Maharashtra Police Bharti

Police Bharti : सेल्फ स्टडी करू की क्लासेस / अकॅडमी जॉईन करू?

(Last Updated On: December 30, 2019)
383 Views

Police Bharti : सेल्फ स्टडी करू की क्लासेस / अकॅडमी जॉईन करू?

हा खरतर प्रत्येक उमेदवाराला सतावणारा प्रश्न. हा प्रश्न तयारी करणाऱ्या बऱ्याच उमेदवारांना विचारला.

1800 पेक्षा अधिक मित्रांनी ह्या poll मध्ये सहभाग नोंदवला पण जे उत्तर मिळाले ते खूप confusion करणारे आहे.

45% मित्रांना पोलीस भरती साठी क्लासेस ची गरज वाटते तर 55% मित्रांना सेल्फ स्टडी वर पोलीस भरती परीक्षा पास होऊ शकतो असे वाटते.

Maharashtra-police-bharti

हे Confusion दुर करण्यासाठी ह्या प्रश्नाच्या मुळापर्यंत जाणे गरजेचे आहे.

या प्रश्नाला जर उत्तर दिले तर क्लासेस आणि ॲकॅडमी चे संस्थापक या पोस्ट वरती टीका करतील.

पण तरीही आजच्या या पोस्टमध्ये पोलीस भरतीसाठी कोचिंग क्लासेसची खरंच गरज आहे का ? याबाबतचे वास्तव समजून घेऊ.

राज्यात पोलिस भरती प्रक्रिया राबवण्याबाबत वेगाने हालचाली चालू आहेत आणि एकदा की जाहिरात आली की लाखो मुले भरती परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी वेगवेगळे क्लासेस, वेगवेगळ्या अकॅडमी जॉईन करण्यासाठी धावपळ सुरू करतील.

6 ते 10 हजारापर्यंत क्लासेसची असणारी फीस, गावापासून क्लासेसचे असणार अंतर, लेखी परीक्षेला उरलेला अतिशय कमी वेळ या गोष्टी उमेदवारांना गोंधळात टाकतात.

कधी पैशाची अडचण, तर जवळच्या अंतरावर चांगला क्लास उपलब्ध नसण्याची अडचण या सर्व मित्रांना विचलित करतात आणि मग या सर्वांच्या डोक्यात एकच विचार चक्र चालू असते आणि ते म्हणजे

पोलीस भरतीसाठी सेल्फ स्टडी करू की कोचिंग क्लासेस /अकॅडमी जॉईन करू?

पोलिस भरतीत हमखास यश मिळवण्यासाठी तुम्ही सेल्फ स्टडी करावा की कोचिंग क्लासेस जॉइन करावे याचे उत्तर तुम्हाला दुसरं कोणीही देऊ शकत नाही.

तुम्हाला तुमच्या तुम्हीच ठरवायचे आहे मात्र या आर्टिकल मध्ये असणाऱ्या काही गोष्टी तुम्हाला हे ठरवण्यासाठी मदत करतील.

यासाठी हे संपूर्ण आर्टिकल वाचा म्हणजे तुम्हाला ठरवता येईल की खरंच तुम्हाला क्लासेसची गरज आहे का?

किंवा

सेल्फ स्टडी करूनही तुम्ही पोलीस भरती परीक्षेत यश मिळवू शकता?

यश मिळवण्यासाठी नेमकं तुम्हाला काय करायचं आहे हे तुम्हालाच ठरवावं लागेल कारण ‘तुम्ही स्वतः काय आहात?’ हे तुमच्या व्यतिरिक्त अजून कोणालाही माहीत नसते.

कोचिंग क्लासेस जॉईन करून पोलीस झालेले माझे बरेच मित्र आहेत आणि त्याहीपेक्षा अधिक मित्र सेल्फ स्टडी करून पोलीस झालेले आहेत.

मग तुम्ही नेमकं काय करावं? हे ठरवण्यासाठी आपण खालील मुद्यांचा विचार करायला हवा.

कोचिंग क्लासेसची Police Bharti परीक्षेसाठी कशी मदत होते?

