Table of Contents
आरोग्य विभागाच्या परीक्षेतील तांत्रिक घटकाची तयारी करून घेणारे एक परिपूर्ण पुस्तक तुम्हाला माहित आहे का?
आरोग्य विभागाच्या परीक्षांची तयारी करणारे उमेदवार पुस्तकांच्या दुकानात नेहमी ही चौकशी करताना दिसतात – ‘ तांत्रिक घटक – आरोग्य विभाग असे पुस्तक आहे का ?’ आणि नेहमी प्रमाणे उत्तर मिळते – ‘ फक्त तांत्रिक घटक असणारे पुस्तक नाही पण ह्यामध्ये थोडीफार माहिती दिली आहे.’
थोडीफार माहिती वाचण्यासाठी ते 300 रुपयांचे पुस्तक का विकत घ्यावे ? आणि थोडीफार म्हणजे 30 – 40 पाने असतात त्यात सर्वांना माहित असणारी माहिती असते. ते वाचून झाल्यानंतर ते संपूर्ण पुस्तक इतर पुस्तकासारखे बिनाकामचे होऊन बसते.

पण आता असे होणार नाही कारण
आरोग्य विभागाच्या परीक्षांच्या तयारी साठी एक दर्जेदार पुस्तक सध्या उपलब्ध झाले आहे.
आजच्या आर्टिकल मध्ये आपण त्या पुस्तकाबद्दल बघू.
विजयपथ पब्लिकेशन, पुणे द्वारा प्रकाशित झालेले पुस्तक ‘ आरोग्य विभाग भरती मार्गदर्शक’ आरोग्य विभागाच्या भरती साठी खूप महत्वाचे ठरणार आहे कारण, ह्या पुस्तकामध्ये तांत्रिक घटक खूप चांगल्या प्रकारे समाविष्ट केलेला आहे.
ह्या पुस्तकाबद्दल महत्वाची माहिती :
पुस्तकाचे नाव | आरोग्य विभाग भरती मार्गदर्शक |
प्रकाशक | विजयपथ पब्लिकेशन, पुणे |
लेखन आणि संकलन | विकास सिंदाळकर ( प्रा. शिक्षक) तेजस करपे ( आरोग्य सेवक ) सचिन कुरुंद ( कर सहायक ) |
पुस्तकाची छापील किंमत | 260 रुपये |
कोणत्या परीक्षेसाठी उपयुक्त | आरोग्य सेवक, आरोग्य विस्तार अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता, प्रयोगशाळा सहायक/ तंत्रज्ञ, कक्ष सेवक, रक्तपेढी तंत्रज्ञ आणि अंगणवाडी पर्यवेक्षक. |
पुस्तकात नेमके काय आहे ?
ह्या पुस्तकात एकूण सहा मुख्य भाग आहेत. त्या सहा भागांमध्ये :
- भाग एक : आरोग्यशास्र ह्या विषयाची महत्वाची माहिती ह्या भागात दिली आहे. आरोग्याची व्याख्या , कुपोषण बद्दल माहिती , आरोग्य शास्रातील सिद्धांत , आरोग्य प्रणालीची त्रि स्तरीय रचना इत्यादी.
- भाग दोन : आरोग्य विभागाच्या प्रमुख योजना , राष्ट्रीय किशोर स्वास्थ कार्यक्रम भारतीय औषध उपचार आणि औषधे देण्याच्या काही महत्वाच्या पद्धती इत्यादी.
- भाग तीन : पुस्तकामध्ये असणारा हा एक भाग खूप महत्वाचा आहे कारण ह्या भागामध्ये आरोग्य विभागाशी संबंधित सर्व चालू घडामोडी एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या आहेत.
- भाग चार : हा विभाग परीक्षेच्या दृष्टीकोनातून महत्वाच्या असणा-या प्रश्नांचा आहे. साधारणपणे 1096 प्रश्न विभागात दिलेले आहे.
- भाग पाच : आरोग्य विभागाच्या विविध परीक्षा वर्षभर होत असतात . ह्या परीक्षेत आलेले प्रश्न ह्या भागात दिलेले आहे. 2017, 2018 वर्षापर्यंतच्या प्रश्नपत्रिकांचा ह्या मध्ये समावेश आहे.
- भाग सहा : हा ह्या पुस्तकाचा शेवटचा भाग आहे. आरोग्य विषयक दिन विशेष आणि आणि त्यांचे सखोल स्पष्टीकरण ह्या भागात दिलेले आहे.
ह्या व्यतिरिक्त हे पुस्तक नेमके कसे आहे हे बघण्यासाठी तुम्ही ह्या पुस्तकाची sample copy खालील बटनावर क्लिक करून download करू शकता.
या पुस्तकाचे वैशिष्ट्य :
संपूर्ण तांत्रिक घटक एकाच पुस्तकात :
वेगवेगळे पुस्तक वाचणे त्यातून नोट्स काढणे त्यामध्ये असणाऱ्या माहिती अद्ययावत करून वाचणे. ही अभ्यास करण्याची सर्वात उत्तम पद्धत आहे.
मात्र सर्वांना संदर्भसाहित्य उपलब्ध होईल आणि त्यातून नोट्स काढण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल असे होत नाही.
तुमच्याकडे संदर्भ साहित्याचा अभ्यास करणे नोट्स काढणे यासाठी जर वेळ नसेल तर हे पुस्तक मात्र तुमच्याकडे असलेच पाहिजे.
हे पुस्तक तयार करताना जवळपास 24 संदर्भ साहित्याचा आधार घेण्यात आला आहे आणि म्हणून हे पुस्तक तांत्रिक घटकाबद्दल परिपूर्ण माहिती तुम्हाला एकाच ठिकाणी देऊ शकते.
