पोलीस भरती : आवडणारा शत्रू

(Last Updated On: August 2, 2020)
1,929 Views

पोलीस भरतीच्या मेरिट लिस्ट मध्ये सौरभ फक्त 3 गुणांनी मागे राहिला आणि 2011 मध्ये पोलीस होण्याचे त्याचे स्वप्न तसेच अपूर्ण राहिले.

हताश आणि दुःखी सौरभ ला नातेवाईक मित्रमंडळी यांनी समजावले जर फक्त 3 गुणांनी मेरिट हुकले असेल तर पुढच्या वर्षी तू नक्की भरती होणार.

आणि खरे पण तितकेच होते ते कारण सौरभ ची सर्व तयारी झाली होती. त्याला फक्त अजुन 4 -5 गुणांची तयारी करायची होती. तो जवळपास जिंकलाच होता, फक्त अजुन थोडी मेहनत करायची बाकी होती.

वर्ष भरात 4-5 मार्क वाढवणे सौरभ सारख्या मेहनती आणि फिट उमेदवाराला काहीच कठीण नव्हते.

त्या नंतर बरोबर एका वर्षाने भरती झाली. सौरभ च्या निकालाची सर्वानाच उत्सुकता होती. निकाल लागला, पुन्हा सौरभ 6 गुणांनी अपयशी झाला.

आता समोर नुसता अंधार होता. वर्षात सौरभ ला 6 गुण वाढवायचे होते पण एक वर्ष वेळ भेटून देखील सौरभ तिथेच अडकला होता.

का एका वर्षात 6 गुण सौरभ वाढवू शकला नाही?
का एका वर्षात सौरभ ला अपयशा चा अंधार मिटवून यशाचा दिवा लावता आला नाही?

एक वर्ष इतका मोठा वेळ असून देखील सौरभ का वर्दी मिळवू शकला नाही?

कारण सौरभ अडकला होता एका सापळ्यात.

तो सापळा रचणारा होता त्याचा एक शत्रू आणि मित्रांनो 2011 ला अडकलेल्या सौरभ सारखे असे माझे खूप मित्र आहेत जे अश्या सापळ्यामध्ये अडकलेले आहेत. फक्त त्यांना माहीत नाही की चेकमेट होत आहेत.

आजच्या आर्टिकल मध्ये आपण तेच बघुया की सौरभ सोबत काय घडले असेल की ज्यामुळे एक वर्ष वेळ मिळून देखील तो यशस्वी होऊ शकला नाही. तो कोणता शत्रू आहे जो अपयशाचे कारण बनला?

आपल्या प्रत्येकाचा आयुष्यात असतो एक आवडणारा शत्रू
सौरभ ने वर्ष भर काय केले? हा प्रश्न विचारला तेव्हा कुठे हा खरा शत्रू समोर आला.

आपल्या प्रत्येकाचा आयुष्यात हा शत्रू आहे आणि ह्या शत्रू ची खासियत म्हणजे हा सर्वांना खूप आवडतो त्यामुळे कोणीही त्याला दूर करण्याचा लवकर प्रयत्न करत नाही.

त्याला दूर करण्याने खाकी वर्दी मिळणार असेल तरीही आपण हा प्रयत्न करत नाही. म्हणून तर त्याला आपण आवडणारा शत्रू म्हणतो.

सौरभ सोबत वर्षभर हा शत्रू होता त्याने सौरभ ला वर्ष भर समजू दिले नाही की पुढच्या वर्षी पण त्याचा निकाल फेल असाच येणार आहे.

सौरभ सारखे तुम्ही त्याच्या जाळ्यात सापडू नये म्हणून हे आर्टिकल काळजीपूर्वक वाचा.

नेमके होते काय?

बघा तुमचा निकाल लागतो , तुम्ही खूप थोड्या मार्कने फेल होता. पुढच्या भरतीत होणाऱ्या भरतीत तुम्हाला यश मिळणार याची सर्वांना खात्री असते कारण एका वर्षात काय होऊ शकत नाही?

तुम्ही पुन्हा तयारीला लागता.
एक दोन दिवसाने एक महत्वाचे काम येते. म्हणून तुम्हाला तयारी थांबवावी लागते.