अभ्यासात सातत्य:

क्लासेस जॉईन करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आपल्या अभ्यासामध्ये एक प्रकारचं सातत्य येते. आपण दररोज ठराविक वेळेला ठराविक विषयाचा अभ्यास करतो आणि कुठलीही गोष्ट सातत्याने केली म्हणजे त्यामध्ये सुधारणा होत जाते.

मेहनती आणि हुशार तर सर्वच असतात, पण अभ्यासात सातत्य टिकवून ठेवणे सर्वांना शक्य नाही म्हणून कोचिंग क्लासेसचा अभ्यासात महत्त्वाचा फायदा आपल्याला होऊ शकतो.

शिक्षकांच्या अनुभवाची मदत:

बऱ्याच कोचिंग क्लासेस मध्ये मागील चार ते पाच वर्षापासून शिकवणारे शिक्षक असतात. पोलीस भरती परीक्षेला कशा प्रकारचे प्रश्न येतात? अभ्यास करताना कुठल्या स्तरापर्यंत सराव करायला हवा ?

कोणत्या विषयावर आणि कोणत्या टॉपिकवर किती वेळ खर्च करावा? या सर्व प्रश्नांची उत्तर या शिक्षकांना अनुभवातून या आधीच मिळालेली असतात. त्यांच्या या अनुभवाचा फायदा आपल्याला क्लासेसच्या माध्यमातून होऊ शकतो.

या शिक्षकांकडे आपण एखाद्या जिमच्या कोच प्रमाणे बघू शकतो. आपण कोणता व्यायाम कसा करावा आहारात कोणता बदल करावा याबाबत कोचने केलेले मार्गदर्शन जितके महत्त्वाचे आहे तितकेच महत्त्वाचे मार्गदर्शन एका अनुभवी शिक्षकाचे आपल्याला पोलीस भरतीसाठी होऊ शकते.

शंका आणि अडचणींचे निराकरण :

अभ्यास करत असताना आपल्या मनात बर्‍याच शंका निर्माण होतात काही गोष्टी आपल्याला समजतच नाही. मराठी व्याकरणात अव्ययीभाव समास नेमका काय आहे हे तीन चार पुस्तके वाचून नाही कधी कधी समजत नाही.

अशा वेळी मात्र नेमकी कॉन्सेप्ट काय आहे हे समजून घेण्यासाठी पुस्तकाऐवजी सोप्या भाषेत समजून सांगणाऱ्या एका व्यक्तीची गरज असते.

बाहेर अभ्यासात मदत करणाऱ्या अशा व्यक्ती कदाचित खूप कमी सापडतील. परंतु कोचिंग क्लासेस मध्ये तुम्हाला यामध्ये मदत करणारे हक्काचे शिक्षक असतील.

शंका निर्माण होणे, एखादी कॉन्सेप्ट बिलकुलच न समजणे आणि एखाद्या विषयाचा अभ्यास नेमका कसा करणे या सर्व साठी कोचिंग क्लासेस सारखा चांगला आणि कमी वेळ खाणारा उपाय दुसरा कुठलाच नाही.

हे आहे कोचिंग क्लासेस मुळे पोलीस भरती परीक्षेच्या तयारीत होणारे फायदे. पण म्हणून पोलीस भरतीसाठी कोचिंग क्लास असावेच असे म्हणता येणार नाही.

सदोष कोचिंग क्लासेस मुळे तुमचे नुकसान कसे होऊ शकते?

कोचिंग मुळे अभ्यासात नक्कीच मदत होते पण लक्षात ठेवा सदोष कोचिंग क्लास म्हणजे ज्यामध्ये बऱ्याच त्रुटी आहे तो तुमचे बरेच नुकसान करू शकतो.

विषयात प्राविण्य असणारे शिक्षक नसणे:

Police Bharti साठी तुम्हाला क्लासेस जॉईन करायची असेल तर तुमच्या समोर खूप पर्याय उपलब्ध असतात. काही क्लासेसची फीज खूप कमी असते काही क्लासेसची फीज खूप जास्त असते.

काही ठिकाणी एका विषयाला तीन शिक्षक असतात तर काही ठिकाणी दोन विषयांना एक शिक्षक असतो.

