police bharti formula

वर्दी मिळवण्याचे सूत्र ( पोलीस भरती : FIGHTER )

(Last Updated On: August 2, 2020)
3,359 Views

खूप वर्षापासून पोलीस भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या मात्र सतत अपयशी ठरणाऱ्या मित्रांशी चर्चा केली तर खालील वाक्ये हमखास ऐकायला मिळतात.


“ चार वर्षांपासून तयारी करतोय, तरी पण भरती होत नाही, नशीबचं खराब असेल बहुतेक माझे…”

“कितीही मेहनत करा, दर वेळी मेरीट थोडक्यात हुकतेच..”

“सगळे क्लास करून पहिले, पुस्तके वाचून पहिले, पण तरीही भरतीत मागेचं पडतो मी”

“पोलीस भरतीत निवड होणे सोपे नाही, आम्ही पाच पाच वर्षापासून तयारी करतोय पण अजून सिलेक्ट होत नाही”

आणि मग सहाजिकचं मनात प्रश्न येतो कि खरंच ह्या मित्रांचे नशीब खराब असेल का? असे का होत असावे कि काही लोकांना एका वर्षात यश मिळते आणि काहींना खूप मेहनत करून पाच वर्षात एकदा पण नाही? खूप विचार केल्यानंतर मग मात्र ह्या मागचे रहस्य समजले- आणि मित्रांनो हे रहस्य तुम्हाला समजले तर नक्कीच त्याचा फायदा होईल.
हे रहस्य समजण्यासाठी एक साधे गणित आपण बघू;( गणित म्हंटले कि आज ब-याच मित्रांना भीती वाटते पण हे गणित तितके कठीण नाही)
आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा एक सुत्र असते ते असे आहे-

परिस्थिती +प्रतिक्रिया = परिणाम
Situation + Response = Results


हे सुत्र पोलीस भरतीत पण अगदी तंतोतंत लागू होते. पण त्याआधी सूत्र काय आहे हे समजून घेऊ-
समजा आपण आजारी पडलो, आपल्याला बरे वाटत नाही . ह्या मध्ये- आजारी असणे ही झाली परिस्थिती आणि त्याचा परिणाम आहे – अशक्त वाटणे.
हे असे दाखवता येईल:
आजारी पडणे → अशक्त वाटणे
परिस्थिती → परिणाम


आता ‘अशक्त वाटणे’ हा परिणाम चांगला नाही. आरोग्यासाठी सतत आजारी असणे योग्य नाही. म्हणून आपण हा परिणाम कसा बदलता येईल याचा आपण विचार करतो. आणि आजारी पडल्यावर डॉक्टर कडे जाणे हा उपाय आपल्याला सुचतो ; उपचारामुळे आपण बरे पण होतो.
ह्याला आपण सुत्रामध्ये असे मांडू शकतो.

आजारी असणे + डॉक्टर कडे उपचार घेणे → बरे वाटणे


‘अशक्त असणे’, ‘बरे न वाटणे’ हा परिणाम आपण ‘स्वस्थ वाटणे’, ‘बरे वाटणे’ ह्या मध्ये कश्याच्या मदतीने बदलवला? हा परिणाम आपण उपचाराच्या मदतीने बदलवला. आणि ह्या सुत्रा नुसार इथे ‘ उपचार घेणे ‘ हि झाली त्या परिस्थतीवर आपली प्रतिक्रिया.


आयुष्यातला ज्या ज्या परीस्थितीचा परिणाम हा नको असणारा असतो. त्या परिस्थितीला आपण प्रतिक्रिया कशी देतो ह्या नुसार हा परिणाम बदलवता येतो. आपण हे नकळतपणे सतत वापरत असतो.
आता हेच आपल्याला आपल्या पोलीस भरती परीक्षेत यश मिळवण्यासाठी कसे वापरता येईल हे बघू
बऱ्याच मित्रांची समस्या ही असते कि त्यांची लेखी परीक्षेची तयारी नसते. लेखी परीक्षेची तयारी नसणे ह्याचा परिणाम म्हणून आपण भरती होत नाही. याला वरती दिलेल्या सूत्रामध्ये टाकले असता-

लेखी परीक्षेची तयारी नसणे → पोलीस भरतीत अपयशी ठरणे
परिस्थिती → परिणाम

45000 भावी Maharashtra Police असणाऱ्या टेलिग्राम चॅनल मध्ये तुम्ही आहात का ?

