कृषीसेवक होणार का कृषी पदविका धारक ?

(Last Updated On: January 11, 2018)
4,934 Views

अन्न, वस्त्र,निवारा या सारख्या अनेक गरजा कृषी माध्यमातून भागवता येतात हे सगळ्या जगाला मान्य आहे पण त्याच बरोबर भारत देशाकडे बघितले तर जगात आपली आजही कृषिप्रधान देश म्हणून ओळख आहे. ‘पारंपरिक पद्धतीने शेती करणारा देश’ अशी भारताची ओळख आणि त्यातून कमी उत्पादकता ह्यावर उपाय म्हणून देशाच्या ध्येय धोरणात कृषि शिक्षण, कृषि विद्यापीठे,शेती शाळा यांचा समावेश केला गेला .ह्यातून पारंपारिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन  स्वयंपूर्णते कडे भारताची वाटचाल सुरु झाली.आणि आजही यशाच्या दिशेने आपली घौडदोड चालूच आहे

पण ह्यासर्वामध्ये सर्वात महत्वाचा असणारा घटक दुर्लक्षित होत जातोय  का ? कि उद्योग प्रधान देश बनवायचा म्हणून मुद्दाम ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले जातेय? कृषिविकासनासाठी महत्वाचा असणारा कृषी अभ्यासक्रम ठरवून तर दुर्लक्षित होत नाहीये ना?

कारण कृषी पदविका धारकांच्या भरती प्रक्रियेत होणारी दिरंगाई आणि त्यातून कृषी क्षेत्राबद्दल निर्माण  होणारी उदासीनता ही ह्या अभ्यासक्रमासाठी धोक्याची घंटा आहे. कृषि पदविका धारकाचा ग्रामस्तरावर कृषि विकासासाठी चांगला उपयोग होऊ शकतो परंतु ह्या कडे  शासन जाणीवपूर्वक  दूर्लक्ष करत आहे असेच आता वाटायला लागले आहे.

कृषि पदविका साठी १० वी नंतर २ वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर ह्या पदविकाधारकांना कृषीसेवक ह्या तृतीय श्रेणीच्या पदावर नियुक्ती दिली जात असते. पण मागील काही वर्षांचा हिशोब बघता येणाऱ्या काळात ह्या अभ्यासक्रमाकडे कुणीचं वळणार नाही असेच दिसते आहे.

कारण इकडे येऊनही खालील समस्या ह्या कायम असणार आहेत:

  • कृषि पदविका धारकांच्या संखेत दरवर्षी वाढ होत आहे मात्र नवीन कृषीसेवकभरती लालफितीत आणि भ्रष्ट्राचाराच्या वलयात अडकेलेली आहे .याचा पुरावा म्हणून वर्तमान पत्रातील मागील काही दिवसात आलेल्या बातम्या सांगता येतील

 

  • पूर्वी ह्या पदविका धारकांसाठी असणारी ग्रामसेवक ह्या  पदाची अहर्ता आता  १२ वी केल्याने हा अभ्यासक्रम करून ग्रामसेवक होण्यापेक्षा १२ वी नंतरच ग्रामसेवक  का होऊ नये  हा न सुटणारा प्रश्न निर्माण होतो.
  • कृषिसेवक पदाची भरती प्रत्येक वर्षी  होत नाही  आणि जरी झाली तरी भरती प्रक्रियाचे घोंगडे  कित्येक दिवस भिजत राहून त्यावर ठोस निर्णय होत नाही कारण एकदा भ्रष्ट्राचार आणि मग निर्मुलन यांचा  ‘तू मारल्यासारखे कर मी रडल्यासारखे करतो ‘ हा खेळ वर्षानुवर्षे खेळला जातो.
  • त्याच  बरोबर कृषि पदविका धारकांच्या वाढत्या वयाची समस्या हा वाचायला गमतीदार वाटणारा मुद्दा असेल तरीही कित्येक कृषीसेवक हे अभ्यासक्रम पूर्ण करून नौकरीची वाट बघत आहे आणि मुळे नक्कीच ह्या अभ्यासक्रमाबद्दल उदासीनता निर्माण झालेली आहे

 