कोचिंग क्लासेस मध्ये अर्धवट ज्ञान असणारे, विषयात प्राविण्य नसणारे शिक्षक शिकवायला असतात. लक्षात ठेवा मित्रांनो हा क्लास तुमच्यासाठी सर्वात घातक ठरू शकतो. तुम्ही क्लास जॉईन केला आहात म्हणून बिनधास्त असतात.

मात्र शिकवण्याची पद्धत, अनुभवाचा अभाव असणे यामुळे अशा सदोष क्लासेस मध्ये तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जाऊ शकते.

भरपूर संख्येमुळे वैयक्तिक लक्ष न देता येणे:

आज जवळपास सर्वच कोचिंग क्लासेसचा हा दोष आहे. कोचिंग क्लासेस मध्ये एका वर्गात शंभर ते दोनशे विद्यार्थी असणे हे तुमच्या अभ्यासात अडथळा ठरू लागते. दीड ते दोन तासाच्या लेक्चर मध्ये सर्व मुलांच्या शंकांचं निरसन करणे एका शिक्षकाला शक्य नाही.

अभ्यासात येणाऱ्या अडचणी / शंकांचं निराकरण व्हावे हा क्लासेस मुख्य हेतू असतो परंतु हेच होणार नसेल तर अशा क्लासेसला कुठलाही अर्थ उरत नाही.

भरपूर विद्यार्थी संख्येमुळे तुमच्या वैयक्तिक अडचणी क्लासेस मध्ये सुटत नसतील, तर लक्षात घ्या तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जात आहे.

पैसे कमावणाऱ्या क्लासेस मध्ये फसणे:

पोलीस भरती ची तयारी करून घेणारे बरेच क्लासेस बघायला मिळतात. सहा हजारांपासून दहा हजारांपर्यंत त्यांची फिस असते.

एका वर्गात दोनशे पर्यंत ही मुले असतात परंतु यात दोनशे मुलांपैकी केवळ तीन ते चार मुले पोलीस होतात. कारण हे क्लासेस तुम्हाला पोलीस बनवण्यापेक्षा पैसे कसे कमवता येतील यावर अधिक भर देतात.

अनुभवी शिक्षक उपलब्ध करून देणे, उपयुक्त असेल स्टडी मटेरियल पुरवणे, परीक्षेच्या बदललेल्या पॅटर्ननुसार तयारी करून घेणे त्यापेक्षा या क्लासेस चा भर जाहिरातींवर असतो.

अशा पैसे कमावणार क्लासेसचे तुम्ही विद्यार्थी असाल तर तुमच्या अपयशाचे कारण बनतात.

सेल्फ स्टडी करून मी पोलीस होऊ शकतो का?

स्वतः अभ्यास करून पोलीस होणारे बरेच उदाहरणे आपल्या आसपास आहेत.एम पी एस सी / यु पी एस सी यासारख्या कठीण परीक्षांमध्येही स्वतः अभ्यास करून यश मिळवता येऊ शकते अशा ठिकाणी पोलिस भरतीत सारख्या अतिशय सामान्य स्तर असणाऱ्या परीक्षेत स्वतः अभ्यास करून यश मिळवणे कठीण नाही.

साधारणपणे पोलीस भरती परीक्षेचा स्तर इयत्ता दहावी इतका असतो.म्हणून योग्य नियोजन आणि अभ्यास करण्याची योग्य पद्धत या माध्यमातूनही तुम्ही पोलीस भरती प्रक्रियेत यश मिळवू शकतात.

क्लासेसच्या माध्यमातून ज्या गोष्टींची तयारी करून घेतली जाते त्या गोष्टी तुम्ही स्वतः केल्या तर यश नक्कीच तुमचेच असेल.

सेल्फ स्टडी करून पोलीस होण्याचे स्वप्न जर तुम्ही बघत असाल तर काही गोष्टी नक्कीच पाहायला हव्यात.

