Table of Contents
भरतीची तयारी करणाऱ्या मित्रांसाठी Police Bharti 2019 Date जाणून घेणे खूप महत्वाचे आहे पण त्या मागे वास्तविकता काय आहे?
हे आहे Police Bharti 2019 जाहिरात कधी निघणार यामागचे वास्तव्य ( Date of Police Bharti 2019)
पोलीस भरतीची वाट बघणार्या मित्रांमध्ये सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न जर कुठला असेल तर तो म्हणजे पोलीस भरतीची जाहिरात केव्हा येणार आहे?
पोलीस भरती बद्दल तुमचाही काही शंका असतील तर तुम्ही इथे विचारू शकता पोलीस भरती : तुमचे प्रश्न
आजच्या आर्टिकल मध्ये आपण पोलीस भरतीची जाहिरात केव्हा निघू शकते याबद्दल सविस्तर माहिती आणि त्यामागचे वास्तव्य बघू
Police Bharti बाबत मागील पाच वर्षात झालेली दिरंगाई:
20 ऑगस्ट 2018 रोजी प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तानुसार,
वाढती गुन्हेगारी आणि कायदा-सुव्यवस्थेचे आव्हान लक्षात घेता, कार्यरत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त अजुन 61500 कर्मचाऱ्यांची आवश्यकता 2011 सालीच पोलीस महसंचालकांनी स्पष्ट केली होती.
त्या अनुषंगाने 2011-14 या काळात 23000 च्या आसपास पदे भरण्यात आली.
ह्या नंतर च्या काळात म्हणजे 2018 पर्यंत खूप कमी पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली. वरील गोष्टींचे विश्लेषण करता राज्यात अजूनही 36000 पदे रिक्त आहेत.
ह्या बद्दलचे सविस्तर वृत्त इथे वाचा पोलीस भरती प्रक्रिया लांबणीवर : Zee News
ह्या पदांच्या भरतीसाठी लवकरात लवकर जाहिरात येणे आवश्यक आहे.
पण सध्याची परिस्थिती बघता, शासनाद्वारे ही पोलीस भरती प्रक्रिया राबवतांना बऱ्याच प्रमाणात दिरंगाई होताना दिसत आहे.
मागच्या Police Bharti वेळापत्रक:
जून महिना संपूनही ही या वर्षी पोलिस भरती प्रक्रियेबाबत ठोस अशा हालचाली होताना दिसत नाही आहे.
या तुलनेत मागील वर्षाच्या पोलीस भरतीच्या वेळापत्रक कडे बघितले असता असे लक्षात येते की ही भरती प्रक्रिया 2018 ह्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात सुरू झालेली होती.
6 फेब्रुवारीपासून पात्र उमेदवारांकडून अर्ज स्वीकृत करण्यास सुरुवात झाली होती तर अर्जाची अंतिम मुदत ही 27 फेब्रवारी होती.
त्या तुलनेत 2019 या वर्षी फेब्रुवारी महिन्यात पोलीस भरती प्रक्रिया राबवण्याबाबत कुठल्याही सूचना किंवा प्रसिद्धी पत्रके संबंधित खात्याकडून प्रसिद्धीस आले नाही.
2019 सालची पोलीस भरती प्रक्रिया फेब्रुवारी महिन्यात सुरू न होण्यामागे लोकसभा निवडणुकांचे कारण देण्यात येते. परंतु लोकसभा निवडणुकांनंतर भरती प्रक्रियेस वेग यायला हवा होता जो की निदर्शनास आला नाही.
या वर्षीच्या Police bharti प्रक्रियेच्या अंमलबजावणीबाबत दोन शक्यता: (Police Bharti 2019 Date)
देशव्यापी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक, आचारसंहिता या जाळ्यात अडकलेले पोलीस भरती नेमकी कधी होईल याबाबत दोन शक्यता वर्तवण्यात येत आहे.
1. वेगवान Police Bharti: विधान सभे पूर्वी
पोलीस भरती वेगवान होण्याबद्दल ची ही शक्यता खूपच कमी प्रमाणात अस्तित्वात येऊ शकते परंतु विधानसभा निवडणुकांपूर्वी भरती प्रक्रिया सुरु होण्या मागे एक खास कारण आहे ज्यामुळे पोलीस भरतीची तयारी करणारे उमेदवारांनी विधानसभा निवडणुका अगोदरही भरतीसाठी तयार राहायला हवे.
सत्ताधारी पक्षाला निवडणुकात फायदा व्हावा या हेतूने पोलीस भरतीची घोषणा आचार संहितेचा काही दिवस अगोदर करण्यात येऊ शकते आणि न्यायालयाची पूर्वसंमती घेऊन या प्रक्रियेची अंमलबजावणीही करता येऊ शकते.