कृषीसेवक पदाची भरती बरेच वर्ष न होण्याला आणि झाली तरी तिचे स्वरूप , प्रक्रिया वादग्रस्त असण्याला मात्र खालील गोष्टीच कारणीभूत असतील असे वाटते आहे

  • भरती प्रक्रियाबद्दल  शासनाची भूमिका पूर्णतः उदासीन असल्याचे स्पष्ट होते कारण प्रत्येक वर्षी समान चुका होऊन हि त्यात सुधारणा साठी ठोस पाऊले उचलल्या गेल्याचे दिसून येत नाही.
  • भरती प्रक्रियेत निश्चितपणे पारदर्शीपणाचा अभाव असला पाहिजे कारण मागील वर्तमान पत्रातील बातम्या सरळ सरळ गैर व्यवहार झाल्याचे दर्शवतात.
  • परीक्षाचे स्वरुप पारंपारिक पद्धतीची offlline परीक्षा असे असल्याने निश्चितच त्यामध्ये मानवी हस्तक्षेपाला वाव आहे असे म्हणता येईल.

 

ह्यामुळेच सर्व स्तरावरील कृषी पदविका धारकाकडून खालील मागण्या सातत्याने  होत असतात:

  • शासनाने ग्रामसेवक पदासाठीची अहर्ता पुन्हा कृषि पदविका करावी ह्या मुले कृषी पदविका धारक विद्ध्यार्थ्याना सरकारी नोकरीच्या संधी आताच्या तुलनेत जास्त मिळतील
  • कृषि सेवक पदाची अहर्ता फक्त कृषि पदविका करावी किंवा कृषी पदवी धारक आणि कृषी पदविका यांच्यात सीमारेषा स्पष्ट करून दोन्ही अभ्यासक्रमाला योग्य न्याय द्यावा

शेवटी काहीही झाले तरी कृषी सारखा महत्वाचा विषय दुर्लक्षून चालणार नाहीये आणि त्याच प्रमाणे कृषी पदविका ह्या अभ्यासक्रमाचे ग्रामीण भागातील कृषी विकसनासाठी किती महत्वाचे आहे ह्या कडे दुर्लक्ष करता येणार नाही. 

Post by Yokitho..

आमच्या इतर लोकप्रिय पोस्ट वाचा

आता तरी भरती करा….

नेमके काय बदलयं?

जेव्हा मंत्री महोदय तावडे खुलासा करतात….

रिक्त पदांसाठी सर्व उमेदवार पात्र

फेसबुक

Share

Comments वाचा

Published by
Y K Thorat

Recent Posts

पोलीस भरती साठी WhatsApp ग्रुप.

पोलीस भरतीसाठी WhatsApp Group जॉईन करा पोलीस भरतीसाठी WhatsApp Group पोलीस भरतीसाठी इतर अभ्यास ग्रुप… Read More

1 year ago

Police Bharti New GR (नवीन शासन निर्णय)

नुकताच गृह विभागाने एक शासन आदेश प्रकाशित केला आहे त्यानुसार पोलीस भरती सेवा प्रवेश 2011… Read More

3 years ago

Police Bharti 2021 साठी लेखी परीक्षा आधी पाहिजे की मैदानी चाचणी ?

Police Bharti चे Ground आधी व्हायला हवे की Written Exam आधी व्हायला हवी? हा प्रश्न… Read More

3 years ago

[ Maha Pariksha Portal Exam ] लेखी परीक्षेचा अभ्यास योग्य पद्धतीने करत आहात का?

Maha Pariksha Portal Exam च्या परीक्षेत यश मिळवायचे असेल तर अभ्यासाचे नियोजन अशा प्रकारे करा.अभ्यास… Read More

4 years ago

आरोग्य विभागाच्या तांत्रिक घटकाच्या तयारी साठी कोणते पुस्तक वापरू?

आरोग्य विभागाच्या परीक्षेतील तांत्रिक घटकाची तयारी करून घेणारे एक परिपूर्ण पुस्तक तुम्हाला माहित आहे का?… Read More

4 years ago

वर्दी मिळवण्याचे सूत्र ( पोलीस भरती : FIGHTER )

खूप वर्षापासून पोलीस भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या मात्र सतत अपयशी ठरणाऱ्या मित्रांशी चर्चा केली तर… Read More

4 years ago