पुन्हा अभ्यास सुरू होतो मग पुन्हा काहीतरी निमित्त (जसे भावाचे लग्न, आजारी पडणे, गणपती , दिवाळी ) तुम्हाला थोडासा गॅप घ्यायला लावते.

आणि एकदा की हा थोडासा गॅप पडला की हा आवडणारा शत्रू डोके वरती काढतो. इतका सहज हा प्रवेश करतो की आपल्याला समजत देखील नाही.

कंटाळा आलेला असतो , ग्राउंड वर तयारी जायचे असते, काल उशिरा झोपल्या मुळे डोक्यात विचार येतो ‘ आजच्या दिवस नको उद्या पासून जाऊ ‘

काम करून आधीच बोर झालेले असते गणितामध्ये आज घातांक प्रकरण शिकायचे असते पण बोर झालेले मन म्हणते ‘ हे जरा अवघड प्रकरण आहे उद्या फ्रेश मूड मध्ये बघू ‘

दोन दिवसाचा गॅप पडलेला असतो 1600 मीटर चा वेळ कमी करायचा असतो पण आज सोबत येणारा मित्र आलेला नसतो म्हणून आज वाटते की ‘ उद्या सोबत पळू एकट्याने मन लागत नाही ‘

असे खूप उदाहरणे आहेत , तुम्ही काही करायला हातात घेतले आणि डोक्यात विचार आला की हे ‘ उद्या करू ‘ की समजून घ्यायचे की आपण ह्या रोगाचे शिकार झालेलो आहे.

ह्या साठी कोणता डॉक्टर शोधून रोगाचे निदान करण्याची गरज नाही. खालील प्रश्नांची उत्तरे जर होय असे देत असाल तर समजा सौरभ सारखे तुम्हीही आवडणाऱ्या शत्रूच्या पिंजऱ्यात अडकलेले आहे.

  1. एखादे काम करताना ते खूप लहान आहे म्हणून काम उद्या करू असे तुम्हाला वाटते का?
  2. उद्या करू, दुसऱ्या दिवशी पुन्हा उद्या करू असे करत करत तुम्ही सलग चार पाच दिवस वाया घालवले आहे का?
  3. उद्या करू, उद्या करू आजच्या दिवस फक्त नको उद्यापासून नवी सुरूवात करू असे सारखे सारखे तुमच्या बाबतीत घडते का?

वरती असणाऱ्या प्रश्नाचे उत्तरे होय देत असाल तर समजा तुम्ही बरोबर जाळ्यात अडकले आहात.

सौरभ च्या बाबतीत वर्षभर हेच घडले आज-उद्या आज-उद्या करत त्याने संपूर्ण वर्ष वाया घातले.

त्याने अभ्यास केला नसेल असे मुळीच मला म्हणायचे नाही. पण वर्ष भरात जितका अभ्यास / तयारी व्हायला हवी तितकी त्याची झाली नाही.

आणि जितकी झाली असेल तितकी तर इतर सर्व उमेदवारांनी पण केली असेल.

म्हणूनच मागच्या वर्षी मेरिट च्यामागे फक्त 3 मार्क्स राहून पण सौरभ ह्या वर्षी इतर उमेदवारां सोबतच राहिला.
‘ उद्या करू ‘ नावाच्या शत्रूने त्याचे संपूर्ण एक वर्ष वाया घातले.

मित्रमंडळी नातेवाईक यांना वाटणारा विश्वास ह्या साठी होता की सौरभ ची सर्व तयारी झालेली आहे.

आता अजुन एक वर्षात त्याला 5 मार्क वाढविणे काहीच कठीण नाही. पण ‘ उद्या करू ‘ नावाच्या आवडणाऱ्या शत्रूने त्याला एक वर्ष हा वेळ मिळूच दिला नाही.

आणि म्हणून सौरभ पुन्हा फॉर्म भरल्यावर खऱ्या तयारीला लागला आणि पुन्हा निकाल मागच्या वर्षी सारखाच लागला.

ह्या शत्रूला आवडणारा शत्रू का म्हणायचे?

कारण हा शत्रू आहे आणि धोकादायक आहे हे माहीत असून देखील आपण त्याला दूर करायला तयार नसतो.