  1. अभ्यास करताना तुमच्यात स्वयं शिस्त असली पाहिजे. बऱ्याचदा क्लासेसमध्ये पाळले जाणारे वेळेचे नियोजन स्वतः अभ्यास करतांनी पाळले जात नाही. स्वतः अभ्यास करून या परीक्षेत यश मिळवायचे असेल तर तुम्ही वेळेचे नियोजन करून ते काटेकोरपणे पाळले पाहिजे..
  2. अभ्यास करताना येणाऱ्या अडचणी / शंका तुम्ही एका वहीमध्ये नोंदवून तज्ञ व्यक्तींकडून सोडवून घेतल्या पाहिजे.
  3. सरावासाठी असणारे सराव संच बाजारातून खरेदी करून वेळ लावून त्यांचा सराव केला पाहिजे. म्हणजे वेळेचा निकष लावून आपली तयारी कुठपर्यंत झाली आहे याचा अंदाज तुम्हाला येईल.
  4. पोलीस भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांचा स्टडी ग्रुप तयार करून तुम्ही एकमेकांच्या अडचणी सोडवू शकतात.

असे ठरवा तुम्हाला क्लासेस ची गरज आहे की नाही?

खालील प्रश्नांची उत्तरे तुम्ही होय असे देत असाल तर तुम्हाला क्लासेस लावण्याची गरज नाही आहे आणि तुमचे उत्तर नाही असे असेल तर मात्र तुम्ही क्लासेस जॉईन करायला च हवे.

  1. माझा दहावीपर्यंतचा अभ्यास बऱ्याच प्रमाणात लक्षात आहे का?
  2. मला अभ्यासाचा न येणारा भाग मी स्वतः रिविजन ठेऊन पूर्ण करू शकतो का ?
  3. मला अभ्यासाचे टाईम टेबल काटेकोरपणे स्वतः पाळणे शक्य आहे का?
  4. मी चार ते पाच तास एकाच ठिकाणी बसून अभ्यास करू शकतो का?
  5. अभ्यासात येणाऱ्या माझ्या अडचणी सोडवण्यासाठी त्या त्या विषयातील शिक्षक किंवा माहिती असणाऱ्या व्यक्ती उपलब्ध आहेत का?

वरती दिलेले प्रश्न हे प्राथमिक स्वरूपाचे आहे.

मात्र या प्रश्नाचे उत्तर इतर तुम्ही होय असे देऊ शकत असाल तर नक्कीच मित्रांनो पोलीस होण्यासाठी तुम्हाला क्लासेस लावण्याची काही गरज नाही.

मात्र तुमचे स्वतःवर नियंत्रण नसेल आणि तुम्ही अभ्यासाची वेळ काटेकोरपणे पाळत नसाल. इयत्ता दहावी पर्यंतचा अभ्यास तुम्ही योग्य प्रकारे पूर्ण केलेला नसेल तर तुम्हाला क्लास लावण्याची निश्चितच गरज आहे.

तुमच्या आजूबाजूला बरेच क्लास उपलब्ध आहे प्रत्येकाची वैशिष्ट्ये वेगळी आहे प्रत्येकाची वेगळी आहे तुमच्यासाठी बेस्ट असणारा क्लास कसा निवडायचा हे आपण येणाऱ्या आर्टिकल मध्ये बघू.

पोलीस भरती परीक्षेची तयारी करण्यासाठी तुम्ही क्लास जॉईन केला आहे का ? तुम्हाला क्लासचा नक्की फायदा होतो आहे का ? हे मला कमेंट बॉक्स मध्ये जरुर कळवा.

खूप महत्वाचे

लेखी परीक्षेच्या तयारीसाठी !

ह्या वर्षी लेखी परीक्षा अधिक कठीण आणि स्पर्धात्मक असणार आहे आणि म्हणून योग्य दिशेने अभ्यास करणे खूप महत्वाचे आहे. आणि ही अभ्यासाची दिशा तुम्हाला आमच्या फ्री Online TEST देऊ शकतात. खालील बटनावर क्लिक करून ह्या फ्री सुविधेचा फायदा घ्या

Leave a Comment

Your email address will not be published.

error: हे मजकूर कॉपी होऊ शकत नाही. कृपया शेअर बटणाचा वापर करून शेअर करा !!