडचे !

अक्षय कुमार सोबत बॉलिवूडमध्ये एन्ट्री केलेल्या बऱ्याच कलाकारांचे करिअर संपल्याचे आपण बघतो आहे मात्र अक्षय कुमार आजही बॉलिवूडमध्ये आपले स्थान टिकवून आहे.

यामागे काय कारण असेल?

Akshay Kumar how he faces changes in industries


सुरुवातीला अक्षय कुमारने ॲक्शन हिरो म्हणून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली मात्र त्यानंतर ॲक्शन चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती कमी झाल्याचे लक्षात आल्यावर त्याने पटकन ॲक्शन हिरो पासून कॉमेडी हिरो स्वतःला बदलून घेतले.

त्यानंतरच्या काळात पुन्हा एकदा बॉलीवूड मध्ये नवीन बदल दिसून आले..

कॉमेडी चित्रपटांपासून बॉलिवूड पुन्हा एकदा सामाजिक विषयां मध्ये रस घेऊ लागले !
अक्षय कुमार ने पुन्हा एकदा मोठा बदल स्वीकारला आणि आपल्यावरील कॉमेडी हिरो हा शिक्का तसाच ठेवत त्याने गंभीर आणि सामाजिक विषयांवरही चित्रपट करायला सुरुवात केली.

स्वतःचे करिअर नेहमी यशाच्या शिखरावर ठेवण्यासाठी अक्षय कुमारने स्वतःमध्ये वेळेनुसार हवे तसे बदल करून घेतले.

याउलट ज्यांना या बदलांशी स्वतःला जुळवून घेता आले नाही त्यांचे करिअर तिथेच संपले.

Police Bharti Ground or Written हा बदल याला अपवाद नाही.

मित्रांनो पोलीस भरती मध्ये देखील असेच होणार आहे.

लेखी परीक्षा आधी होईल की ग्राउंड आधी होईल याबद्दल भविष्यवाणी मी करणार नाही.

पण इथे एक भविष्यवाणी मी जरूर करू इच्छितो – पोलीस भरती च्या पॅटर्नमध्ये होणाऱ्या बदलांना जर तुम्ही स्वीकारत नसाल तर तुमचे करिअर सुरु होण्याआधीच संपण्याची दाट शक्यता आहे.

म्हणून सांगतो बदलांना स्वीकारा –
तुमची लेखी परीक्षेची तयारी असेल तर ग्राउंड आधी होईल हा विचार करून तयार करा.

जर तुमचे ग्राउंड चांगले असेल तर लेखी परीक्षा आधी होईल असा विचार करून अभ्यास करा.
लक्षात घ्या असे केल्याने तुमचा नेहमी फायदाच होणार आहे.

तुमचे Maharashtra Police Bharti चे Marks इथे क्लिक करून calculate करा

आपल्याला जे येते तेच आधी व्हावे हा आग्रह मुळात धरणे खूप चुकीचे आहे.
कारण आपल्याला वाटते म्हणून ग्राउंड किंवा लेखी परीक्षा आधी होईल असे नाहीये.

तुम्हाला अभ्यासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा.

Two important Things For Police Bharti Preparation

तुमच्या अभ्यासाला मदत करणाऱ्या दोन महत्त्वाच्या गोष्टी मी या शुभेच्छा संदेशासोबत सांगू इच्छितो.

  1. पोलीस भरती बाबत अशीच महत्त्वाची एक माहिती आपल्या टेलिग्राम चॅनेल द्वारे आज चाळीस हजारांपेक्षा जास्त मित्रांपर्यंत पोहोचवली जात आहे तुम्ही ह्या टेलिग्राम चॅनेल चा हिस्सा आहात का?
    ह्या टेलिग्राम चॅनेल ला जॉईन करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.
Police bharti Telegram Channel
  1. मागच्या दोन महिन्यापासून पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मित्रांसाठी नवीन पॅटर्न नुसार रोज एक फ्री टेस्ट आपल्या वेबसाईट वरती उपलब्ध करून दिली जात आहे. रोज उपलब्ध होणारी आणि फ्री असणारी ही टेस्ट देण्यासाठी वरील टेलिग्राम चॅनेल जॉईन करा म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज या टेस्ट ची लिंक मिळेल.

आजची Free Maharashtra Police Bharti 2021 Test दिली का ?

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या भावी पोलिसांसाठी रोज एक फ्री पोलीस भरती टेस्ट घेतली जाते हे तुम्हाला माहिती आहे का ?

Police Bharti लेखी परीक्षा किंवा Ground आधी घ्या या मुद्द्यावर चर्चा करत बसण्यापेक्षा तयारीवर भर द्या हे माझे मत तुम्हाला बरोबर वाटते का ? तुम्ही सध्या कोणत्या तयारी वर भर देत आहात ? हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा

12 thoughts on “Police Bharti 2021 साठी लेखी परीक्षा आधी पाहिजे की मैदानी चाचणी ?”

  1. याचा नादात इथे वय संपत जात आहे…..नाही तर waiting चे तरी घ्या….पहिला पेपर घ्या नाहीतर ग्राउंड घ्या……दोन्ही मिळून….१८०+……/……..१३५+…… मार्क्स….मिळवावेच लागणार

  2. Gourav sunil desai

    काहीही घेऊंदेत नो प्रोब्लेम….पण लवकर घेऊंदेत…

  3. आपल्या ग्रुप वर पोल घ्या ग्राउंड आधी की लेखी या साठी

Leave a Comment

Your email address will not be published.

Don`t copy text!