Table of Contents
Everything about Maharashtra Police Bharti 2019 2020
Maharashtra Police Bharti 2019 2020
पोलीस भरती परीक्षेच्या तयारी साठी परिपूर्ण गाईड….
( Last updated on 02.08.2020 )

आजची Free Maharashtra Police Bharti 2020 Test दिली का ?
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या भावी पोलिसांसाठी रोज एक फ्री पोलीस भरती टेस्ट घेतली जाते हे तुम्हाला माहिती आहे का ?
Police Bharti Maharashtra 2019 2020 भरती प्रक्रिया बद्दल आणि Exam Date बद्दल सर्व महत्वाच्या अपडेट्स
हे पोलीस भरती परफेक्ट गाईड कसे वापरायचे ?
हे पोलीस भरती परफेक्ट गाईड कसे वापरायचे ? तुम्ही इथे दिलेली माहिती वाचत असताना , मध्ये मध्ये काही निळ्या अक्षरात लिहिलेली वाक्य येतील जसे कि पोलीस भरती ची तयारी कशी करावी ? ह्या प्रत्येक निळ्या अक्षरात असणाऱ्या वाक्यावर click करून तुम्ही त्या बद्दल एक पूर्ण आर्टिकल वाचू शकता . निळ्या अक्षरात असणारे ते वाक्य म्हणजे एका पूर्ण आर्टिकल ची लिंक आहे. मग वेळ वाया न घालवता हे पोलीस भरती परफेक्ट गाईड वाचायला सुरुवात करा…
Latest News : Police Bharti
पोलीस भरती बद्दल सर्वात नवीन बातमी आणि UPDATES
पोलीस भरती होणार डिसेंबर आधी
पोलीस भरती : आधी भरलेल्या फॉर्म चे काय होणार ? नवीन उमेदवार भरू शकतील का फॉर्म ?पोलीस भरती साठी 2019 मध्ये भरलेले अर्ज धरणार ग्राह्य… नवीन उमेदवारांना देखील मिळणार संधी ! भरती प्रक्रिया डिसेंबर अखेर पूर्ण करण्याची पुन्हा एकदा घोषणा.

पोलीस भरतीच्या नियमात पुन्हा होऊ शकतो बदल….

पोलीस भरतीच्या नियमात पुन्हा होऊ शकतो बदल…. Read This News Here
पोलीस भरती प्रक्रियेतील गोंधळाने उमेदवार धास्तावले

[ Date 28.06.2020 ] आनंदाची बातमी : राज्यात पोलीस पदांची भरती लवकरच : गृहमंत्री – श्री अनिल देशमुख
सांगली दौऱ्यावर असणारे राज्याचे गृहमंत्री श्री अनिल देशमुख यांनी Maharashtra Police Bharti संदर्भात एक महत्त्वाची माहिती दिली आहे.
कोरोनामुळे राज्यात आठ हजार पदांसाठी होणारी Maharashtra Police Bharti मागील काही महिन्यांपासून रखडलेली आहे.
ही रखडलेली भरती प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

Maharashtra Police Bharti नेमकी कधी आणि कशी होणार? / महाराष्ट्र पोलीस भरती केव्हा आहे 2020
गृहमंत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार ह्या वर्षीची पोलीस भरती डिसेंबर महिन्याच्या आधी होणार आहे .
दिनांक 28 जून 2020 रोजी सकाळ वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या या बातमीमध्ये सविस्तर माहिती नसली तरीही काही गोष्टींचा अंदाज लावला जाऊ शकतो.
- कोरोनाच्या जागतिक समस्येचा आज सर्वच सरकारी यंत्रणा वर अतिरिक्त भार पडला आहे. आणि यामध्ये आरोग्य सेवा आणि पोलीस यंत्रणा यांची सर्वाधिक दमछाक झाली आहे.
- राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याबरोबरच या प्रकारच्या वैश्विक महामारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणेत अतिरिक्त मनुष्यबळाची गरज निर्माण झाली आहे.