कारण उठून ग्राउंड वर जायचे, धाप लागेपर्यंत पळायचे ह्यापेक्षा ‘ उद्या नक्की जाउ ‘ म्हणून 8 वाजेपर्यंत झोप घेणे अतिशय सुखावह असते.

कारण टिव्ही वर मस्त चालू असणारे ‘ तुझे कितना चाहने लगे’ सोडून विभक्तिचे प्रत्यय ‘ स ते स ला ना ते ‘ म्हणणे खरंच कठीण आहे.

फायटिंग करणारा ‘ घातक चा हिरो ‘ हा कधीही ‘ घातांकात झीरो ‘ पेक्षा सोपा वाटत असतो.

आणि माणसाचा हा मूळ स्वभाव आहे कि जे सोपे आहे , जे आनंद देणारे आहे ते त्याला हवेसे वाटते.

पण प्रत्येक वेळी आनंद देणारी, सोपे असणारी गोष्ट फायद्याची असेलच असे नसते.

ह्या शत्रूच्या बाबतीत देखील हेच होते. ‘ उद्या करू ‘ ही सवय आनंद देणारी तर आहे पण मात्र तो आनंद क्षणिक असतो, त्याचा परिणाम मात्र दीर्घ आणि नुकसान कारक असतो.

(क्रमशः)

मित्रांनो आजच्या ह्या आर्टिकल मध्ये आपण ह्या आवडणाऱ्या शत्रूला ओळखले.

मात्र फक्त आजार काय आहे हे सांगणाऱ्या डॉक्टर ला आपण फिज देत नाही त्यासाठी त्याने त्या आजारावर ट्रीटमेंट पण करावी लागते.

त्याच प्रमाणे आजच्या ह्या आर्टिकल मध्ये फक्त आजार ओळखला आहे, ह्या पुढच्या आर्टिकल मध्ये त्या आजारावर उपाय काय करायचा हे बघू.
भेटू मित्रांनो पुढच्या आठवड्यामध्ये…

आणि हो, ‘ उद्या करू ‘ ह्या आवडणाऱ्या शत्रूच्या सापळ्यात तुम्ही सापडले आहात का कधी? अभ्यास किंवा तयारी आज करण्यापेक्षा उद्या करू असा विचार केल्याने भरतीच्या तयारीत तुमचे नुकसान झाले आहे का? मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.

ह्याशिवाय अजुन असे काही प्रश्न असतील ज्यांचे उत्तरे तुम्हाला मिळत नाही आणि कोणाला विचारू हे समजत नाही असे होत असेल तर

टेन्शन न घेता मला 90 49 03 07 07 ह्या नंबर वर व्हॉट्स ऍप मॅसेज करा.

मला तुम्हाला मदत करायला नक्की आवडेल. तुमचे नाव माहिती गुप्त ठेवण्यात येईल.
जय हिंद ..!

अधिक वाचा

खूप महत्वाचे

लेखी परीक्षेच्या तयारीसाठी !

ह्या वर्षी लेखी परीक्षा अधिक कठीण आणि स्पर्धात्मक असणार आहे आणि म्हणून योग्य दिशेने अभ्यास करणे खूप महत्वाचे आहे. आणि ही अभ्यासाची दिशा तुम्हाला आमच्या फ्री Online TEST देऊ शकतात. खालील बटनावर क्लिक करून ह्या फ्री सुविधेचा फायदा घ्या

11 thoughts on “पोलीस भरती : आवडणारा शत्रू”

  1. gaurav shyamrao deshmukh

    Sir,
    Mla sigret ch vyasan lagal ahe ani ground pn chalu ahe khup try kele pn sutat nahiy sir…sir majhi hi bharti 7 vi ahe mla success hoych ch ahe sir pn aalshi khup hot chaloy he sagal mla samjat ahe pn solution nighat nahiy…plzzz help.me sir

  2. गणित हा विषय लक्षात नाही राहत..कसे गणित केलो है नंतर विसरून जाणं होते…आणि अभ्यासात मन नाही लागत… लयबरी मधे जाऊन नुस्त वाचत बसन होते..पण आठवन काहीच नसते…याचा साठी काय करायचं सर

  3. हो सर, रोज करू बोलून बोलून खूप वेळ आधीच निघून आले पण असं होऊ नये म्हणून काय करू

Leave a Comment

Your email address will not be published.

Don`t copy text!