पोलीस भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या एका महत्वाच्या चॅनल चे तुम्ही सदस्य नसाल तर खालील लिंक वर क्लिक करून लगेच सदस्य व्हा … !

[ तुमच्या मोबाईल मध्ये टेलिग्राम असणे आवश्यक ].

आतापर्यंत हे सर्व वाचलेले हे सोपे आणि सर्वांना माहित असणारे आहे, पण खरे रहस्य या पुढे आहे.

लेखी परीक्षेला कमी मार्क्स मिळणे आणि म्हणून अपयशी ठरणे ह्या वर अभ्यास हा एक उपाय आहे पण मित्रांनो, अभ्यास तर सर्वच करतात. लेखी परीक्षेला मार्क्स मिळावे म्हणून अभ्यास करावाच लागेल हे सर्वांनाच माहित आहे. मग यश सगळ्यांना का मिळत नाही. हे सर्वात मोठे कोडे आहे. पण हे कोडे आता न सुटणारे राहिलेले नाहीये.

दोन मित्रांच्या उदा. च्या मदतीने हे रहस्य उलगडू.


राम आणि श्याम या दोघांची एकच समस्या आहे- लेखी परीक्षेची तयारी नसणे. दोघेही समान परिस्थितीचे शिकार आहे म्हणून दोघांचा परिणाम पण एकच आहे- भरती परीक्षेत अपयशी होणे.
म्हणून या परिस्थतीवर योग्य प्रतिक्रिया म्हणून दोघांनी अभ्यास करायचे ठरवले. ज्या वेळी निकाल आला त्यावेळी मात्र फक्त श्यामच यशस्वी ठरला. राम पुन्हा एकदा अपयशी ठरला. राम ने अजून एक दोन वर्षे अभ्यास केला परंतु त्याला सातत्याने अपयश येतच राहिले, चार वर्षाच्या प्रयत्नानंतर राम ने भरती होण्याचे स्वप्न सोडून दिले आणि नशिबाला दोष देऊन तो भरती प्रक्रियेच्या बाहेर पडला.


इथे प्रश्न हा आहे कि – असे का घडले ? का शाम एका वर्षात पोस्ट मिळवू शकला आणि चार वर्षे तयारी करून देखील राम अपयशी झाला? इथे खरे रहस्य लपलेले आहे.
हे रहस्य सूत्रानुसार असे मांडता येईल –

Sbfied Fighter Police Bharti by Mr Sagar B Tupe Patil
शाम च्या बाबतीत:
लेखी परीक्षेचा अभ्यास नसणे + अभ्यास → भरतीत यशस्वी होणे
राम च्या बाबतीत:
पहिल्या वर्षी:
लेखी परीक्षेचा अभ्यास नसणे + अभ्यास → अपयशी ठरणे
दुसऱ्या वर्षी:
लेखी परीक्षेचा अभ्यास नसणे + अभ्यास →पुन्हा अपयशी ठरणे
तिसऱ्या वर्षी व चौथ्या वर्षी :
लेखी परीक्षेचा अभ्यास नसणे + अभ्यास → खूप प्रयत्न करून देखील अपयशी ठरणे

अपयशी होण्याचा राम चा Pattern पहिला असता असे लक्षात येते कि खूप प्रयत्न करून देखील राम अपयशी होतोय कारण- परिस्थिती वर दिलेली प्रतिक्रिया त्याची प्रत्येक वर्षी सारखीच आहे. प्रत्येक वर्षी तो त्याच ठरलेल्या pattern नुसार अभ्यास करतो आहे. आणि म्हणून सूत्रानुसार जो परिणाम, जो result त्याला पहिल्या वर्षी मिळाला तोच त्याला शेवटच्या वर्षी ही मिळणार आणि तो आहे – अपयशी होणे.


ह्या पुढे जाऊन असे म्हणता येईल कि जो पर्यंत रामची प्रतिक्रिया ( म्हणजे अभ्यास करण्याचा pattern) बदलणार नाही तोपर्यंत तो सतत अपयशीच होत राहणार.