यासाठी Maharashtra Police Bharti आणि आरोग्य सेवेतील भरती लवकरात लवकर गरज निर्माण झाली आहे.
वेगवेगळ्या खात्यातील नवीन पदभरतीला स्थगिती दिलेली असतानाही Maharashtra Police Bharti होईल का?
आर्थिक भार कमी करण्यासाठी आणि त्याच बरोबर प्रशासन यंत्रणा फक्त महत्त्वाच्या कामांसाठीच वापरता यावी. यासाठी विविध शासकीय विभागातील नवीन पद भरतीला स्थगिती दिली आहे.
मात्र यातून आरोग्य सेवा आणि अन्य तात्काळ सेवा वगळण्यात आलेल्या आहे.
त्यामुळे भरती प्रक्रियेला स्थगिती देऊनही Maharashtra Police Bharti प्रक्रिया पार पाडली जाऊ शकते.
होणाऱ्या Maharashtra Police Bharti प्रक्रियेमध्ये कोरोनामुळे काय अडथळे येऊ शकतात?
वेळेची गरज लक्षात घेता ही भरतीप्रक्रिया लगेच राबविण्याचे ठरवले असतानाही यामध्ये काही अडचणी येऊ शकतात.
Maharashtra Police Bharti प्रक्रियेतील अविभाज्य घटक म्हणजे मैदानी चाचणी होय. आणि मैदानी चाचणी सारख्या ठिकाणी मास गॅदरिंग होणारच.
मग अशावेळी सोशल डिस्टंसिंग यासारख्या महत्त्वाच्या निकषाचे पालन कसे करणार? हा या भरती प्रक्रियेत मोठा अडथळा ठरू शकतो.
यासाठी प्रशासकीय स्तरावर कोणते नवीन उपाय योजले जाऊ शकतात हे महत्त्वाचे आहे. कारण तरच ही भरती प्रक्रिया कोरोना च्या पार्श्वभूमीवर राबवणे शक्य होईल.
या सर्व गोष्टींचा विचार करत असता – Maharashtra Police Bharti प्रक्रियेत कोणत्या गोष्टीला महत्त्व प्राप्त होईल?
शासनाने या आधीच शासन आदेश काढून Maharashtra Police Bharti प्रक्रियेत Written Exam आधी घेण्याबाबत सांगितले आहे.
याशिवाय Physical Test चे भारांकन कमी केले आहे. Written Exam आधी होण्याबरोबरच Physical Test साठी असणारे एकूण गुण 100 ऐवजी 50 करण्यात आले आहे.
या गोष्टीचा विचार करता येणाऱ्या भरती प्रक्रियेत Written Exam खूप महत्त्वाची ठरू शकते. कारण Physical Test आयोजित करण्यात येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी मैदानी चाचणी आणखी दुय्यम स्थान प्राप्त होऊ शकते.
Maharashtra Police Bharti तयारी करणाऱ्या उमेदवारांनी खालील गोष्टींवर लक्ष केंद्रित करून आपली तयारी सुरू ठेवली पाहिजे
1) शासनाच्या सर्व विभागातील पदभरतीना आलेल्या स्थगिती मुळे यावर्षीच्या पोलिस भरतीमध्ये स्पर्धा बघायला मिळणार आहे.
2) खाजगी क्षेत्रातील बऱ्याच नोकऱ्यांवर परिणाम झाल्यामुळे बराच तरुण वर्ग यावर्षीच्या Maharashtra Police Bharti सारख्या सरकारी पदावर आपले नशीब आजमावून पाहणार आहे.
3) सोशल डिस्टंसिंग चे पालन करत मास गॅदरिंग टाळायची असेल तर कोरोनाच्या काळात होणाऱ्या या भरती प्रक्रियेत लेखी परीक्षेवरच सर्वाधिक भर असेल.
जर तुम्ही Maharashtra Police Bhartiसाठी तयारी करत असाल तर खालील काही गोष्टी तुमच्या साठी खूप महत्त्वाच्या आहेत.