थोडी थोडी माहिती असणारे तीन चार पुस्तक विकत घेऊन खर्च करण्यापेक्षा हे एकच पुस्तक वापरा.
मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा समावेश :
कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्याची पद्धत म्हणजे प्रश्नपत्रिका मिळवणे आणि त्यांचं विश्लेषण करणे. प्रश्नपत्रिका फक्त सोडवण्यापेक्षा परीक्षेमध्ये नेमकं काय विचारलं जाते हे प्रश्न पत्रिकेतून शोधून काढणे खूप महत्त्वाचे आहे.
या पुस्तकात 2019 पर्यंत आरोग्य विभाग द्वारा घेण्यात आलेल्या विविध परीक्षेतील तांत्रिक घटकाचे प्रश्न वर्षानुसार दिले आहे. हे प्रश्न बघून तुम्हाला परीक्षेत काय विचारले जाते याचा अंदाज येऊ शकतो आणि हा अंदाज एकदा आला की अभ्यास कशाप्रकारे करायचा हे आपोआपच समजते.
या पुस्तकामध्ये आतापर्यंत आरोग्य विभागाच्या झालेल्या परीक्षांमध्ये आलेले तांत्रिक प्रश्न उपलब्ध करून दिलेले आहे ज्यामध्ये अधिपारीचारिका, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, प्रयोग शाळा सहायक आरोग्यसेवक प्रश्नपत्रिका आहे.
दोन हजारांपेक्षा अधिक प्रश्न :
या पुस्तकात तांत्रिक घटकाशी निगडित जवळपास 2000 प्रश्नाचे संकलन केले आहे.
आणि हे सर्व प्रश्न स्पष्टीकरणासहित पुस्तकात दिलेले आहे.
सुटसुटीत आणि वाचण्यास योग्य अशी मांडणी
पुस्तकात 320 पाने आहेत मात्र तरीही अभ्यास करताना अभ्यासाचा कंटाळा किंवा टेन्शन येणार नाही कारण पुस्तकाची मांडणी खूपच सुटसुटीत आणि वाचण्यास सोपी अशी आहे.
खूप छोटा फॉन्ट असणे कमी जागेत खूप माहिती देण्याचा प्रयत्न करणे या सर्व गोष्टी पुस्तकाला कंटाळवाणे बनवतात मात्र हे पुस्तक याला अपवाद आहे.
अद्ययावत अशी सर्व माहिती
बाजारात भरपूर पुस्तके उपलब्ध असतील मात्र अति गावात माहिती असणारे पुस्तक वाचणे उपयुक्त ठरते.
कारण प्रश्न विचारताना त्या त्या विषयातील अद्ययावत माहितीवर विचारला जातो जर तुमचे पुस्तक 2017 18 या वर्षात प्रकाशित झालेले नसेल तर तुम्हाला त्या पुस्तकातील काही बदललेल्या गोष्टी विशेष मेहनत घेऊन जाणून घ्यावे लागतात आणि खूप उमेदवारांचा यामध्ये बराचसा वेळ वाया जातो
हे सर्व टाळण्यासाठी तुम्ही या पुस्तकाची दुसरी आवृत्ती जी जानेवारी 2020 मध्ये प्रकाशित झालेली आहे ती विकत घेऊ शकता
म्हणजे 2019 या पर्यंतची सर्व माहिती तुम्हाला एकाच ठिकाणी मिळेल.
आणि सर्वात महत्वाचं हे पुस्तक कसे विकत घ्याल?
महाराष्ट्रातील मुख्य पुस्तक विक्रेत्यांच्या दुकाना त हे पुस्तक उपलब्ध आहे. मात्र हे पुस्तक तुम्ही अगदी घरपोहच देखील मागवू शकता. यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करावा लागेल.
हे पुस्तक घर पोहोच मागवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा : 9763822323
जर तुम्हीही एखाद्या पुस्तकाचे लेखक असाल आणि आणि तुमचे पुस्तक स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांना उपयुक्त असेल तर तुम्ही contactsbfied@gmail.com ह्या इमेल वर admin शी संपर्क करू शकता. तुमचे पुस्तक खरोखरच दर्जेदार असेल तर ते पुस्तक हजारो मित्रांपर्यंत पोहचवणे आम्हाला आवडेल.

About Mr.Sagar B. Tupe Patil:
राष्ट्रीयकृत बँकेत कार्यरत असणारे Mr. Sagar हे आज SBfied च्या माध्यामतून 40,000 पेक्षा अधिक स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मित्रांच्या संपर्कात आहेत. ग्रामीण भागातून विविध स्पर्धा परीक्षांची तयारी कुठलेही क्लासेस न लावता स्वतः करणाऱ्या असंख्य उमेदवारांना प्रेरित करण्याचे काम ते मागील दोन वर्षांपासून करत आहे.
अश्या जिद्दी आणि मेहनती उमेदवारांना संघटीत करण्याचा आणि ह्या संघटनच्या माध्यमातून अभ्यास आणि अभ्यास साठी आवश्यक प्रेरणा देण्याचे काम आज 24 पेक्षा अधिक WhatsApp ग्रुप, Telegram Channel च्या माध्यमातून होत आहे.
ह्या उपक्रमांमध्ये तुमचीही मदत नक्कीच अपेक्षित आहे. SBFIED Study Initiative च्या माध्यमातून खालील उपक्रम सध्या चालू आहे.
ह्या उपक्रमांमध्ये तुमचीही मदत नक्कीच अपेक्षित आहे.
Add me
सर या पुस्तकात खूप चुका झाल्या आहे