खाकी वर्दीचे स्वप्न बघताय का?
तो रूबाब हवा आहे का?
जर याचे उत्तर तुम्ही होय असे देत असाल तर जरा थांबा.
उत्तर देण्या च्या अगोदर स्वतःला एक प्रश्न विचारा.
ज्या वर्दिचे स्वप्न मी बघतो आहे ती वर्दी मिळवण्यासाठी लागणारी किंमत मोजायला आम्ही तयार आहे का?
स्वप्न तर सगळेच बघतात.
ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी लढायला मी तयार आहे का?
तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही किंमत तुम्हाला पैशात मोजायची नाहीये.
तो रूबाब मिळवण्यासाठी किंमत तुम्हाला फक्त वेळेत मोजायची नाहीये.
स्वप्न सर्वच बघतात. प्रयत्न सर्वच करतात. वेळ सर्वच देतात. पण म्हणून ती रुबाबदार खाकीवर्दी सर्वांनाच मिळत नाही. सर्वच सर्व करतात मग सर्वांचे स्वप्न पूर्ण का होत नाही?
याचे उत्तर फक्त आणि फक्त एक प्रश्न देऊ शकतो.
रोज सकाळी उठल्यानंतर हा एक प्रश्न स्वतःला विचारा…
माझ्या वर्दीच्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी हवी असणारी किंमत द्यायला मी तयार आहे का?
आणि हो
. या प्रश्नाचे उत्तर पटकन हो देण्याऐवजी एक मिनिट स्वतःची विचार करा.
फिजिकल चाचणीचे मिरीट 94 वरती लागण्याची शक्यता आहे आणि मला तितके मार्क मिळवण्यासाठी न थकता न थांबता तयारी करायची आहे.
मी तयार आहे का?
उत्तर हो मिळाले.
आता पुढचा विचार करा..
94 मार्क मिळवून सुद्धा लेखी परीक्षेला 90 मार्कांची गरज आहे.
लेखी परीक्षेत 90 मार्क मिळवण्यासाठी मी तयार आहे का?
मित्रांनो मी तयार आहे का या प्रश्नाचे उत्तर हो देण्याआधी स्वतःशी नेहमी विचार करा.
मी फक्त हो म्हणून स्वतःला फसवत तर नाही ना?
जोपर्यंत मी तयार आहे का या प्रश्नाचे उत्तर ठामपणे हो मिळत नाही तोपर्यंत प्रयत्न थांबवू नका.
About Mr.Sagar B. Tupe Patil:
राष्ट्रीयकृत बँकेत कार्यरत असणारे Mr. Sagar हे आज SBfied च्या माध्यामतून 40,000 पेक्षा अधिक स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मित्रांच्या संपर्कात आहेत. ग्रामीण भागातून विविध स्पर्धा परीक्षांची तयारी कुठलेही क्लासेस न लावता स्वतः करणाऱ्या असंख्य उमेदवारांना प्रेरित करण्याचे काम ते मागील दोन वर्षांपासून करत आहे.
अश्या जिद्दी आणि मेहनती उमेदवारांना संघटीत करण्याचा आणि ह्या संघटनच्या माध्यमातून अभ्यास आणि अभ्यास साठी आवश्यक प्रेरणा देण्याचे काम आज 24 पेक्षा अधिक WhatsApp ग्रुप, Telegram Channel च्या माध्यमातून होत आहे.
ह्या उपक्रमांमध्ये तुमचीही मदत नक्कीच अपेक्षित आहे. SBFIED Study Initiative च्या माध्यमातून खालील उपक्रम सध्या चालू आहे.
ह्या उपक्रमांमध्ये तुमचीही मदत नक्कीच अपेक्षित आहे.
Thanks sir
खूपच प्रेरणा मिळाली sir.
Thank You
Nice post Sir
Thank you very much for appreciation