Maharashtra Police Bharti लेखी परीक्षेचा भरपूर सराव करणे.
लेखी परीक्षेच्या सरावासाठी 200 पेक्षा अधिक सराव प्रश्नपत्रिका आणि 3500 पेक्षा अधिक सराव प्रश्न आमच्या संकेत स्थळावर अगदी फ्री उपलब्ध आहे.
खालील बटणावर क्लिक करून तुम्ही हे सर्व प्रश्न आणि प्रश्नपत्रिका फ्री मध्ये सोडवू शकता.
अभ्यास करणाऱ्या मित्रांच्या संपर्कात राहणे –
कोणताही अभ्यास करताना ग्रुप स्टडी खूप महत्वाचा आहे.
हा ग्रुप स्टडी करता यावा म्हणून आम्ही Maharashtra Police Bharti परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांचा विषयानुसार वेगवेगळे स्टडी ग्रुप तयार केले आहे.
या ग्रुप्स मध्ये सदस्य संख्या खालील प्रमाणे आहे :
- गणिताचा ग्रुप : 6000 members
- बुद्धिमत्ता चाचणी साठी ग्रुप : 5000 members
- पोलीस भरती सामान्य ज्ञान आणि चर्चा ग्रुप : 17000 members
या सर्व ग्रुपला जॉईन करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.
त्याचप्रमाणे बरेच व्हाट्सअप ग्रुप ही उपलब्ध आहे आपण खालील बटणावर क्लिक करून या ग्रुपचे सदस्य होऊ शकता.
फेसबुक वरती 6000 मित्रांच्या Maharashtra Police Bhartiच्या ग्रुप चे सदस्य होण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.
मैदानी चाचणी नंतर लेखी परीक्षा : पुढारी सातारा आवृत्ती
07 Feb. 2020 : मैदानी चाचणी आधी ह्या संदर्भात पुढारी ह्या वृत्तपत्रात 07 फेब्रुवारी 2020 रोजी एक बातमी प्रसिद्ध झाली आहे .
Maharashtra Police Bharti Exam Date बाबत शासन स्तरावरून अजून कोणताही खूलासा करण्यात आलेला नाही मात्र ‘ मैदानी चाचणी आधी घ्या ‘ असे म्हणणाऱ्या अनेक उमेदवारांची इच्छा सतत तेवत ठेवण्याचे काम प्रसार माध्यमे सतत करत आहे.

पुढारी ह्या वृत्तपत्रात 7 फेब्रुवारी 2020 रोजी प्रसिद्ध झालेल्या एका बातमीनुसार मैदानी चाचणी आधी घेण्याबाबत शासन स्तरावर हालचाली चालू असल्याचे समजते.
मात्र तरीही ह्या बातमी कडे बघता ह्या मध्ये अजून याबाबत शासन निर्णय झाल्याचे स्पष्ट होते.
संबंधित बातमी आपण खालील लिंक वर क्लीक करून वाचू शकता .
मैदानी चाचणी नंतर लेखी परीक्षा : पुढारी सातारा आवृत्ती
[ मैदानी चाचणी नंतर लेखी परीक्षा ] पोलीस भरतीचा शासन निर्णय पुन्हा बदलणार का?
11 Jan. 2020 : पोलीस भरती मध्ये आता पुन्हा लेखी परीक्षेआधी फिजिकल टेस्ट घेतली जाणार ह्या आशयाची बातमी वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे आणि ह्या मुळे पुन्हा एकदा उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
लेखी परीक्षा आधी होणार ह्याबद्दलचा शासन निर्णय ह्या भरती पासून लागू झालेला आहे मात्र राज्यात सरकार बदलल्यामुळे नवीन सरकार हा शासन निर्णय बदलून पुन्हा फिजिकल टेस्ट आधी घेणार का ? हा महत्वाचा प्रश्न आहे
आज वृत्तपत्रात प्रकाशित झालेली बातमी ह्या प्रमाणे आहे.