हे अगदी असे आहे- आपण रस्ताने जातो आणि रस्त्यावर एक अनोळखी कुत्रा झोपलेला असतो आपण दगड मारतो आणि तो ओरडत रस्त्याचा दुसऱ्या बाजूने निघून जातो. हे दररोज घडणार- दगड मारणे आणि कुत्र्याचे ओरडत दुसऱ्या बाजूला निघून जाणे एकमेकांवर अवलंबित असणाऱ्या गोष्टी आहे.
जो पर्यंत तुम्ही दगड मारत राहणार तो पर्यंत तो कुत्रा ओरडणार. असे कधीच होणार नाही की तुमच्या हातात दगड बघून कुत्रा तुमच्याकडे शेपटी हलवत येईल. कारण प्रतिक्रिया ( दगड मारणे) प्रत्येक वेळी समान आहे आणि म्हणून परिणाम (कुत्र्याचे ओरडणे ) प्रत्येक वेळी समान असेल.
आपल्या पोलीस भरतीत हे सूत्र अचूक लागू होते आणि म्हणून चार-पाच वर्ष प्रयत्न करून देखील उमेदवार भरती होत नाही.
मित्रांनो पहिल्या वर्षी अपयश येणे कदाचित एकवेळ चालू शकेल पण पुन्हा पुढच्या वर्षीही पुन्हा तेच घडत असेल तर हे सूत्र आठवायला हवे.

आपण अभ्यास करत नाही असे मला म्हणायचे नाही. आपण अभ्यास करतो परंतु आपली अभ्यास करण्याची पध्दत/pattern हा तोच असता कामा नये. ज्याने मागच्या वर्षी आपल्याला अपयशी ठरवले. जर ह्या वर्षी तुम्ही एका ठराविक पद्धतीने अभ्यास करून अपयशी ठरले असाल तर पुढच्या भरतीची तयारी करतानी लक्ष्यात घ्या- अभ्यासाच्या pattern मध्ये बदल करण्याची वेळ आहे.


आता सर्वात महत्वाचा आणि शेवटचा मुद्दा-
अभ्यासाच्या pattern मध्ये बदल करायचा म्हणजे काय करायचे?
हे खूप सोपे आहे. अपयशाला कारणीभूत असणाऱ्या आपल्या अभ्यासाच्या pattern मध्ये दोष असतात. हे दोष असणारी अभ्यासाची पद्धत बदलायला हवी. खाली काही अभ्यासाचे सदोष pattern चे उदा आहेत- हे उदाहरणे फक्त प्रातिनिधिक आहेत, ह्यापेक्षाही खूप वेगवेगळे दोष असू शकतात:
1. मी गणिताचा रोज अभ्यास करतो कारण फक्त गणितामुळे मला मार्क्स मिळत नाही. गणिताचे सर्व सूत्र मी पाठच करून टाकणार आहे.
दोष: गणिताचे सर्व सूत्र पाठ केल्यामुळे मार्क्स मिळणार नाही कारण गणित पाठांतरापेक्षा सोडवण्याचा विषय आहे.


2. ह्या वर्षी मी भरपूर अभ्यास करणार आहे- अमुक लेखकाच्या पुस्तकातील भरपूर प्रश्न विचारले जातात, मी बुद्धिमत्ता फक्त त्याच पुस्तकातून करणार आहे.
दोष: ह्याही वर्षी त्याच पुस्तकातून प्रश्न येतील याची खात्री नाही. एकदा मुळात बुद्धिमत्ता हा विषयच समजला तर पुस्तकाबाहेरील प्रश्न सुद्धा आत्मविश्वासाने सोडवता येतील.


3. अजून भरतीची जाहिरात आलेली नाही आली कि अभ्यासाला सुरुवात करू.
दोष: वाढलेल्या स्पर्धेमुळे इतक्या कमी वेळात अभ्यास पूर्ण होईलच असे नाही. बरेच उमेदवार खूप दिवस सातत्याने मेहनत घेत असतात,त्यांच्या स्पर्धेत आपण टिकू का?