जर असे झाले तर पोलीस भरती प्रक्रिया अगदी जवळ म्हणजेच जुलै किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये जाहीर केली जाऊ शकते.
अंमलबजावणीसाठी लागणारी यंत्रणा बघता पोलीस भरतीची ही वेगवान शक्यता प्रत्यक्षात येण्याची संभाव्यता खूप कमी आहे. मात्र तरीही उमेदवारांनी तयारीत असायला हवे.
पोलीस भरती बाबतच्या सर्व माहितीसाठी इथे क्लिक करा Maharashtra Police Bharti
2.नियमित होणारी Police Bharti प्रक्रिया:
पोलीस भरतीच्या अमंलबजावणी बाबतची ही शक्यता मात्र सर्वाधिक विश्वसनीय मानली पाहिजे. कारण अंमल बजावणी प्रणाली साठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टींची पात्रता या शक्यता मध्ये पूर्ण होते.
राज्यातील विधानसभेचा कार्यकाळ साधारणपणे 09 नोव्हेंबर 2019 रोजी समाप्त होत आहे. राज्यात विधानसभा निवडणुकांची प्रक्रिया चे नियोजन सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये असेल.
त्यामुळे निवडणुका आणि आचारसहिता यासाठीचा लागणारा वेळ लक्षात घेता पोलीस भरती प्रक्रियेला या वर्षाचा डिसेंबर महिना किंवा नवीन वर्षाचा जानेवारी महिना उजाडण्याची दाट शक्यता आहे.
Police Bharti 2019 Date:
आणि मागच्या वर्षीच्या भरती प्रक्रियेचे नियोजन याचे विश्लेषण केले असता लक्षात येते की ज्याप्रमाणे फेब्रुवारी 2018 मध्ये पोलीस भरती प्रक्रिया झाली होती त्याच प्रमाणे 2020 च्या फेब्रुवारी महिन्यामध्ये पोलीस भरती प्रक्रिया होऊ शकते.
Police Bharti प्रक्रियेबाबत SBFIED View:
पोलीस भरती ही या वर्षाच्या जुलै-ऑगस्ट किंवा 2020 या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात होण्याची शक्यता असेल तरीही सर्व मुद्यांचा विचार करून भरती ही विधान सभे नंतरच होऊ शकते असे वाटते.
मात्र भरती प्रक्रिया जाहीर करण्याच्या निर्णयाचा फायदा सत्ताधारी पक्षाला घेण्याची संधी असल्यामुळे, भरती प्रक्रियेला वेगवान करून ती विधानसभे पूर्वी ही राबवण्यात येऊ शकते.
भरतीची नेमकी तारीख माहीत नसल्यामुळे उमेदवारांमध्ये गोंधळ असला तरीही अभ्यास आणि मैदानी चाचणी चा सराव उमेदवारांनी सुरूच ठेवला पाहिजे.
पोलीस भरती होणार हे नक्की असेल तरीही साधारण पणे किती पदांसाठी भरती व्हावी असे तुम्हाला वाटते?
कारण 36000 पोलीस कर्मचाऱ्यांची गरज असताना फक्त आठ नऊ हजार पदे भरली गेल्याने तयारी करणाऱ्या मुलांचे नुकसान होते असे आम्हाला वाटते. ह्या बद्दल तुमचे मत काय आहे?
तुमचे मत नक्की कमेंट मध्ये नक्की कळवा. धन्यवाद.
महाराष्ट्र पोलीस भरती 2019 च्या सर्व माहिती साठी इथे क्लिक करा.
About Mr.Sagar B. Tupe Patil:
राष्ट्रीयकृत बँकेत कार्यरत असणारे Mr. Sagar हे आज SBfied च्या माध्यामतून 40,000 पेक्षा अधिक स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मित्रांच्या संपर्कात आहेत. ग्रामीण भागातून विविध स्पर्धा परीक्षांची तयारी कुठलेही क्लासेस न लावता स्वतः करणाऱ्या असंख्य उमेदवारांना प्रेरित करण्याचे काम ते मागील दोन वर्षांपासून करत आहे.
अश्या जिद्दी आणि मेहनती उमेदवारांना संघटीत करण्याचा आणि ह्या संघटनच्या माध्यमातून अभ्यास आणि अभ्यास साठी आवश्यक प्रेरणा देण्याचे काम आज 24 पेक्षा अधिक WhatsApp ग्रुप, Telegram Channel च्या माध्यमातून होत आहे.
ह्या उपक्रमांमध्ये तुमचीही मदत नक्कीच अपेक्षित आहे. SBFIED Study Initiative च्या माध्यमातून खालील उपक्रम सध्या चालू आहे.
ह्या उपक्रमांमध्ये तुमचीही मदत नक्कीच अपेक्षित आहे.
Hello. And Bye.
Write sir 15000 chi bharti pahije