ही बातमी बघता खालील गोष्टी ह्या बातमीच्या सत्यतेबद्दल प्रश्न चिन्ह उपस्थित करतात.
- बातमी मध्ये कुठलेही ठोस विधान आढळत नाही जसे कि संबंधित माहिती शासनाच्या कोणत्या विभागाकडून घेण्यात आली किंवा कोणत्या अधिका-याने ह्या बद्दल माहिती दिली.
- बातमी मध्ये राज्यात रिक्त पदे ( अकरा हजार ) चा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र राज्यात भरती प्रक्रिया याआधीच सुरु झालेली आहे. महापोर्टल ला दिलेल्या स्थगिती मुळे सध्या सर्व भरती प्रक्रिया रखडल्या आहेत. बातमी नुसार रिक्त पदे भरवयाची असल्यास नव्याने भरती प्रक्रिया सुरु करावी लागेल.
शासन स्थरावर याबाबत हालचाली चालू असण्याचीही शक्यता नाकारता येत नाही कारण ठरल्याप्रमाणे महापोर्टल वर झालेल्या भ्रष्टाचा-याच्या आरोपानंतर त्यास त्वरित नवीन सरकार द्वारा स्थगिती देण्यात आली आहे.
अजून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा शासन किंवा पोलीस विभागाद्वारा करण्यात आली नसली तरी उमेदवारांनी ह्या दोन्ही परिस्थिती साठी तयार असणे फायद्याचे ठरेल.
25 Dec 2019 : नवीन सरकार द्वारा पोलीस भरतीचे नियम पुर्वरत करण्याबद्दल हालचाली ( शारीरिक चाचणी लेखी परीक्षेअगोदर )
Maharashtra Police Bharti 2019 सेवाप्रवेश साठी नुकताच जी आर बदलण्यात आलेला आहे मात्र नवीन सरकार द्वारा ह्या जी आर नुसार बदलेल्या शर्ती पुन्हा पूर्वरत करण्याचा हालचाली सुरु असल्याचे लक्षात येते आहे. शारीरिकदृष्ट्या सक्षम उमेदवारांची निवड पोलीस म्हणून करण्यात यावी यासाठी शारीरिक चाचणी लेखी परीक्षेअगोदर घ्यावी यासाठीचे निवेदन खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले आहे.


45000 भावी Maharashtra Police असणाऱ्या टेलिग्राम चॅनल मध्ये तुम्ही आहात का ?
पोलीस भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या एका महत्वाच्या चॅनल चे तुम्ही सदस्य नसाल तर खालील लिंक वर क्लिक करून लगेच सदस्य व्हा … !
[ तुमच्या मोबाईल मध्ये टेलिग्राम असणे आवश्यक ].
Police Bharti Written Exam Preparation – लेखी परीक्षेची तयारी
पोलीस भरती परीक्षेसाठी लेखी परीक्षेची तयारी कशी करावी?
ह्या वर्षी ची पोलीस भरती ही मागील सर्व भरती पेक्षा वेगळी असणार आहे. Maha Pariksha Portal द्वारा ह्या परीक्षेचे नियोजन Online घेण्याचे ठरले आहे ( सध्या जरी Maha Pariksha Portal द्वारा घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षांना स्थगिती देण्यात आली असली तरीही Police Bharti Online स्वरूपातच होणार जवळपास नक्की झाले आहे.)
Maha Pariksha Portal च्या द्वारे घेतल्या जाणाऱ्या online परीक्षांचे स्वरूप हे नेहमीच्या परीक्षाच्या स्वरूपापेक्षा झुप वेगळे असते . अश्या वेळी जर उमेदवार नेहमी सारखाच अभ्यास करत राहिला तर त्याला या परीक्षेत यश मिळवता येणार नाही.
महा परीक्षा पोर्टल च्या परीक्षांची अभ्यास करण्याची एक खास पद्धत आहे. तुम्ही खालील आर्टिकल वाचून त्याबद्दल अधिक वाचू शकता.