4. माझे ground खूप चांगले आहे पैकीच्या पैकी मार्क्स मिळतात. लेखी परीक्षेत कमी मिळाले तरी हरकत नाही.
दोष: भरती होणारा उमेदवार फक्त ground किंवा लेखी मुळे भरती होत नसतो. दोन्ही क्षेत्रात चांगले प्रदर्शन करणाऱ्याच उमेदवाराचे नाव मेरीट लिस्ट मध्ये असते.

वरील चारही उदा मध्ये उमेदवार हा अभ्यास करतो आहे परंतु त्याची अभ्यासाची पद्धत चूक आहे , अभ्यास करण्यामागील त्याचा दृष्टीकोन चूक आहे आणि प्रत्येक वर्षी तो हाच pattern राबवणार असेल तर त्याला ह्याही वर्षी अपयशच मिळणार आहे.
आणि म्हणून कित्येक वर्षी तयारी करणारे उमेदवार खूप प्रयत्न करूनही शेवटी भरती न होताच थांबतात.

मित्रांनो इथे नशिबापेक्षा दोष आहे तो चुकीच्या pattern च्या!


जर तुमचाही अभ्यासाचा, तयारीचा pattern असा असेल तर मागच्या वर्षी तुमच्या सोबत जे घडले तेच पुन्हा ह्या वर्षी घडणार आहे हे लक्ष्यात घ्या.
तसाच अभ्यास करून तशीच तयारी करून आपण भरती होणार नाही हे आपण लक्ष्यात घ्यायला हवे.


तुम्ही ह्या मागे भरती होऊ शकला नाहीत, जर हा तुमचा तिसरा किंवा त्यापेक्षा जास्त प्रयत्न असेल तर नक्कीच आपले नेमके चुकत होते हे तुमच्या लक्ष्यात आले असेल. आणि अजूनही लक्षात आले नसेल तर वेळीच ह्या गोष्टीवर विचार करा.


Comment बॉक्स मध्ये तुम्ही का अपयशी ठरलात ? किंवा कुठली चूक तुम्ही वारंवार करत आहात ?, तुमचा तयारीचा pattern कसा आहे हे नक्की लिहा. म्हणजे त्यावर काय सुधारणा करता येईल हा विचार करता येईल. धन्यवाद.

खूप महत्वाचे

लेखी परीक्षेच्या तयारीसाठी !

ह्या वर्षी लेखी परीक्षा अधिक कठीण आणि स्पर्धात्मक असणार आहे आणि म्हणून योग्य दिशेने अभ्यास करणे खूप महत्वाचे आहे. आणि ही अभ्यासाची दिशा तुम्हाला आमच्या फ्री Online TEST देऊ शकतात. खालील बटनावर क्लिक करून ह्या फ्री सुविधेचा फायदा घ्या

19 thoughts on “वर्दी मिळवण्याचे सूत्र ( पोलीस भरती : FIGHTER )”

 1. सर मी 2 वर्षा पासून अभ्यास करत आहे पण दर भरतीला मी पेपर मध्येच उडून जातो.
  दर भरतीला मी 2,4 मार्कांनी उडून जातो सर मी गणित,बुद्धीमत्ता,आणि मराठी व्याकरण यांचा चांगला सराव कसा करू कृपया योग्य मार्गदर्शन करा.

 2. मंगेश मडावी

  Sir me 2 वर्षांपासून अभ्यास करतोय मी 1 च भरती दिली आहे पण रिजेक्ट झालोय
  तर सर पेपर बद्दल माहिती द्या
  म्हणजे गणित चा प्रॉब्लेम आहे
  शॉर्ट ट्रिक सांगा न सर गणित ची
  खूप अडचण येते आणि नवीन पॅटर्न दरवर्षी बदलतो तर या भरती साठी नवीन गणित च पुस्तक सांगा सर plz

  1. Shubham Sagaonkar

   भावा गणित साठी वसे सरांचे fastrack maths हे बुक वापर बग नक्कीच तुला फायदा होईल. मी पण तयारी करतोय काही अडचम असेल तर मला msg कर 8857847880

 3. Sir,
  अभ्यास कसा करायचा आणि कोणत्या ट्रिक नुसार करायचा
  Please solution

 4. निवास कुंभार

  सर मी गेले ४ वर्ष अभ्यास करतोय पण तरीही मी रिजेकठ होतोय. अभ्यास पण भरपूर करतो. पण……

 5. सर,
  अभ्यास कसा करावा ह्या बद्दल माहिती सांगितली तर खूप बरे होईल
  मी स्वतः अभ्यास करतो, class गरजेचा आहे का?