महा परीक्षा पोर्टलच्या परीक्षामध्ये यश मिळवण्यासाठी अभ्यास कसा करावा?
Online Exam म्हणजे बऱ्याच मित्रांना पोलीस भरती कठीण झाली असे वाटते मात्र फक्त online झाली म्हणून नाही तर ह्या वेळी लेखी परीक्षा आधी होणार आहे म्हणून हि परीक्षा कठीण होत जाते आहे हे आपण लक्षात घ्यायला हवे.
ह्या वेळी स्पर्धेला उतरणारे बरेच मित्र हे वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे असणार आहेत. त्यावेळी मात्र लेखी परीक्षेचे मेरीट जास्त लागणार आहे ह्यात शंका नाही. पण तरीही योग्य नियोजन आणि अभ्यासाच्या जोरावर खूप दिवसांपासून वर्दीची तयारी करणारे मित्र आपणही कमी नाही हे दाखवून देवू शकतात.
सर्वात महत्वाचा प्रश्न मात्र हा विचारायला हवा कि तुम्ही वर्दी मिळवण्यासाठी योग्य नियोजन आणि अभ्यास कसा करायला हवा?
सगळ्यात सोपे आणि एका वाक्यात उत्तर द्यायचे असेल तर उत्तर आहे : गणित आणि बुद्धिमत्ता विषयाची भरपूर तयारी करा आणि त्यात पैकीच्या पैकी मार्क्स मिळवण्याच्या प्रयत्न करा.
फक्त गणित आणि बुद्धिमत्ता ह्या दोन विषयाबद्दल पैकीच्या पैकी मार्क्स घेणे या साठी गरजेचे आहे कि हे दोन विषय असे आहेत जिथे तुम्ही महाराष्ट्रातील खूप सर्व उमेदवारांना मागे टाकू शकता.
मराठी आणि सामान्य ज्ञान हे दोन विषय तितकेच महत्वाचे आहे मात्र ह्या वेळी लेखी परीक्षा आधी असल्यामुळे MPSC, ZP आणि इतर Govt परीक्षांची तयारी करणारे उमेदवार ह्या वेळी लेखी परीक्षेचे मेरीट वाढवणार आहे नक्की. ह्या सर्वामध्ये गणिताची समस्या असणारे खूप लोक असतील. जर तुमचे गणित चांगले असेल तर मेरीट मध्ये तुम्ही ह्या लोकांना मागे टाकू शकता.
लेखी परीक्षेच्या तयारी साठी काही महत्वाच्या गोष्टी:
आपल्या हातात सतत mobile असतो आणि त्याच्यावर सतत आपण फेसबुक WhatsApp, Telegram, YouTube बघत असतो परंतु ह्यामध्ये आपला खूप वेळ जातो. हे वरील साधने वेळ वाया घालवतात म्हणून वापरणे बंद करा असे म्हणता येणार नाही कारण आता ते शक्य नाही
मात्र समजा हे साधने वापरून भरपूर अभ्यास करता येऊ शकतो असे सांगितले तर? हो तुम्ही वापरत असणारे सर्व सोशल मेडिया वापरून अभ्यास करता येणे शक्य आहे. ह्या बाबत एक संपूर्ण पोस्ट लिहिलेली आहे . समोर दिलेल्या बटन वर क्लिक करून तुम्ही ती पोस्ट वाचू शकता
Police Bharti 2020 च्या तयारीसाठी वाचावे असे काही महत्वाचे आर्टिकल्स
हे आर्टिकल्स तुम्हाला पोलीस भरती परीक्षेच्या तयारी साठी प्रेरणा देण्याचे काम करेल
तुमच्या सोबत असे घडते का ? की तुम्ही कित्येक वर्षापासून तयारी करून देखील तुमच्याकडून पोस्ट निघत नाहीये? असे खूप मित्रांच्या बाबतीत होते. ते भरपूर अभ्यास मेहनत करतात मात्र तरीही त्यांना यश मिळत नाही. काय चुकत असेल बर अश्या मित्रांचे ? अश्या मित्रांचे वर्दी मिळवण्याचे सूत्र चुकतेय…
तुम्हाला माहिती आहे का हे वर्दी मिळवण्याचे सूत्र’? समोर दिलेल्या लिंक वर क्लिक करून वाचा काय आहे वर्दी मिळवण्याचा फोर्मुला… पोलीस भरती वर्दी मिळवण्याचे सूत्र
Police Bharti Physical / Ground Test Preparation – शारीरिक चाचणीची तयारी
पोलीस भरती परीक्षेसाठी Ground ची तयारी कशी करावी?
ह्या वर्षी फिजिकल टेस्ट साठी निकष बदलण्यात आले आहे आणि म्हणून नवीन events प्रमाणे तयारी करावी लागणार आहे. फिजिकल टेस्ट फक्त 50 गुणांची असणार आहे. त्या 50 पैकी तुम्ही किती गुण घेऊ शकता ह्या साठी एक सोपे Calculator ह्या website वर उपलब्ध आहे.
खालील लिंक वर क्लिक करून तुम्ही हे calculator वापरून तुमचे मार्क्स बघू शकता.
Police Bharti All News and Updates
Police Bharti बद्दलच्या सर्व महत्वाच्या बातम्या आणि चर्चेतील घटना
8 Dec. 2019 : Maha Pariksha Portal ला स्थगिती दिल्यामुळे पोलीस भरती लांबणार
महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षा पद्धतीतील त्रुटी दूर होईपर्यत, पोर्टलद्वारे होणाऱ्या परीक्षांना स्थगिती देण्याचा महत्त्वाचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माहिती तंत्रज्ञान विभागाच्या आढावा बैठकीत घेतला. महापरीक्षा पोर्टलमधील त्रुटी दूर होण्यासाठी सर्व उपाययोजना केल्यानंतरच परीक्षा ऑनलाइन घेण्याच्या सूचना ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या
पूर्वी अर्ज स्वीकृतीची मुदत ही 22 डिसेंबर 2019 होती आता नवीन अंतिम मुदत ही 08 जानेवारी 2020 असणार आहे
अधिक माहिती साठी इथे click करून महाराष्ट्र पोलीस खात्याचे अधिकृत शुद्दीपत्रक वाचा
2 Dec. 2019 : पोलीस चालक शिपाई आणि राज्य राखीव पोलीस शिपाई पदाच्या अर्ज भरण्यास मुदतवाढ
पोलीस चालक शिपाई आणि राज्य राखीव पोलीस शिपाई पदाच्या अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे . राज्यातील पोलीस चालक शिपाई ह्या पदासाठी आवश्यक सेवा शर्ती नुसार उमेदवाराने वाहक परवाना ( वाहतूक ) LMV- TR धारण करणे आवश्यक आहे. त्यासाठी उमेदवारांना हा परवाना मिळवण्यासाठी पुरेसा वेळ मिळवा म्हणून विभागाद्वारअर्ज स्वीकृतीची अंतिम तारीख वाढवून दिली आहे.
Police Bharti – तयारी महत्वाचे ठरणारे काही आर्टिकल
पोलीस भरतीची तयारी करत असताना खालील आर्टिकल ची नक्कीच तुम्हाला मदत होईल.
खूप उमेदवार याबद्दल प्रश्न विचारतात कि पोलीस भरतीच्या तयारीसाठी कोचिंग क्लासेस जॉईन करणे गरजेचे आहे का? आणि मित्रांनो प्रत्येक वेळी त्या त्या प्रत्येक उमेदवाराशी बोलून या बद्दल सल्ला मी देत असतो. आता सध्या हे वाचत असताना तुमच्याही डोक्यात हा विचार जर चालू असेल तर..
मी तुम्हाला ह्या बद्दल लिहिलेले एक विस्तृत आर्टिकल वाचायला सांगेल कारण हे ज्याच्या त्याला ठरवायचे असते कि मला क्लासेस ची गरज आहे कि नाही?