  1. Nilesh saindane

   Sir gharich study karto 4 year pasun police bharti sathi pn selection nhi hot….. Please solution

   1. निलेश sir,
    चार वर्षांपासून स्टडी करत असताना जर तीच ती चूक आपण करत असू तर आजपर्यंत जे फळ मिळाले तेच मिळणार. म्हणून आपण सध्याचा हा पॅटर्न बदलायला हवा.
    पुढच्या आर्टिकल मध्ये काय आणि कसे बदल करायचे हे स्पष्ट करण्यात येईल.

  2. Sir class गरजेचा आहे का? हा खूप महत्वाचा प्रश्न विचारला आहे तुम्ही.
   ह्या भरती परीक्षेचा विचार केला असता माझे असे मत आहे की कुठलाही क्लास न करताही आपण सिलेक्ट होऊ शकतो कारण परीक्षेची काठिण्य पातळी ही दहावी इतकीच असते.
   पण जर तुम्ही दहावी पर्यंत चा basic अभ्यास व्यवस्थित केला नसेल किंवा जो केला आहे तो लक्षात नसेल तर class लावलेला योग्य ठरेल.
   खूप महागडा किंवा खूप नावाजलेला क्लासच पाहिजे असे काही नाही कारण कितीही सक्षम class असेल तरीही अभ्यास मात्र आपल्यायलाच करायला लागतो.
   म्हणून आपले basic चांगले नसेल तर एखादा class करायला हरकत नाही. एकदा गणित बुद्धिमत्ता आणि मराठी ह्यासाठी हवे असणारे basic knowledge आपल्याला अवगत झाले की आपण सेल्फ स्टडी करून पण पोस्ट मिळवू शकतो.
   हा self study कसा करायचा ह्या बद्दल एक आर्टिकल लवकरच पोस्ट करण्यात येईल.

  3. Sir me 2 वर्षांपासून अभ्यास करतोय मी 1 च भरती दिली आहे पण रिजेक्ट झालोय
   तर सर पेपर बद्दल माहिती द्या
   म्हणजे गणित चा प्रॉब्लेम आहे
   शॉर्ट ट्रिक सांगा न सर गणित ची
   खूप अडचण येते आणि नवीन पॅटर्न दरवर्षी बदलतो तर या भरती साठी नवीन गणित च पुस्तक सांगा सर plz

 6. mla ata 80 mark padtat sir pn rahilele 20 mark sodavtana maz mind set rahat nahi ani chukun chukich uttar gol hot ky kru sir tumi jra study ani hya sub bddal sanga

  1. परीक्षेत मनःस्थिती बदलते किंवा आपण शेवटच्या क्षणी गडबड करतो ह्या मागे दोन कारणे असतात –
   1. Practice चा अभाव असणे आणि
   2.पूर्व तयारी नसणे.

   खरतर परीक्षेत ह्या प्रकारच्या चुका होऊ नये म्हणून आपण घरीच परीक्षे सारखे वातावरण तयार करायला हवे.परीक्षेत असणारा मर्यादित वेळ, चांगल्या मार्क मिळवण्यासाठी असणारी स्पर्धा यामुळे एक मानसिक दडपण निर्माण होते. आणि अभ्यास असून पण चुका करतो, घाई करतो. हे होऊ नये म्हणून त्या सर्व वातावरणाची सवय असायला हवी.
   पूर्व तयारी यासाठी हवी की पेपर हातात येत नाही तोपर्यंत काय विचारणार आहे हे समजत नाही. बऱ्याचदा पेपर खूप सोपा किंवा खूप कठीण आला की आपण चुका करतो.हे होऊ नये म्हणून आपली पेपर कसा सोडवायचा याची एक योजना असायला हवी. त्या नुसार पेपर ला सामोरे गेले तर कुठलीच गडबड होणार नाही.
   पेपर कसा सोडवायचा याची योजना कशी असावी ह्याबद्दल नक्कीच एक आर्टिकल पोस्ट केल्या जाईल.

Leave a Comment

Your email address will not be published.

Don`t copy text!