पण हे प्रत्येकाला ठरवणे शक्य होत नाही म्हणून ह्या आर्टिकल च्या माध्यमातून हे ठरवण्यासाठी मी तुम्हाला एक दिशा देतो आहे. पुढे असणाऱ्या निळ्या वाक्यावर क्लिक करून तुम्ही हे आर्टिकल वाचू शकता.
Police Bharti New GR ( पोलीस भरती नवीन जी आर )
पोलीस भरती ह्या वर्षी Online झाली आहे . फिजिकल टेस्ट चे मार्क्स 100 वरून 50 करण्यात आले आहे. Ground Events मध्ये बरेच बदल करण्यात आले आहे. लेखी परीक्षा आधी घेतली जाणार आहे. ह्या सर्व बदला बद्दल तुम्हाला परिपूर्ण माहिती आहे ना ? कि अजूनही जुन्या pattern नुसार अभ्यास करत आहात? जर तुम्हाला हे बदल माहिती नसेल तर तुम्ही खूप मोठी चूक करत आहात.
खालील लिंक वर क्लिक करून हे आताच नवीन झालेले बदल माहित करून घ्या म्हणजे त्यानुसार तुम्हाला तयारी करता येईल.
पोलीस भरती प्रक्रियेच्या सेवा प्रवेश नियमाबद्दल तुम्हाला कितपत माहिती आहे? हे झाले आहेत नवीन बदल
Maharashtra Police Bharti 2020 : सामान्य माहिती
Police Bharti बद्दल सर्व माहिती
विभागाचे नांव : | Police Department |
भरती प्रक्रियेचे वर्ष : | 2019-2020 |
पदाचे नांव : | 1) Police Shipayi 2) Karagruh Shipayi |
जागांची संख्या : | 3140 + 1625 |
अर्ज करण्याची पद्धत : | Online mode |
पे स्केल : | 5200-20200 (GP 2000+other) |
अधिक माहिती साठी | mahapolice.gov.in |
Maharashtra Police Bharti 2020 – Age Limit : पोलीस भरती वयोमर्यादा 2020
सेवाप्रवेश अधिनियमानुसार पोलीस भरती परीक्षेसाठी वयोमर्यादा ठरवण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी राज्य सरकार द्वारा ह्यात बदल करून वयोमर्यादा वाढवण्याबाबत बातमी प्रकाशित झाली होती पण तूर्तास तरी ह्या मध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाही.
वयोमर्यादा वाढली असता त्याबद्दल लवकरच माहिती अधिकृत संकेत स्थळावर देण्यात येईल. उमेदवारांनी पोलीस विभागाचे संकेतस्थळाला भेट देऊन त्याबद्दल अधिकृत माहिती घ्यावी.
General Category | 18 to 28 Years |
Reserve Category | 18 to 33 Years |
वयोमर्यादा वाढीबद्दल काही नवीन बदल असेल तर तो आमच्या वाचकांसाठी लवकरच उपलब्ध करून देऊ. ह्या साठी पोलीस भरतीच्या टेलिग्राम ग्रुप मध्ये सदस्य बनून तुम्ही latest updates मिळवू शकता.
Police Bharti 2020- Educational Qualification : महाराष्ट्र पोलीस भरती पात्रता
पोलीस भरती प्रकिये साठी निर्धारित करण्यात आलेली शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे आहे :
- पोलीस शिपाई : बारावी पास किंवा समकक्ष
- कारागृह शिपाई : बारावी पास किंवा समकक्ष
Maharashtra Police Bharti 2020 – Physical Ability : पोलीस भरती शारीरिक पात्रता
पात्रता निकष | उंची | छाती |
महिला | 155 cm | – |
पुरुष | 165 cm | न फुगवता 79 cm , फुगवून 79 + 5 = 84 cm किंवा अधिक |
Police Bharti 2020 Important Dates: महत्वाच्या तारखा
Starting Date For Online Application | New Dates Will Be updated |
Last Date For Online Application | New Dates Will Be updated |
Written Exam : लेखी परीक्षा
पोलीस भरती परीक्षा सुधारित सेवा प्रवेश नियमामध्ये बदल करण्यात आलेला असला तरीही लेखी परीक्षेच्या स्वरुपात कोणताही बदल बघण्यास मिळत नाही. मात्र लेखी परीक्षा आधी होत असल्या कारणाने ह्याचा परिणाम Police Bharti Merit वरती नक्की होणार हे सत्य आहे
विषय | गुण |
मराठी | 25 |
गणित | 25 |
बुद्धिमत्ता | 25 |
सामान्य ज्ञान | 25 |
एकूण | 100 |
नवीन नियमानुसार उमेदवाराला लेखी परीक्षेत खुला प्रवर्गाला 35 % आणि आरक्षित प्रवर्गाला 33 % गुण घेणे आवश्यक असेल. लेखी परीक्षेची ही पात्रता पूर्ण करणारा उमेदवारच फिजिकल टेस्ट साठी पात्र असेल. लेखी परीक्षा गुण 100 आणि वेळ 90 मिनिटे
Physical test : फिजिकल टेस्ट Police Bharti 2020
पोलीस सेवा प्रवेश सुधारित नियम 2019 नुसार सर्वात जास्त बदल ह्या भागात झालेला पाहायला मिळतो. ह्यापूर्वीचे फिजिकल टेस्ट चे पात्रता निकष आणि EVENT कठीण होते आता मात्र उमेदवारांसाठी हा नवा बदल सोयीस्कर ठरणार आहे.
फिजिकल टेस्ट मध्ये खालील प्रमाणे बदल झालेले आहे:
- फिजिकल टेस्ट आता फक्त 50 मार्कांची असणार आहे
- लेखी परीक्षेत पास होणा-या ( खुला प्रवर्ग 35% आणि आरक्षित प्रवर्ग 33% ) असणा-या उमेदवारालाच फिजिकल टेस्ट देता येईल.
- एका जागेसाठी पाच असे गुणोत्तर ठरवून फिजिकल टेस्ट साठी उमेदवारांची यादी लावण्यात येईल.
Physical Test for Male Candidates | |
1600 Meters Running | 30 Marks |
100 Meters Running | 10 Marks |
Shot Put | 10 Marks |
Total Marks | 50 Marks |
Physical Test for Female Candidates | |
800 Meters Running | 30 Marks |
100 Meters Running | 10 Marks |
Shot Put (4 KG) | 10 Marks |
Total Marks | 50 Marks |
तुम्हाला फिजिकल टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळतात हे माहिती आहे का? किंवा आमचे फ्री फिजिकल टेस्ट चे calculator वापरून तुमचे फिजिकल टेस्ट चे मार्क्स चेक करा आणि बघा तुम्ही किती उमेदवारांच्या पुढे आहात
पोलीस भरती परीक्षेची तयारी करत असताना सर्व मित्रांना क्लासेस जॉईन करणे शक्य होत नाही आणि म्हणून अश्या मित्रांसाठी अभ्यासाचे काही महत्वाचे स्रोत जे की पूर्ण पणे फ्री आहेत त्यांची माहिती एका आर्टिकल द्वारा देण्यात आली आहे. हे आर्टिकल तुम्ही खालील लिंक वर क्लिक करून वाचू शकता.
Sir police Bharati cha detail syllabus pathva ki plz
police bharti exam date kadi ahe
Thanks you sir
2 form bhrlele aslys jmt ka sir
Hello sir hall ticket kadhi yanar aha me September mady fom bhatala aha kahi hi update nahi ale aha please reply dy
सध्या कोरोना व्हायरस च्या समस्येमुळे भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे.
हॉल तिकीट त्यानंतर उपलब्ध होतील
Kailas Dashrath Waghmare
very good information
……thanks sir/mam
Thanks sir